शाळा प्रवेश दिन सूत्रसंचालन,प्रास्ताविक,स्लोगन,आभार प्रदर्शन,फलक लेखन
उन्हाळी सुट्टीनंतर येत्या शैक्षणिक वर्षात मुले शाळेत येतील.सुट्टीमध्ये शाळा आणि अभ्यास यांना थोडी विश्रांती दिलेली मुले आता शाळेत येतील.या मुलांचे व्यवस्थितपणे व उत्साहाने स्वागत करून त्यांना शिक्षण,शाळा,अभ्यास,पुस्तके यांची आवड लागावी यासाठी शाळापूर्व तयारी होणे फार आवश्यक आहे,ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना वाचन-लेखन शिकताना कोणतेही अडथळे येणार नाहीत आणि ते व्यवस्थितपणे शिकू शकतील.यासाठी आपण सर्वांनी मिळून, शाळापूर्व तयारी अभियान महाराष्ट्रभर चालवायचे आहे.या अभियानात गाव पातळीवर मुलांचे पालक, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा आणि स्वयंसेवक (volunteers) यांची मुख्य भूमिका असेल.या कार्यक्रमाची अंमलबजावणी यशस्वी होण्यासाठी श्री. आशिष देशपांडे (सर) यांची निर्मिती असलेली घोषवाक्य PDF,सूत्रसंचालन,आभार प्रदर्शन इत्यादी बरच काही PDF स्वरूपात उपलब्ध करून देत आहोत..