नाडप्रभू केंपेगौडा (1510 – 1569) विजयनगर साम्राज्यात सरदार होते आणि भारतातील बेंगळुरू (बंगळुरू) शहराची स्थापना करण्यासाठी सर्वात मोठे योगदान आहे.

नाडप्रभू केंपेगौडा यांचा जन्म 27 जून 1510 रोजी येलहंका जवळील एका गावात झाला,जे आता बंगलोर,कर्नाटकचा भाग आहे. त्याचे वडील केंपनांजे गौडा हे विजयनगर साम्राज्यात सरदार होते.
1537 मध्ये बेंगळुरू शहराची स्थापना करण्याचे श्रेय नाडप्रभू केंपेगौडा त्यांना जाते. त्यांनी योग्य पायाभूत सुविधा असलेल्या शहराची कल्पना केली आणि त्यानुसार त्याचा विकास केला.
नाडप्रभू केंपेगौडा यांनी बेंगळुरूमध्ये मातीचा किल्ला बांधला,जो नंतर शहराचा मध्य भाग बनला.तसेच त्यांनी शहराभोवती अनेक टेहळणी बुरूजही बांधले,ज्यांचे अवशेष आजही पाहायला मिळतात.
नाडप्रभू केंपेगौडा यांनी बंगलोर आणि आसपासच्या शहराच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनेक तलाव विकसित केले. उलसूर तलाव आणि केंपांबुधी तलाव.
नाडप्रभू केंपेगौडा यांनी एक सुसंघटित प्रशासकीय यंत्रणा स्थापन केली आणि व्यापार आणि वाणिज्यला चालना दिली, ज्यामुळे बेंगळुरू एक प्रमुख व्यापारी केंद्र बनले.
नाडप्रभू केंपेगौडा त्यांच्या पुरोगामी दृष्टिकोनासाठी ओळखले जात होते आणि त्यावेळी प्रचलित असलेल्या काही अमानुष्य प्रथांना प्रतिबंध करण्यासाठी अनेक सामाजिक सुधारणा त्यांनी केल्या.
नाडप्रभू केंपेगौडा हे कला आणि संस्कृतीचे संरक्षक होते.त्यांनी पारंपारिक कला आणि हस्तकलेच्या विविध प्रकारांना समर्थन केले आणि या प्रदेशाच्या सांस्कृतिक समृद्धीसाठी योगदान दिले.
त्यांनी अनेक मंदिरे बांधली आणि धार्मिक सहिष्णुतेला प्रोत्साहन दिले. गवी गंगाधरेश्वर मंदिर आणि बसवनगुडी बैल मंदिर इत्यादी कांही प्रसिद्ध मंदिरे होती.
केंपेगौडा यांच्या वारशाचा सन्मान कर्नाटकात केला जातो,विशेषत: बंगळुरूमध्ये केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि केंपेगौडा बस स्थानकासह अनेक ठिकाणांना त्यांची नावे देण्यात आली आहेत.
बेंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळावरील केम्पेगौडा पुतळा ही अशीच एक श्रद्धांजली आहे.