इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – समाज शास्त्र
सुधारित २०२२ पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 3 भारतीय समाज सुधारक
I. योग्य शब्दांसह रिक्त जागा भरा:
1. शंकराचार्यांचा जन्म केरळमधील कलाडी येथे झाला.
2. “जग हे मिथ्या आणि ब्रम्ह हे सत्य” असे प्रतिपादन शंकराचार्यांनी केले.
3. रामानुजाचार्यांच्या शिष्यांना श्रीवैष्णव म्हणतात.
4. द्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते माध्वाचार्य आहेत.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
5. अद्वैत तत्वज्ञानाचा पुरस्कर्ता कोण आहे.
उत्तर – अद्वैत तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते शंकराचार्य आहेत.
6. रामानुजाचार्यांनी कोणता सिद्धांत मांडला?त्यांच्या धर्माला काय म्हणतात ?
उत्तर –रामानुजाचार्य यांनी विशिष्टाद्वैताच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केला आणि त्यांच्या धर्माला ‘श्रीवैष्णव’ म्हणतात.
7. रामानुजाचार्य यांनी रचलेल्या ग्रंथांची नावे लिहा.
उत्तर –रामानुजाचार्य यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये वेदांत संग्रह, वेदांतसार, वेदांत दीपिका, श्रीभाष्य आणि गीताभाष्य यांचा समावेश आहे.
8. मध्वाचार्यांनी कोणते सिद्धांत मांडले आहेत?
उत्तर – मध्वाचार्यांनी सांगितलेल्या तत्त्वांमध्ये द्वैत तत्त्वज्ञान,मानवी आत्मा आणि दैवी आत्मा यांच्या स्वतंत्र अस्तित्वावरील विश्वास आणि मोक्षप्राप्तीचे साधन म्हणून भगवान विष्णूची उपासना यांचा समावेश होतो.
9. बसवेश्वरानी सांगीतलेल्या ‘कायकवे कैलास’ या तत्वाबद्दल माहिती लिहा.
उत्तर – बसवण्णांचे “काम हीच पूजा” तत्त्वज्ञान कामाचे महत्त्व, श्रमाची प्रतिष्ठा वाढवण्याचे महत्व सांगते.
10. अनुभव मंटपची स्थापना कोणी केली? त्याचा उद्देश काय होता.
उत्तर – बसवेश्वर यांनी बसवकल्याण येथे अनुभव मंटपची स्थापना केली.शिवशरणानी भेदभाव न करता एकत्र येऊन सामाजिक,आर्थिक आणि धार्मिक समस्यांवर चर्चा करणे आणि स्त्रियांसाठी समानता,स्वातंत्र्य आणि वचनांच्या माध्यमातून विचारांचा प्रसार करणे हे त्याचे उद्दिष्ट होते.
11. शंकराचार्यांनी रचलेल्या ग्रंथांची नावे लिहा.
उत्तर –शंकरभाष्य,आनंदलहरी, सौंदर्यलहरी,शिवानंदलहरी, विवेकचुडामणी, प्रबुद्ध सुधाकर आणि दक्षिणमूर्ती स्तोत्र ही शंकराचार्यांनी रचलेल्या ग्रंथांची नावे आहेत.
12. वचन चळवळीच्या प्रसारात बसवेश्वरांच्या सोबत अनुयायी कोण होते?
उत्तर –वचन चळवळीच्या प्रसारात बसवेश्वरांच्या सोबत अनुयायी होते त्यापैकी अंबिगर चौडय्या, मडीवाळ माचय्या, मदारा चिन्नय्या, समगार हरळय्या, किन्नरी बोम्मय्या इत्यादी मुख्य अनुयायी होते.