इयत्ता – सहावी
विषय – मराठी
पाठावरील प्रश्नोत्तरे
3. निसर्गातील चमत्कार : वीज
प्र. 1. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिही.
1.आकाशात चमकणारी वीज कोणत्या वळणाची असते?
उत्तर – आकाशात चमकणारी वीज नागमोडी वळणाची असते.
2. ढग कशापासून तयार होतात?
उत्तर – ढग वाफेपासून तयार होतात
3. नेहमी एकमेकाकडे आकर्षिले जाणारे विद्युतभार कोणते?
उत्तर – धन विद्युतभार आणि ऋण विद्युतभार हे नेहमी एकमेकाकडे आकर्षिले जाणारे विद्युतभार आहेत.
5. ढगामधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह किती रूंद असतो?
उत्तर – ढगामधील इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह साधारणपणे 1 ते 4 इंच रूंद असतो.
प्र. 2. खालील प्रश्नांची 2-3 वाक्यात उत्तरे लिही.
1. वीजकशी निर्माण होते ?
उत्तर –वीज निर्माण होताना सर्वप्रथम वाफेपासून तयार झालेले ढग जसजसे आकाराने व वजनाने वाढतात. तसतसा ढगांच्या वरच्या भागावर धन
विद्युतभार तर खालच्या भागावर ऋण विद्युतभार तयार होतो. त्यामुळे ढगांवरच्या विद्युतभारात आणि पृथ्वीवरच्या विद्युतभारात आकर्षण होते व वीज निर्माण होते.
2. विजेचे प्रकार किती व कोणते ?
उत्तर – विजेचे प्रकार 5 आहेत ते खालीलप्रमाणे –
1.रिबन लाईटनिंग (फीत विद्युत)
2.फोर्कड् लाईटनिंग
3.कार्पेट लाईटनिंग
4.बॉल लाईटनिंग
5.सेंट एल्मोची आग
3. वीज कोणकोणत्या रंगात दिसते ?
उत्तर – वीज तांबड्या,हिरव्या,पोपटी,पिवळ्या,निळ्या रंगात दिसते.
4. वीज वेगवेगळ्या रंगात दिसण्याचे कारण कोणते ?
उत्तर – विजा रंगीत दिसण्याचे कारण म्हणजे वातावरणात अनेक वायू असतात.या वायूमध्ये विद्युतप्रवाहाचं विसर्जन झाल्यामुळे त्या त्या वायूच्या गुणधर्माप्रमाणे त्यांचे अणू चमकायला लागतात आणि आपल्याला रंगीत विजा दिसतात.
5.विजेचे वहन कसे होते?त्याचा परिणाम काय होतो ?
उत्तर – विजेचे वहन विद्युत पट्ट्यात होत असते. हे वहन होताना सुवाहक गोष्टीकडे खेचली जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे या मार्गात आडव्या येणाऱ्या गोष्टींना तडाखा बसण्यात होतो.
6. वीज जास्तीत जास्त कोठे आकर्षिली जाते ?
उत्तर – वीज जास्तीत जास्त पाणी,सर्वात उंच वस्तू,धातूची वस्तू,तसेच ज्या गोष्टी जमिनीचा पृष्ठभाग खूप मोठ्या प्रमाणात
व्यापतात त्याकडे,काळ्या किंवा भडक रंगाकडे आकर्षिली जाते.
7. विजेबद्दलच्या गैरसमजूती कोणत्या ?
उत्तर – वीज फक्त पावसाळ्यातच चमकते,वीज आकाशातूनच खाली येते,वाळवंटात वीज पडत नाही, एकाच ठिकाणी वीज पुन्हा पुन्हा पडत नाही,विजेचा तडाखा बसल्यानंतर कोणी जिवंत रहात नाही. अशा विजेबद्दलच्या गैरसमजूती आहेत.
8. तूम्ही पाहिलेल्या विजेचे वर्णन कर.
उत्तर –
9. विजेपासूनची सावधानता तुम्ही कशी बाळगाल ?
उत्तर – विजेच्या वेळी टेलिफोन,संगणक,मोबाईल ,इंटरनेट यासारख्या सेवा वापरणे टाळावे. कोणत्याही धातूच्या वस्तूजवळ उभे राहू नये.
विजेच्या वेळी पाण्यात असल्यास त्वरित बाहेर यावे. वीज पडत असताना उंच झाडे डोंगर टेकड्या यांचा आश्रय घेणे टाळावे.