इयत्ता – 1ली ते 3री
प्रस्तुती – समग्र शिक्षण कर्नाटक,बेंगळूरू
विद्याप्रवेश संबंधी महत्वाची माहिती –
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या आशयानुसार विद्याप्रवेश या उपक्रमाची निर्मिती झाली असली तरी संपूर्ण देशाचे लक्ष वेधणारी ही शालेय पूर्वतयारी योजना आहे.
‘विद्याप्रवेश’ हा उपक्रम ‘खेळत खेळत शिक’ या तत्वावर आधारित आहे.
इयत्ता पहिली ते तिसरीसाठी ‘विद्याप्रवेश’ हा उपक्रम असेल.
कालावधी – 72 दिवस किंवा 12 आठवडे
दिनांक ३0 ऑगस्ट २०२२ पर्यंत विद्याप्रवेश उपक्रमाचे 72 दिवस किंवा 12 आठवडे हा कालावधी संपत आहे..आता प्रश्न पडला असेल विद्याप्रवेश संबंधी कोणती कागदपत्रे ठेवावी…त्याबद्दल थोडक्यात परिपूर्ण माहित्री देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
विद्या प्रवेशाच्या सराव पुस्तकात दिनांकानुसार शिक्षकाची सही होणे आवश्यक आहे.
प्रत्येक विद्यार्थ्याची विद्यार्थी कृती संचयी (CHILD PROFILE) असल्यास त्यामध्ये विद्याप्रवेश कृती पुस्तिका या शैक्षणिक वर्षापर्यंत विद्याप्रवेश संबंधी नोंद म्हणून सुरक्षितपणे ठेवावे.
सर्व मुलांचे विद्या प्रवेश कृती पुस्तकामध्ये दिलेल्या सराव कृती विद्यार्थ्यांनी पूर्ण केल्या आहेत का याची खात्री करणे व तारखेनुसार शिक्षक स्वाक्षरी करावी.
तसेच मासिक मूल्यमापन नमुन्यावर पालकांची सही,मुख्याध्यापक सही घेणे जेणेकरून विद्याप्रवेश म्हणजे कलिका चेतरिके उपक्रमाचा एक भाग आहे याची माहिती होईल.
विद्याप्रवेश संबंधी शिक्षकांनी नोंदी कशा ठेवाव्यात?
प्रथम शिक्षकांच्या रजा आणि शाळेच्या सुट्ट्यांची नोंद करणे.
प्रत्येक दिवसाच्या अभ्यास कृतीमध्ये तारीख नमूद करणे व विद्यार्थ्याने त्या तारखेची कृती अचूक सोडवली आहे का याची खात्री करणे.
माझी प्रगती – प्रत्येक विद्यार्थ्याच्या कृतीपुस्तिकेत पृष्ठ क्रमांक 71 ते 73 वरती देण्यात
आलेले माझी प्रगती या नमुन्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती नोंद करणे.
प्रत्येक विद्यार्थी कृतीपुस्तिकेत देण्यात आलेला नमूना
मासिक मूल्यमापन – प्रत्येक विद्यार्थ्याच्या कृतीपुस्तिकेत पृष्ठ क्रमांक 74,75,76,77 वरती देण्यात आलेले मासिक मूल्यमापनाचे नमुने भरून त्यावरती शिक्षक सही,मुख्याध्यापक सही व पालकांची सही असावी व दिनांक नोंद करणे.
प्रत्येक विद्यार्थी कृतीपुस्तिकेत देण्यात आलेला नमूना
वरील सर्व मुद्दे पूर्ण झाल्यानंतर विद्याप्रवेश संबंधीचा पुरावा व शैक्षणिक नोंद म्हणून ही कृतीपुस्तिका विद्यार्थ्यांच्या विद्यार्थी संचयीमध्ये या शैक्षणिक वर्षाच्या शेवटपर्यंत सुरक्षितपणे ठेवणे.
१ सप्टेंबरपासून इयत्ता पहिली ते तिसरी पर्यंत इयत्तांना कलिका चेतरीके उपक्रम सुरु होत आहे..त्याबद्दल सर्वांचे स्वागत…