9TH SS 12.WATER RESOURCES OF KARNATAKA (कर्नाटकातील जलसंपदा)

 

imageedit 2 5880977807

राज्य – कर्नाटक

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान

विभाग – भूगोल 

सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार

प्रकरण – 12. कर्नाटकातील जलसंपदा 

स्वाध्याय

1. खालील रिकाम्या जागा योग्य शब्दानी भरा.

1. कावेरी नदीचा उगम कोडगू
जिल्हयातील तलकावेरी येथे झाला

2.प्रसिद्ध जोग धबधबा हा शरावती
नदीवर आहे.

3. कृष्णराज सागर धरण मंड्या
जिल्हयात आहे.

4. कर्नाटकातील पहिला जलविद्युत निर्मीती
प्रकल्प शिवसमुद्र होय.

5. आलमट्टी धरण कृष्णा नदीवर
बांधण्यात आले आहे.


II. खालील
प्रश्नांची उतरे थोडक्यात लिहा.

1) कर्नाटकातील प्रमुख नद्याची
नावे लिहा

उत्तर –कृष्णा, कावेरी,पेन्नर,पालार,शरावती,काली, गंगावली,नेत्रावती,अघनाशिनी,भीमा,कोयना,तुंगभद्रा, घटप्रभा, मलप्रभा इत्यादी कर्नाटकातील प्रमुख नद्याची नावे आहेत.

2) कृष्णा
नदीची थोडक्यात माहिती लिहा.

उत्तर – कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो. ही नदी
कर्नाटकातून
480 किमी
वाहते.उत्तर कर्नाटकातील सिंचन आणि जलविद्युत निर्मितीमध्ये कृष्णा नदीचा फायदा
होतो.

3) कावेरी
नदीच्या उपनद्याची यादी बनवा.

उत्तर –हेमावती,लोकपावनी,अर्कावती,शिमशा,लक्ष्मणतीर्थ, कपिला, सुवर्णवती आणि भवानी कावेरी नदीच्या उपनद्या आहेत.

4) कर्नाटकातील
पाणी पुरवठ्याच्या स्त्रोतांची नावे लिहा.

उत्तर – विहिरी, कालवे आणि तलाव ही कर्नाटकातील पाणी पुरवठ्याच्या
स्त्रोतांची नावे आहेत.

5) आपल्या
राज्यातील प्रमुख जलविद्युत केंद्राची नावे लिहा.

उत्तर – शिवनसमुद्र, शिमशा (कावेरी नदी)लिंगनमक्की, गिरसप्पा आणि महात्मा गांधी जलविद्युत प्रकल्प (शरावती)
सुपा
, नागझरी,
कद्रा आणि कोडसक्की (काळीनदी) वराही आणि मारीदरी (वराही
नदी) भद्रा
, तुंगभद्रा,
घटप्रभा आणि आलमट्टी (कृष्णानदी) इ. ही आपल्या राज्यातील
प्रमुख जलविद्युत केंद्रे आहेत.


III. जोड्या जुळ्वा :

1) लिंगनमक्की धरण             1) जलविद्युत प्रकल्प


2) गगनचुक्की, भरचुक्की     2) नदी


3) वाणी विलास सागर         3) काळी नदी


4) नागझरी                         4) कावेरी नदी


5) पेन्नार                             5) शरावती

                                            6) मरीकनिवे

उत्तर – 

1) लिंगनमक्की धरण            5) शरावती


2) गगनचुक्की, भरचुक्की     4) कावेरी नदी

3) वाणी विलास सागर         6) मरीकनिवे

4) नागझरी                         3) काळी नदी

5) पेन्नार                             2) नदी

Share with your best friend :)