9th SS 2.9 ते 14व्या शतकातील भारत

9वी समाज विज्ञान 

प्रकरण 2 – 9 ते 14व्या शतकातील भारत

9th SS 2.9 ते 14व्या शतकातील भारत

इयत्ता – नववी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – 2022 सुधारित 

विषय – स्वाध्याय 

I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.

1. प्रतिहाराच्या गुर्जर घराण्याची स्थापना हरिचंद्र यांनी केली.

2. पृथ्वीराज चौहानने महंमद घोरी याला तरायनच्या पहिल्या पराभूत केले.

3. कुतुबुद्दीन ऐबक हा महम्मद घोरीचा सेनापती होता.

4.रझिया सुलतान ही दिल्लीच्या सुलतानदी बसलेली पहिली स्त्री राज्यकर्ती होती.

5. खिलजी घराण्यातील अल्लाउद्दिन खिलजी हा प्रसिद्ध राज्यकर्ता होय.

6. तुघलकांच्या काळात राजधानी दिल्लीचे स्थलांतर देवगिरी येथे केले.

 

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. राजपूतांनी साहित्याच्या क्षेत्रात घातलेली भर याबद्दल थोडक्यात लिहा.

उत्तर – राजपूत राजांनी आपल्या दरबारात विद्वानांना प्रोत्साहन देऊन साहित्य क्षेत्रात खूप योगदान दिले.त्यांनी कवी आणि विद्वानांना संरक्षण दिले,परिणामी जयदेवाचे “गीत गोविंद”, भारवियाचे ‘किरीतार्जुन’, भार्तुहरीचे ‘रावणवध’, चांद बरदाईचे पृथ्वीराज रासो आणि बल्हाळाचे ‘भोजप्रबंध’ यासारख्या महत्त्वपूर्ण साहित्याची निर्मिती झाली.त्यांनी गुजराती, राजस्थानी आणि हिंदी या भाषांच्या विकासातही योगदान दिले.

2. इल्तमशच्या राज्यव्यवस्थेचे वर्णन करा ?

उत्तर – इल्तमशने आपले राज्य अनेक इख्त (प्रांत) मध्ये विभागले होते.त्यावर देखरेख करण्यासाठी इख्तेदारांची नेमणूक केली होती.स्वतःला मदत करण्यासाठी त्यांनी चाळीस गुलांमाची एक समिती नेमली होती.प्रधानमंत्री आणि न्यायाधीश सुलतानाला सल्ला देत असत.अशी त्याची राज्यव्यवस्था होती.

3. अलाऊद्दिन खिलजीच्या राजकिय सुधारणा कोणत्या ?

उत्तर – अल्लाउद्दिन खिलजीने अनेक राजकिय सुधारणा केल्या धार्मिक देणग्या,ईनाम किंवा जमिनी बहाल करण्याची पद्धन त्याने रद्द केली.त्याने गुप्तहेरांची संघटना निमार्ण केली.दारू आणि नशिल्या सेवनावर बंदी घातली आंतरजातिय विवाह, सरदारांच्या सभा,सर्वसामान्यांचे सभा समारंभ यावर बंदी घातली.प्रजेकडून अतिरिक्त कर गोळा करण्याचा हुकूम दिला.

 

4. महमंद बीन तुघकाने केलेल्या राजकिय सुधारणा कोणत्या ?

उत्तर – महमंद बीन तुघकाला आदर्शवादी असे म्हटले जात असे.या काळात त्याने खालील राजकीय सुधारणा केल्या.

साम्राज्याला मिळणाऱ्या सगळ्या जमिन महसुलाची नोंद ठेवण्यासाठी नोंदवही ठेवण्याचे आदेश दिले.

पडिक जमिनी मशागतीखाली आणून कृषी व्यवसायाचा विकास केला.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली.

दो- आब प्रदेशातील जमिनीवर कर वाढविला.

 

5.दिल्लीच्या सुलतानाने कला आणि शिल्पकला क्षेत्रात कोणती भर घातली?

उत्तर – दिल्लीच्या सुलतानाने कला आणि शिल्पकला क्षेत्रात दिलेले योगदान खालीलप्रमाणे-

दिल्लीच्या सुलतानांनी भारतामध्ये ‘इंडो- सिरॅमीक’ (इंडो-इस्लाम) शैलीचा प्रारंभ केला. 

दिल्लीच्या सुलतानांनी किल्ले,महाल सार्वजनिक इमारती,मदरसा,धर्मशाला यांची निर्मिती केली.

दिल्लीची कुवत अल- इस्लाम ही मशिद, कुतुबमिनार,अलाई दरवाजा,जमैन खाना मशिद इत्यादी ही इंडो-इस्लाम शैलीची उदाहरणे आहेत.

 
Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 263

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *