कर्नाटक राज्य अभ्यासक्रम
माध्यम – मराठी
विषय – परिसर अध्ययन
इयत्ता – पाचवी
पाठावरील स्वाध्याय नमुना उत्तरे
प्रकरण -1 सजीव सृष्टी
खाली दिलेल्या तक्त्यात परिसरातील घटक व त्यासमोर काही लक्षणें दिली आहेत. काळजीपूर्वक वाच. प्रत्येक घटकासमोर त्याची लक्षणें दिसून आल्यास (√) चिन्ह घाल आणि लक्षणे न आढळल्यास (x) चिन्ह लिहा.
परिसरात आढळणारे काही घटक खाली दिले आहेत. ते सजीव अथवा निर्जीव हे ओळख. योग्य निवडीसमोर (√) खूण कर.
कृतीः तू पाहिलेल्या इतर सजीव व निर्जीव घटकांची यादी कर.
सजीव – पक्षी प्राणी कीटक झाड मनुष्य
निर्जीव – माती वीट टेबल पेन पुस्तक
या चित्राचे निरीक्षण कर.
बाजूचे चित्र ओळखून येथे लिही.
मानवी श्वसन संस्था
खाली काही सजीवांची नावे दिली आहेत, ते आम्हाला आमच्या विविध कामामध्ये मदत करतात. त्या कामांची नावे लिही.
हत्ती – सर्कसमध्ये , गाड्या ओढण्यासाठी
बैल – वाहतूक , शेतीकामासाठी
कुत्रा – शिकार,सर्कसमध्ये
चित्राचे निरीक्षण कर. वनस्पतीना आहार निर्मितीसाठी लागणारे चार महत्वाचे घटक दिलेले आहेत. ते कोणते ? आणि कोणापासून ? अशी कृती खाली दिलेली आहे. त्यातील विधान अचूक जोडीने जोडून लिही.
कोणते ? | कोणापासून | अचूक विधान येथे लिही |
सूर्यप्रकाश | हिरवे पान | सूर्य |
पाणी, खनिजे, क्षार | वातावरण | माती |
कार्बन-डायऑक्साईड | सूर्य | वातावरण |
हरितद्रव्य | माती | हिरवे पान |
खालील चित्राचे निरीक्षण कर. या वनस्पती आहेत. त्या आपला आहार कोठून मिळवितात?
उत्तर – या वनस्पती आपल्या आहारासाठी किटकांवर अवलंबून असतात.यांना किटकभक्षक वनस्पती असे म्हणतात.
शाकाहारी | मांसाहारी | मिश्राहारी |
हत्ती | सिंह | अस्वल |
पोपट | वाघ | कुत्रा |
ससा | मांजर | |
कोल्हा | ||
घुबड |
वाढीसाठी शक्ती आवश्यक असते. वाढीला संबंधीत काही विधाने खाली दिलेली आहेत. ही विधाने बरोबर असल्यास (√) व चुक असल्यास (X) खूण करा. चुकीची विधाने बरोबर करून लिही.
* सर्व सजीव त्याच्या जन्म कालामध्ये लहान असतात, नंतर विशिष्ट उंची व वजन मिळवितात. (✔)
* सजीवांची वाढ वेगाने म्हणजेच एक दोन दिवसात होते. (x)
उत्तर – सजीवांची वाढ होण्यास ठराविक कालावधी लागतो.
- वनस्पतीची वाढ त्याच्या खोडाचे टोक अथवा खोडाच्या रूंदीमध्ये दिसून येते. (✔)
प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात. त्यासाठी विशेष अवयव प्राण्यांना असतात. खाली काही प्राण्यांची नावे दिलेली आहेत. त्यांच्यासमोर त्यांच्या हालचालीचे अवयव लिही.
मनुष्य – पाय
कांगारू – पाय
गरुड – पंख
वटवाघूळ – पंख
प्राणी हालचाल का करतात? यावर गटात चर्चा कर. खाली दिलेल्या जागेत लिही.
उत्तर –
- कारण प्राण्यांना हालचालीसाठी विशिष्ट अवयव आहेत.
- प्राणी अन्न मिळवण्यासाठी हालचाल करतात.
- प्राणी पाणी पिण्यासाठी हालचाल करतात.
- प्राणी निवारा बांधण्यासाठी हालचाल करतात.
- प्राणी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी हालचाल करतात.
पुनरुत्पादनाशी संबंधीत काही विधाने खाली दिलेली आहेत. विधान बरोबर असल्यास (√) व चुक असल्यास (X) खूण कर. चुकलेले विधान समोर दिलेल्या जागेत बरोबर करुन लिही.
विधान | बरोबर/चूक | बरोबर केलेले विधान |
पुनरुत्पादनाद्वारे सजीव आपला वंश पुढे चालवितात. | बरोबर | |
पुनरुत्पादनापासून परिसरातील इतर सजीवांना आहार मिळतो. | चूक | नरुत्पादनापासून परिसरातील इतर सजीवांना आहार मिळत नाही. |
पुनरुत्पादन फक्त प्राण्यामध्ये मात्र दिसून येते. | चूक | पुनरुत्पादन फक्त प्राण्यामध्येच नाही तर वनस्पतींमध्येही दिसून येते. |
एकाच सजीवाच्या जास्तीच्या पुनरुत्पादनातून परिसरामध्ये कोणताही धोका उद्भवणार नाही. | बरोबर |
कृतीः अंडी घालून आणि प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणाऱ्या सजीवांची यादी कर.
अंडी घालून पिल्लांना जन्म देणारे सजीव | मासे , पक्षी , साप , कीटक |
प्रत्यक्ष पिल्लांना जन्म देणारे सजीव | म्हैस , गाय , मनुष्य , कुत्रा |
• वनस्पती बियाद्वारे आणि खोडाद्वारे पुनरुत्पादन करतात.
कृतीः बियापासून आणि खोडापासून पुनरुत्पादन करणाऱ्या वनस्पतींची यादी कर.
बियापासून पुनरुत्पादन करणाऱ्या वनस्पती-:
• सोयाबीन
• आंबे
• गाजर
खोडापासून पुनरुत्पादन करणाऱ्या वनस्पती-:
• गुलाब
• कांदा
• बटाटा
कृतीः वनस्पतीच्या पुनरुत्पादनातून मानवासह इतर प्राण्यांना अनेक फायदे होतात. मित्र/मैत्रिणीशी चर्चा कर व यादी कर.
वनस्पतींच्या पुनरुत्पादनाचे फायदे:
1 वनस्पती फळे, बिया आणि पाने तयार करतात जी प्राण्यांसाठी आहार म्हणून उपयोगी असतात.
2.वनस्पती प्रकाशसंश्लेषणाद्वारे ऑक्सिजन तयार करतात,जे प्राण्यांच्या श्वसनासाठी आवश्यक आहे.
To be continue….