राज्य – कर्नाटक
इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – राज्यशास्त्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 21. निवडणूक प्रक्रिया
स्वाध्याय
प्र.1. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. मतदारांची यादी पाच वर्षातून एकदा दुरुस्त केली जाते.
2. मतदानाचा प्रचार मतदान दिवसाच्या 48 तास आधी
थांबवला पाहिजे.
3. राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता असावी
लागते.
4. वर्तमानपत्रांच्या स्वातंत्र्य संरक्षणासाठी
प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही संस्था कार्यरत आहे.
प्र.2. खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
1. मतदार यादीबद्दल थोडक्यात स्पष्टीकरण द्या.
उत्तर – मतदार यादी ही एक यादी आहे ज्यामध्ये
निवडणुकीदरम्यान मतदान करण्यास पात्र मतदारांची नावे
आणि संबंधित तपशील असतात.त्याला मतदार यादी
असेही म्हणतात. निवडणूक आयोग दरवर्षी ही यादी
तयार करतो आणि सुधारित करतो.18 वर्षे वय पूर्ण
झालेल्या नवीन पात्र मतदारांची नावे यामध्ये समाविष्ट
केली जातात आणि मृत व्यक्तींना काढून टाकली जातात.
ही यादी मतदाना दरम्यान मतदारांची ओळख पटवण्यास
मदत करते.
2. राजकीय पक्षांचे प्रतिनिधी हे सरकार व जनता
यांच्यातील दुवा असतात -कसे ते स्पष्ट करा.
उत्तर – राजकीय पक्ष निवडून आलेले प्रतिनिधी आणि
जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. नागरिकांच्या
हिताचे निर्णय घेण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.
ते निवडणुकीसाठी उमेदवार निवडतात आणि जनतेला
राजकारणात सहभागी होण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून
देतात.राजकीय पक्ष लोकांच्या आकांक्षा आणि मागण्या
सरकारपर्यंत पोहोचवतात,लोकोपयोगी योजना तयार करतात
आणि समाजाच्या भल्यासाठी काम करतात.
3. संमिश्र सरकार यावर थोडक्यात टिपा लिहा.
उत्तर – जेव्हा कोणत्याही एका राजकीय पक्षाला स्वबळावर
सरकार स्थापन करण्यासाठी बहुमत मिळत नाही तेव्हा संमिश्र
सरकारे स्थापन केली जातात.त्याला ‘त्रिशंकू संसद’ किंवा
‘त्रिशंकू विधानसभा’ म्हणतात.संमिश्र सरकारात वाटाघाटी
करणे,तडजोड करणे व सामायिक निर्णय घेणे गोष्टी असतात.