The Karnataka School Annual Assessment Time Table 2023-24 Revealed!
वार्षिक मूल्यमापन प्रक्रिया प्रक्रिया वेळापत्रक 2023- 24
इयता – 6 वी ते 8 वी
2023-24 या शैक्षणिक वर्षात कर्नाटक राज्य अभ्यासक्रमाच्या शाळांमधील इयत्ता 1 ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाच्या संदर्भात, संदर्भ-1 ने वार्षिक शैक्षणिक नुसार शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकवणे आणि मूल्यमापन संदर्भात कार्यसूची व मार्गदर्शक तत्त्वे प्रकाशित करण्यात आली आहेत.
1. राज्यातील शासकीय,अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 29/05/2023 पासून शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये, कलिका चेतरिके उपक्रम राबवून अध्ययनातील कमतरता भरून काढण्याचा प्रयत्न करून संदर्भ पत्र – 2 नुसार सेतुबंध कार्यक्रम जून महिन्यात आयोजित करण्यात आला होता.इयत्ता 1 ते 5 च्या कृती पुस्तिका सेतुबंध साहित्याचा समावेश करण्यात आला आहे आणि इयत्ता 6 ते 10 च्या वर्गासाठी सेतुबंध साहित्य तयार करून DSERT वेबसाइटवर प्रकाशित करण्यात आले आहे.
2. संदर्भ-1 नुसार शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये वार्षिक पाठ नियोजन करून विद्यार्थ्यांचे रूपनात्मक मूल्यांकन आणि संकलित मूल्यांकन आयोजित करून विद्यार्थ्यांच्या अध्ययन प्रगतीचे दाखलीकरण करणे.
2023-2024 या शैक्षणिक वर्षात सेतुबंध कार्यक्रम,रूपनात्मक मूल्यांकन आणि संकलित मूल्यांकन आयोजित करण्याचे वेळापत्रक दिले आहे. या वेळापत्रकानुसार शाळा स्तरावर विहित मुदतीत प्रक्रिया पूर्ण करणे.
6 वी ते 8 वी साठी
मुल्यांकन वेळापत्रक –
विवरण | गुण | कृती घेण्याचा कालावधी |
सेतुबंधसेतुबंध शिक्षणाचा मूळ उद्देश जून महिन्यातील पहिले 15 दिवस सेतुबंध शिक्षण आयोजित करून साफल्य परीक्षेवर आधारित शैक्षणिक | – | जून 2023 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 1 –इयत्ता 6वी ते 8वी वर्गांसाठी विषयानुसार प्रारंभी 25 टक्के अभ्यासक्रम FA–1 साठी घ्यावा. या कालावधीत झालेल्या घटक परीक्षा,केलेले गृहपाठ,कृती,प्रकल्प आणि इतर लेखी व तोंडी | 10 | जुलै |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 2 –इयत्ता 6वी ते 8वी वर्गांसाठी विषयानुसार FA–1 नंतरचा या कालावधीत झालेल्या घटक परीक्षा,केलेले गृहपाठ,कृती,प्रकल्प आणि इतर लेखी व तोंडी | 10 | सप्टेंबर |
संकलनात्मक मूल्यमापन (SA) –1संबंधित इयत्तांना निर्धारित 50% इतका अभ्यासक्रम SA-1 साठी घ्यावा. 40 गुण (लेखी परीक्षा ) + 10 गुण (तोंडी परीक्षा)= 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 30 गुणांमध्ये | 30 | ऑक्टोबर |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 3– 6वी व 7वी वर्गांसाठी विषयानुसार FA-2 नंतरचा 30 टक्के अभ्यासक्रम FA-3 साठी घ्यावा. 8वी वर्गांसाठी विषयानुसार FA-2 नंतरचा 40 टक्के अभ्यासक्रम FA-3 साठी घ्यावा. या कालावधीत झालेल्या घटक परीक्षा,केलेले गृहपाठ,कृती,प्रकल्प आणि इतर लेखी व तोंडी परीक्षा आधारित प्राप्त केलेल्या अध्ययन निष्पत्ती यांचे एकत्रीकरण करून एकूण 10 गुणात रुपांतर करणे. | 10 | डिसेंबर 2023 |
रुपणात्मक मूल्यमापन (FA) 4 – | 10 | फेब्रुवारी 2024 |
संकलनात्मक मूल्यमापन (SA) –2संबंधित इयत्तांना निर्धारित 50% इतका अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा. 40 गुण (लेखी परीक्षा ) + 100 गुण (तोंडी परीक्षा)= 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 30 गुणांमध्ये रुपांतर करणे. इंग्रजी भाषा परीक्षा –10 गुण लेखी परीक्षा + 40 गुण तोंडी परीक्षा) = 50 गुणांची परीक्षा घेऊन त्याचे 20 गुणांमध्ये रुपांतर करणे. SA-1 साठी निर्धारित केलेल्या 50% अभ्यासक्रमानंतरचा उरलेला 50% अभ्यासक्रम SA-2 साठी घ्यावा. | 30 | मार्च 2024 |
वार्षिक निकाल | एकूण 100 गुण | दि. 08/04/2023 रोजी समुदायदत्त शाळा कार्यक्रमात निकाल जाहीर |