6vi Marathi 4. Paus (6वी मराठी 4. पाऊस )



 
कर्नाटक राज्य अभ्यासक्रम 
विषय – मराठी 
इयत्ता – सहावी 
प्रश्नोत्तरे 
 
 ezgif.com gif maker%20(7)



 

नवीन शब्दार्थ-

दर्या – समुद्र

दौलत – वैभव

ओणवी – वाकलेली

जलबिंदू – पाण्याचा थेंब

वळचण – घराच्या कौलांच्या आत वळलेली जागा. (जिथे चिमण्या- सारखे छोटे पक्षी सुरक्षित बसू शकतात.)

जलधारा – पावसाच्या धारा

कलिका – कळी

अ. खालील प्रश्नांची उत्तरे लिही.

1. दर्यावरची दौलत कोण लुटून नेत आहे?
उत्तर – दर्यावरची दौलत ढग कोण लुटून नेत आहे

2. मोती केंव्हा ओघळतात ?
उत्तर –वाटेवरती खजिना फुटून पडल्यावर मोती ओघळतात



3. गवताची पाती कशी न्हात आहेत ?
उत्तर –गवताची पाती ओणवी होऊन न्हात आहेत.

4. चिमणी कोठे दडून बसते ?

उत्तर –चिमणी वळचणीत दडून बसते.

5.बाग बहरल्यामुळे काय झाले ?
उत्तर –बाग बहरल्यामुळे पानोपानी नवा तजेला दिसत आहे.

6. गुलाब कलिका कुणाची राणी आहे ?
गुलाब कलिका फुलांची राणी आहे.

आ. असे कविने का म्हटले ते सांग.
1. फुटून खजिना वाटेवरती, ओघळले मोती.
उत्तर –पावसाचे मोत्यासारखे थेंब वाटेवरती पडताना पाहून कवीने फुटून खजिना वाटेवरती, ओघळले मोती असे म्हटले आहे.

2. गवताची तरतरीत पाती, पहा ओणवी होऊनी
उत्तर –पावसाचे थेंब गवताच्या पानावरती पडून भिजली आहेत व पावसाच्या पाण्याने वाकली आहेत हे पाहून कवीने गवताची तरतरीत पाती,पहा ओणवी होऊनी असे म्हटले आहे.

3. डोळे मिटूनी ध्यान कुणाचे, वळचणीत करती.
उत्तर –पावसाच्या पाण्यात भिजू नये यासाठी चिमण्या कौलारुच्या आड लपून बसल्या आहेत हे पाहून कवीने डोळे मिटूनी ध्यान कुणाचे, वळचणीत करती असे म्हटले आहे.

4. लेवून बसली हिरवा शेला, जणू अंगावरती.
उत्तर –पावसाच्या पाण्याने बागेतील झाडांची पाने हिरवीगार झालेली पाहून लेवून बसली हिरवा शेला,जणू अंगावरती असे कवीने म्हटले आहे.

इ. समानार्थी शब्द लिही.

जल – पाणी 

वारा – वायु,पवन 

ढग – मेघ

पाखरे – पक्षी 



 

ई. जोडशब्द बनव

जसे – पानोपानी

कपडा – कपडालत्ता 

जमीन – जमीनजुमला 

धन – धनदौलत 

सोने – सोनेनाणे 

भाजी – भाजीभाकरी 

पाऊस – पाऊसपाणी

उ. खालील ओळींचा अर्थ स्पष्ट कर.

1. हासू खेळू नाचू यारे, भिजू पावसामध्ये सारे। 

फुलाप्रमाणे झेलून घेऊ, जलबिंदू हाती ।।

उत्तर –झिम झिम पडणारा पाऊस पाहून वरील ओळीतून कवी आपल्या मित्रांना सांगत आहे कि,सरसर पडणाऱ्या पावसात सर्वजण हसत खेळत नाचूया व भिजूया आणि पावसाच्या थेंबाना फुलाप्रमाणे हातात झेलुया.


 
ऊ. खालील अर्थाचे कवितेत आलेले शब्द लिही.

पाने – पाते 


कळी – कलिका 

अंघोळ – न्हाती 

पुष्प – फुल 

लपणे – दडणे

खग – पक्षी 


Join WhatsApp Channel Join Now
Telegram Group Join Now
Share with your best friend :)