इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
विभाग – भूगोल
सुधारित २०२4 पाठ्यपुस्तकानुसार
प्रकरण – 10. आपले राज्य कर्नाटक प्राकृतिक विभाग
खालील रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. दरवर्षी आपण कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर या दिवशी साजरा करतो.
2. कर्नाटक हे नांव 1973 साली आपल्या राज्याला प्राप्त झाले.
3. कर्नाटकांच्या पुर्वेला आंध्र प्रदेश हे राज्य आहे.
4. आकाराने सर्वात मोठा बेळगावी हा जिल्हा आहे.
5. कर्नाटकाचे क्षेत्रफळ 1,91,791 चौ कि.मी. आहे.
6. सेंट मेरी हे बेट माल्पेजवळ आहे.
7.पश्चिम घाटाला सहयाद्री म्हटले जाते.
8. आगुंबे घाट शिवमोग्गा व उडुपी यांना जोडतो.
9. कोडगु या जिल्ह्याला कर्नाटकाचे काश्मीर म्हणून ओळखले जाते.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. कर्नाटकाचा अक्षांश आणि रेखांश विस्तार सांगा?
उत्तर – कर्नाटकचा अक्षांशाचा विस्तार अंदाजे 11°30′N ते 18°30′N आहे आणि रेखांशाचा विस्तार अंदाजे 74°E ते 78°30′E आहे.
2. आपल्या शेजारील राज्यांची नांवे सांगा?
उत्तर –कर्नाटकच्या शेजारची राज्ये महाराष्ट्र, गोवा, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा आहेत.
3. कर्नाटकाचे राज्य व्यवस्थापनासाठी पाडलेले चार भाग कोणते?
कर्नाटकाचे राज्य व्यवस्थापनासाठी पाडलेले चार भाग- बेंगळुरू,बेळगावी,कलबुर्गी आणि म्हैसूर हे आहेत.
4.कर्नाटक हे भारताच्या कोणत्या भागात आहे?
उत्तर – भौगोलिकदृष्ट्या कर्नाटक भारताच्या नैऋत्य भागात स्थित आहे. याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस महाराष्ट्र, पूर्वेस आंध्र प्रदेश आणि दक्षिणेस तामिळनाडू व केरळ आहे.
5. कर्नाटकाचे प्रमुख स्वाभाविक विभाग लिहा.
उत्तर -किनारपट्टीचा प्रदेश,मलनाडू प्रदेश, पठारी प्रदेश हे कर्नाटकचे प्रमुख स्वाभाविक विभाग आहेत.
6. मलनाडु प्रदेशाची वैशिष्ट्ये लिहा.
उत्तर – डोंगराळ प्रदेश, घनदाट जंगले आणि मुसळधार पाऊस ही कर्नाटकातील मलनाड प्रदेशाची वैशिष्ट्ये आहेत.हा प्रदेश निसर्गरम्य सौंदर्य,धबधबे आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखला जातो.
7. कर्नाटकाच्या किनारपट्टी मैदानाची माहिती लिहा.
उत्तर – कर्नाटकातील किनारी मैदाने अरबी समुद्राच्या किनाऱ्याजवळ आहेत.ते सुपीक गाळाची माती, खारफुटीची जंगले आणि वालुकामय किनारे या वैशिष्ट्यांनी नटलेली आहेत.मंगळूर आणि कारवार सारखी प्रमुख शहरे याच प्रदेशात आहेत.
8. दक्षिण कर्नाटकातील प्रमुख टेकड्यांची नांवे लिहा.
उत्तर – दक्षिण कर्नाटकातील प्रमुख टेकड्या म्हणजे बेळगिरीरंगन टेकड्या,महादेश्वर टेकड्या आणि चामुंडी टेकड्या इत्यादी.
9. पश्चिम घाटातील घाटमार्गांचा उल्लेख करा.
उत्तर – पश्चिम घाटातील घाटमार्गांमध्ये आगुंबे घाट,चारमडी घाट,शिराडी घाट आणि हुलिकल घाट यांचा समावेश होतो.
III. जोड्या जुळवा
अ ब
I. जोग फॉल्स a) मंगळूर
II. ओमबीच b) उत्तरेकडील पठार
III. नंदीटेकडया c) शरावती नदी
IV. एकशिळा टेकडी (d) गोकर्ण
V. उष्ण प्रदेश e) चिक्कबळ्ळापूर
f) मधुगिरी
उत्तर –
I. जोग फॉल्स c) शरावती नदी
II. ओमबीच d) गोकर्ण
III. नंदीटेकडया e) चिक्कबळ्ळापूर
IV. एकशिळा टेकडी f) मधुगिरी
V. उष्ण प्रदेश b) उत्तरेकडील पठार
9वी समाज विज्ञान सर्व पाठांवरील प्रश्नोत्तरांसाठी येथे स्पर्श करा..
2. 9 ते 14व्या शतकातील भारत
https://www.smartguruji.in/2023/06/9th-ss-29-14.html
1. पाश्चात्त्य धर्म
https://www.smartguruji.in/2023/06/9th-ss-1western-religions.html
➖➖➖➖➖➖
इयत्ता- 9वीविषय – विज्ञान
Class- 9Sub – English (TL)
इयत्ता- 8वी
विषय – समाज विज्ञान
❇️प्रश्नोत्तरे❇️ विभाग – भूगोल
21.पृथ्वी- आपला सजीवांचा ग्रह
https://www.smartguruji.in/2023/07/8th%20SS%2021%20Earth%20is%20our%20living%20planet.html
⚜️विभाग – इतिहास⚜️
2.भारत वर्ष
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-2-bharatavarsh-2.html
➖➖➖➖➖➖➖➖➖
1.साधने
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-1-sadhane-1.html
➖➖➖➖➖➖
राज्यशास्त्र
13. राज्यशास्त्राचा अर्थ व महत्त्व
https://www.smartguruji.in/2022/06/8th-ss-13-meaning-and-importance-of.html
शेअर करा