6वी समाज विज्ञान
प्रकरण 1 – भारत आमचा अभिमान
इयत्ता – सहावी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – 2023 सुधारित
विषय – स्वाध्याय
प्रकरण 1 – भारत आमचा अभिमान
तुम्ही जाणून घ्या:
1. वृषभनाथ हे जैन धर्मातील पहिले तिर्थकर आहेत.
2. दुष्यंत शकुंतलेचा वीर पुत्र भरतमुळे भारत म्हणून नांव पडले. अशी प्रचिती आहे.
3. इंग्रजांच्या प्रभावामुळे बौध्दमत, जैनमत आणि शिखमत अनुक्रमे बुद्धीसं, जैनीसं आणि शिखीसं असे झाले.
4. आजच्या भारतापेक्षा अजून मोठा प्रदेश या पूर्वी होता त्याला भारत वर्ष म्हणत असत. दक्षिण समुद्राच्या उत्तरेला आणि हिमालयाच्या दक्षिणेला असलेला भूभाग भारतवर्ष. तेथे वास करणारे लोक भारतीय असे विष्णूपुराणातून आम्हाला समजून येते.
5. म्यानमारला ‘ब्रम्हदेश’, इंडोनेशियामधील जावा, सुमात्रा, बाली यांना ‘सुवर्णद्वीप’, व्हीएतनामला ‘चंपा’ आणि कंबोडियाला ‘कंबुज’ म्हणून ओळखले जात असे.
अभ्यास
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. गणितात भारतीयांचे सर्वात श्रेष्ठ योगदान शून्याचा शोध
2. शाकुंतल संस्कृत ग्रंथाचे इंग्रजीत भाषांतर विल्यम जोन्स यांनी केले.
3. कांबोडीया येथे एक भव्य हिंदू मंदिर आहे.
2.पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा
1. पुराणामध्ये भारताला काय म्हणत असत ?
उत्तर – पुराणामध्ये भारताला जंबुद्वीप भरतखंड भरत वर्ष असे म्हटले जात असे.
2. गणित क्षेत्रामध्ये भारतीयांचे सर्वात श्रेष्ठ योगदान कोणते ?
अंक, दशांश, अपूर्णांक आणि बीजगणित यांचा शोध घेऊन भारतीयांनी गणितात अमूल्य योगदान दिले.शून्याचा अंक म्हणून वापरण्याचे श्रेय भारतीयांना जाते.याशिवाय प्राचीन भारतीय गणित तज्ञांना पायथागोरियन प्रमेय,अणूंची संकल्पना आणि स्टीलचे उत्पादन यांची माहिती होती.
3. आर्यभटाची सर्वात मोठी कामगिरी कोणती ?
उत्तर -आर्यभट्ट या भारतीय खगोलशास्त्रज्ञाने पृथ्वी गोल आहे आणि ती सूर्याभोवती फिरते या शोधांचे श्रेय कोपर्निकसला देण्याच्या शतकांपूर्वी सांगण्याची मोठी कामगिरी केली होती.
4. जगप्रसिद्ध बृहत बौद्ध देवालय कोठे आहे ?
उत्तर – अफगाणिस्तानातील बाम्यान येथे प्रसिद्ध बृहत बुद्ध मंदिर आहे.
5. भारतीय संस्कृतीचा प्रसार झालेल्या आग्नेय आशिया खंडातील तीन देशाची नावे सांगा.
उत्तर – भारतीय संस्कृतीचा प्रसार अफगाणिस्तान, तिबेट, मंगोलिया, चीन, कोरिया, जपान आणि श्रीलंका येथे झाला.
6. कोणतीही दोन भारतीय मूल्ये सांगा ?
उत्तर – दोन भारतीय मूल्ये म्हणजे “आचार्य देवो भव” म्हणजे शिक्षकांना देवांच्या समान मानणे व त्यांचा आदर करणे आणि “सर्व जनः सुखिनो भवन्तु,” म्हणजे सर्व लोकांसाठी सुख समाधानाची इच्छा करणे.