6th SS 8.LOCAL ADMINISTRATION 8.स्थानिक प्रशासन

 

  

 

  इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2023 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 8 – स्थानिक प्रशासन

अभ्यास



 

नवीन शब्द.

सबलीकरण –दुर्बलांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे.

आरक्षण – ठराविक वर्गासाठी काही जागा आरक्षित ठेवणे.

अनुदान – ठराविक कार्यासाठी सरकारकडून मिळणारी रक्कम.

नैसर्गिक आपत्ती – महापूर, वादळ, अग्नी संकट, भूकंप इत्यादी संकटे.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. स्वयं प्रशासन पध्दतीची मुख्य उद्दिष्टे कोणती?

उत्तर – स्वयं प्रशासन पध्दतीची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे –

1. गावामध्ये स्वयं प्रशासन स्थापित करणे.

2.पंचायतीमध्ये आरक्षणाद्वारे अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, मागासवर्गिय आणि महिलांचे सबलीकरण करणे.

3.स्थानिकांकडूनच विकास कार्याची अंमलबजावणी करणे.

4.अधिकारांची वाटणी करुन प्रशासनात क्रियाशिलता आणणे.

2. ग्रामसभेचे सदस्य कोण असतात ?

उत्तर – पंचायत हद्दीत राहणारे 18 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या सर्व व्यक्ती ग्रामसभेचे सदस्य असतात.

3. पंचायतीमध्ये कोणकोणत्या वर्गाना आरक्षण दिलेले असते ?

उत्तर – पंचायतीमध्ये अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST),इतर मागास समुदाय आणि महिलांसाठी आरक्षण असते.

4. जिल्हा पंचायतीचे महसूलाचे स्त्रोत कोणते ?

उत्तर –
जिल्हा पंचायतीचे महसूलाचे स्रोत खालीलप्रमाणे आहेत.

अ) जिल्हा विकास कार्यक्रमासाठी सरकारने दिलेली अनुदाने आणि कर्ज

ब) कर, भाडे आणि सेवाशुल्काद्वारे जमा केलेले उत्पन्न



 

5. आपल्या राज्यातील महानगरपालिका असणारी शहरे कोणती ?

उत्तर – आपल्या राज्यातील खालील शहरात महानगरपालिका आहे.

1.बंगलोर महानगरपालिका

2.बेळगाव महानगरपालिका

3.बळ्ळारी महानगरपालिका

4.दावणगिरी

5.हुबळी- धारवाड

6.मंगलोर

7.म्हैसूर

8.कलबुर्गी

9.शिमोगा

10.तुमकूर

11.विजापूर

6. महानगरपालिकेच्या महसूलाचे स्त्रोत कोणते आहेत ? नांवे लिहा.

उत्तर – महानगरपालिकेच्या महसूलाचे स्त्रोत खालीलप्रमाणे

1.राज्यसरकारकडून मिळणारे अनुदान हे नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे.

2. मालमत्ता कर भिक्षुकांवरील कर, आरोग्य कर, शिक्षण कर, वाचनालय कर, अग्नी कर, तसेच इतर कर आणि भाडे इत्यादीवरील कर महसूलाचे स्त्रोत आहेत.




Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *