इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – भूगोल
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
28.कर्नाटकातील उद्योगधंदे
1. योग्य शब्दांसह रिक्त जागा भरा.
1. कर्नाटकातील पहिला लोह आणि पोलाद उद्योग भद्रावती येथे स्थापन
झाला.
2. ‘कर्नाटकचे मँचेस्टर‘ म्हणजे दावनगेरे
3. ऊसापासून साखरेचे
उत्पादन होते.
4. अम्मसंद्रामध्ये सिमेंट
हा उद्योग आहे.
5. ‘सिलिकॉन व्हॅली‘ असे या बेंगळुरू
शहराला म्हणतात.
2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. कर्नाटकातील
कारखान्यांच्या अभिवृद्धी बद्दल माहिती लिहा ?
उत्तर – कर्नाटकातील
कारखान्यांची अभिवृद्धी वैविध्यपूर्ण आहे.कर्नाटकात मुबलक खनिज संसाधने,अनुकूल हवामान,कुशल कामगार
आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे लोखंड आणि पोलाद, सुती कापड, साखर, सिमेंट, कागद यासारख्या
विविध क्षेत्रांची स्थापना झाली आहे आणि बेंगळुरूमध्ये IT हब विकसित
होत आहे.
2. कर्नाटकातील लोह आणि पोलाद उद्योगाचे वर्णन करा?
उत्तर – सर
एम. विश्वेश्वरैया यांच्या दूरदृष्टीमुळे 1923 मध्ये भद्रावती येथे लोह आणि पोलाद उद्योगाची
स्थापना करण्यात आली.ज्यामध्ये लोहखनिजाच्या समृद्ध साठ्यांचा वापर करण्यात
आला.जलविद्युत वापरून उद्योगाचा विस्तार झाला.विश्वेश्वरैया लोह आणि पोलाद उद्योग
(VISL) आणि जिंदाल विजयनगर स्टील लिमिटेड यांचा समावेश आहे.
3. सुती वस्त्रोद्योगांच्या विभागणीबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर – कापूस
कापड उद्योग लवकर सुरू झाला, आधुनिक गिरण्या 19व्या शतकाच्या
उत्तरार्धात उदयास आल्या. दावणगेरे हे ‘कर्नाटकचे मँचेस्टर‘ म्हणून ओळखले
जाते. हुबळी,इल्कल,गदग,बदामी इत्यादी ठिकाणी कापूस पिंजन्याचे व
कापड उद्योग स्थापित झाले आहेत. सद्या राज्यात 44 सुती
वस्त्रोद्योग आहेत.
4. साखर उद्योग सुरू करण्यासाठी कोणते घटक आवश्यक
आहेत ?
उत्तर – साखर
उद्योगाला दमट हवामान, पुरेसा वीजपुरवठा, स्थानिक
बाजारपेठा, वाहतूक सुविधा आणि ऊस उत्पादनासाठी अनुकूल
परिस्थिती आवश्यक असते. हे घटक कर्नाटकात मुबलक प्रमाणात आहेत.ज्यामुळे साखर
उद्योगाच्या वाढीला चालना मिळते.
5. बेंगळूर मधील माहिती-तंत्रज्ञान उद्योगाच्या केंद्रीकरणाची कारणे सांगा.
उत्तर – बेंगळुरू
माहिती-तंत्रज्ञान उद्योगाला अनुकूल हवामान,वीज पुरवठा,असंख्य
अभियांत्रिकी महाविद्यालयांचे कुशल कर्मचारी,आर्थिक पाठबळ, विस्तीर्ण
बाजारपेठ आणि पायाभूत सुविधा,इन्फोसिस आणि विप्रो सारख्या प्रतिष्ठीत
कंपन्या यासारख्या घटकांमुळे बेंगळुरूचे आयटी उद्योग निर्माण होत आहेत.
3. जोड्या जुळवा
अ ब
1. दांडेली a) सिमेंट
2. तोरंगल b) सुती कापड
3. मोणकालमुरु c) कागद
4. शहाबाद d) संगणक
5. इन्फोसिस e) लोह आणि
पोलाद
उत्तर –
1. दांडेली – c. कागद
2. तोरंगल – i. लोखंड आणि
पोलाद
3. मोलाकलमुरू – b. सुती कापड
4. शहाबाद – a. सिमेंट
5. इन्फोसिस – d. संगणक