8th Marathi 4.Sukhachi Chav 4. सुखाची चव

 

इयत्ता – आठवी 

विषय – मराठी 

पाठावरील प्रश्नोत्तरे 

4. सुखाची चव

Untitled%20presentation%20(6)


                 अरुणा ढेरे



लेखिका परिचय :-


डॉ. अरुणा रामचंद्र ढेरे (जन्म 1957) कविता, कथा, कादंबरी ललित गद्य, समीक्षा, संशोधन असे विविध प्रकारचे लेखन. उर्वशी‘ ‘मैत्रेयी‘, ‘महाद्वारइ. कादंबऱ्या. मंत्राक्षर‘, ‘यक्षरात्र‘, ‘निरंजनइ. कविता संग्रह. रुपोत्सव‘, ‘लावण्य यात्रा‘,’मनातलं आभाळ इ. ललित गद्य संग्रह प्रसिद्ध
आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनाचे अध्यक्ष
त्यानी भूषविले.
           सुट्टीत मुलाना खेळायला आवडते. अनेक गमती-जमती करायला मिळतात. त्यामुळे मुलांना सुट्टी आवडते. लेखिकेला बालपणी आवडीच्या अनेक गोष्टी सुट्टीत मिळायच्या त्यासाठी त्या सुट्टीची वाट पाहायच्या, पण अनेक बाबतीत वाट पाहणे सुद्धा आनंदाचे, जिज्ञासेचे, कुतुहलाचे असते. याचे चित्रण या ललित लेखात आले आहे.

                          (मूल्य-संयम)


शब्दार्थ –
मोहोरआंब्याची फुले
टक्क उघडणेपूर्ण जागे होणे.
सार्थक सफल
हजारी मोगराबत्तीस मोगरा,अनेक फुले एकत्र असलेल्या मोगऱ्याच्या फुलाचा प्रकार
शनिवार वाडा पुण्यातील पेशव्यांचा वाडा
वाळाएक प्रकारचे सुगंधी वाळलेले गवत.
कैरीची डाळ – कच्च्या आंब्याचे खिसून डाळीत केलेले मिश्रण
चाहूलयेत असल्याची जाणीव

प्रतिभा कला निर्मिती करण्याची शक्ती.

पन्हं – कच्च्या कैरी पासून केलेले पेय.
अनिच्छेने इच्छा नसताना
तृप्तीसमाधान
पोस्टमन इन द माऊंटन डोंगराळ भागातील पोस्टमन (टपाल वाटणारा)

                                    एका चिनी चित्रपटाचे नाव
कुहू – कोकिळेचे ओरडणे



स्वाध्याय

प्र 1. खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा.

1. थंडी केव्हा कमी होत जायची ?
उत्तर – होळीनंतर थंडी कमी होत जायची.
2.
पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ कोणता?
उत्तर –उन्हाळ्याच्या आधीचा काळ म्हणजे पुस्तक वाचण्याची वाट पाहण्याचा काळ होय.
3.
लेखिकेने कोणता चिनी चित्रपट पाहिला ?
उत्तर –लेखिकेने पोस्टमन इन द माऊंटन हा चिनी चित्रपट पाहिला.
4.
पोस्टमनने कोणाला पत्र वाचून दाखविले?
उत्तर –पोस्टमनने म्हातारीला पत्र वाचून दाखविले

प्र. 2 खालील प्रश्नांची उत्तरे दोन तीन वाक्यात लिहा.

.सुट्टीच्या आधीचा काळ भारावलेला का असतो?
उत्तर –सुट्टीच्या आधीचा काळ खूप वाट बघण्याचा असतो.कारण कधी एकदा सुट्टी पडेल याची खूप आतुरता असते त्यामुळे भारावलेला असतो .
.वाट पाहण्यात कोणकोणत्या गोष्टी असतात?
उत्तर –वाट पाहण्यात दुःख ,काळजी ,भिती,अस्वस्थता,तडफड अशा गोष्टी असतात .
.पोस्टमन कोरे पत्र का वाचत असे?
उत्तर –कारण म्हातारी आंधळी होती.तसेच तिचे शेवटचे दिवस होते.त्यामुळे तिथे शेवटचे दिवस समाधानात जावे म्हणून पोस्टमन कोरे पत्र वाचत असे .

प्र. 3 खालील प्रश्नांची प्रत्येकी चार-पाच वाक्यात लिहा

.लेखिका सुट्टीची वाट का पाहत असे?
उत्तर –कारण लेखिकेला अंगणातलं मोगऱ्याचे झाड,सकाळची ताजी फुलं,माठातलं पाणी, कैरीची डाळ आणि पन्हं,कधीमधी चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे असं बरंच काही सुट्टीत मिळत असे म्हणून लेखिका सुट्टीची वाट पहात असे.
.वाट पाहत असताना आपण कोणकोणत्या गोष्टी शिकतो?
उत्तर –वाट पाहत असताना आपण संयम शिकतो तसेच धीर धरायला,एखाद्या गोष्टीवर विश्वास घट्ट करायला शिकतो ,तसेच ध्यास वाढतो अशा बऱ्याच गोष्टी शिकतो .
प्र.4 संदर्भासह स्पष्टीकरण करा.
.जे सुचलं ,जे लिहावसं वाटलं ते कसं लिहू शकली ही माणसं
संदर्भवरील वाक्य सुखाची चव या पाठातील असून या पाठाचे लेखिका अरुणा ढेरे आहेत.
स्पष्टीकरण लेखिकेला गोष्टी,गोष्टीतील पात्र,संवाद,तो,इतिहास ती गाणी गाण्यातील सूर ताल याचे आश्चर्य वाटले तेंव्हा त्यांच्या या कार्याला उद्देशून लेखिकेने वरील वाक्य म्हटले आहे.



प्र.4 खालील प्रश्नाचे उत्तर सातआठ वाक्यात लिहा.

.सुखाची चव कशी वाढेल?
उत्तर –एखाद्या गोष्टीची वाट पाहणं हे सहज मनात येत जर आपणाला एक गोष्ट मिळणार असेल तर आम्ही त्या गोष्टीची खूप आतुरता असते पण वाटत की जे हवं ते सहज हाती येऊन नये थोडी वाट पाहायला मागं लागावी थोडी तडफड भोगावी लागावी हे सगळं झाल्यावर जी गोष्ट आपणास हवी ती मिळाल्यावर जो आपल्यात आनंद बाहेर पडतो तेव्हा तर सुखाची चव वाढेल .

प्र.5 जोड्या जुळवा.

उत्तर –
 1.कोकिळा -कुहू कुहू
2.चिनी सिनेमा -पोस्टमन इन द माउंटन
3.पोस्टमन -म्हातारीला पत्र
4.संतांचे अभंग – करूणेचा स्पर्श

प्र.6 पुढील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वे लागणे – खूळ लागणे
वारकऱ्यांना विठ्ठल भक्तीचे वेड लागले.

 

सार्थक होणे -सफल होणे
दिनेशने परीक्षेत यश मिळवून आई वडिलांच्या कष्टाचे सार्थक केले.

 

थक्क होणे – आश्चर्य वाटणे,चकित होणे
माझा भाऊ नवीन कुत्रा बघून थक्क झाला.

मोल समजणे –किंमत कळणे
माणसाला पटकन काही दिल्यावर त्याचे मोल समजत नाही.





 

Share with your best friend :)