राज्य – कर्नाटक
इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – भूगोल
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 26.कर्नाटकातील खनीज संपत्ती
स्वाध्याय
1. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. कर्नाटकाला ‘सुवर्णभूमी’ असे का म्हटले जाते?
उत्तर -कारण ते भारतातील 80% सोन्याचे उत्पादन
कर्नाटकात होते म्हणून कर्नाटकाला ‘सुवर्णभूमी’
असे म्हटले जाते.
2. कर्नाटकामध्ये मिळणारी प्रमुख खनिजे कोणती ?
उत्तर – लोह, मॅंगनीज, बॉक्साईट आणि सोने ही
कर्नाटकामध्ये मिळणारी प्रमुख खनिजे आहेत.
3. मिश्र धातू म्हणून कोणत्या धातूचा वापर केला
जातो?
उत्तर –मिश्र धातू म्हणून
मँगनीज धातूचा वापर केला जातो
4. कर्नाटकाच्या कोणत्या भागात कच्चे लोखंड
आढळते ?
उत्तर-कर्नाटकाच्या बळ्ळारी, चिक्कमगलुरू, चित्रदुर्ग, तुमकुरु,
शिवमोग्गा इ. जिल्ह्यात कच्चे लोखंड आढळते.
5. बॉक्साईट उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे कोणते?
उत्तर -बेळगावी जिल्हा हा बॉक्साईट उत्पादन
करणारा प्रमुख जिल्हा आहे.
6. कर्नाटकातील प्रमुख सोन्याच्या खाणी कोणत्या ?
उत्तर – कर्नाटकातील हट्टी,कप्पटगुड्ड,केंपिनकोटे,
बेल्लार,अजंनहळ्ळी येथे प्रमुख सोन्याच्या
खाणी आहेत.
3. जोड्या जुळवा.
अ ब
1. सुपा a) मँगनीज
2. हट्टी b) बॉक्साईट
3. कुमसी c) चुनखडी
4. खानापूर d) कच्चे लोखंड
e) सोन्याची खाण
उत्तर – अ ब
1. सुपा – C. चुनखडी
2. हत्ती – E. सोन्याची खाण
3. कुमसी – D. कच्चे लोखंड
4. खानापूर – A. मँगनीज