पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
इयत्ता – 4थी
विषय – गणित
गुण – 10
1-साध्या आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ
पाठ आधारित मूल्यमापन नमुना प्रश्नपत्रिका
प्रकरण – 1 साध्या आकृत्यांची परिमिती आणि क्षेत्रफळ
प्रश्नपत्रिकेचा आराखडा
| ज्ञान पातळी (Cognitive Level) | गुण | काठिण्य पातळी (Difficulty Level) | गुण |
|---|---|---|---|
| ज्ञान (Knowledge) | 4.5 (45%) | सोपे (Easy) | 4.5 (45%) |
| आकलन (Understanding) | 3.5 (35%) | साधारण (Average) | 3.5 (35%) |
| उपयोजन (Application) / कौशल्य (Skill) | 2 (20%) | कठीण (Difficult) | 2 (20%) |
| एकूण (Total) | 10 | एकूण (Total) | 10 |
I. योग्य उत्तर निवडून लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
1. (प्रकरण 1.1 – परिमिती) एखाद्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजेच काय? (सोपे)
अ) क्षेत्रफळ
ब) बाजू
क) परिमिती
ड) लांबी
2. (प्रकरण 1.1 – परिमिती) या चौरसाची एका बाजूची लांबी 6 सेंटीमीटर आहे, जर सर्व बाजू समान असतील तर या आकृतीची परिमिती सांगा.
(सोपे)
अ) 24cm
ब) 36cm
क) 12cm
ड) 6cm
(प्रत्येकी 0.5 गुण)
3. (प्रकरण 1.2 – क्षेत्रफळ) एखाद्या आकृतीने व्यापलेली जागा म्हणजेच काय? (सोपे)
अ) क्षेत्रफळ
ब) परिमिती
क) रुंदी
ड) लांबी
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. (प्रत्येकी 1 गुण)
4. (प्रकरण 1.1 – परिमिती) परिमिती म्हणजे काय? (साधारण)
5. (प्रकरण 1.2 – क्षेत्रफळ) क्षेत्रफळ म्हणजे काय? (साधारण)
6. (प्रकरण 1.1 – परिमिती) चौरसाची परिमिती काढण्याचे सूत्र लिहा. (साधारण)
III. खालील आकृत्यांची परिमिती शोधा. (प्रत्येकी 2 गुण)
7. (प्रकरण 1.1 – परिमिती) खालील आकृतीची परिमिती काढा. (सोपे)
(प्रत्येकी 0.5 गुण)
8. (प्रकरण 1.1 – परिमिती) या त्रिकोणाची परिमिती किती आहे? (सोपे)
IV. खालील समस्या सोडवा. (2 गुण)
9. (प्रकरण 1.2 – क्षेत्रफळ) एका आयताकार जमिनीची लांबी 100 मीटर आणि रुंदी 30 मीटर आहे तर त्या जमिनीचे क्षेत्रफळ काढा. (कठीण)
10. (प्रकरण 1.1 – परिमिती) सुमा आणि उमा 10 मीटर लांबी आणि 9 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेला 5 फेऱ्या मारतात तर प्रत्येक दिवशी त्या किती अंतर चालतात? (कठीण)
तोंडी परीक्षेसाठी महत्त्वाचे प्रश्न
- चौरसाला किती बाजू असतात?
- त्रिकोणाला किती बाजू असतात?
- आयत म्हणजे काय?
- परिमितीचा उपयोग कुठे होतो?
- क्षेत्रफळ कशासाठी मोजतात?
- एका मीटरमध्ये किती सेंटीमीटर असतात?
- एका चौरसाची बाजू 5 सेमी असेल, तर त्याची परिमिती किती?
- घनाकृती (Cube) म्हणजे काय?
- घन (Cube) आणि घनायत (Cuboid) यांच्यात काय फरक आहे?
- तुमच्या वर्गाचा दरवाजा कोणत्या आकाराचा आहे?




