6th SS Textbook Solution 1.2 Mysuru Devision 3.आपले गौरवशाली राज्य कर्नाटक

6वी समाज विज्ञान 

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

विषय – स्वाध्याय 

प्रकरण 3 – आपले गौरवशाली राज्य कर्नाटक

1.दक्षिण कन्नड जिल्ह्याची विभागणी करून 1997 साली उडूपी जिल्ह्याची रचना करण्यात आली.

2.म्हैसूरु विभागात उडुपी आणि दक्षिण कन्नड हे किनारपट्टीचे जिल्हे आहेत.

3.आमचा राष्ट्रीय प्राणी वाघ हा आहे.

4.जंगली हत्तींना पाळण्याच्या पद्धतीला खेड्ड म्हणतात. 

5.म्हैसूरु विभागातील चिक्कमंगळूरू या जिल्ह्यामध्ये जास्त कॉफीचे उत्पादन  घेतले जाते.

6.कोडगू जिल्ह्यातील तलकावेरी येथे कावेरी नदीचा उगम होतो.

7.कुदमल रंगराव यांनी अस्पृश्यता याच्या निवारणासाठी आंदोलन केले.

8.म्हैसूरु येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध उत्सवाचे नाव दसरा हे होय.

9.म्हैसूरु विभागातील उडुपी आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यामध्ये बंदरे आहेत.

खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. म्हैसूरु विभागामध्ये सध्या किती जिल्हे आहेत?

उत्तर – म्हैसूरु विभागामध्ये सध्या 8 जिल्हे आहेत.

2.म्हैसूरु हे नाव येण्याचे कारण सांगा.

उत्तर – ऐतिहासिक आणि पौराणिकदृष्ट्या मैसूरला महिषनाडू (महिषभूमी) असे म्हणून संबोधतात. पुराण कथेनुसार देवी पार्वतीनेच चामुंडेश्वरीचे रूप धारण करून महिषासुराला ठार मारले. महिषासुराला ठार मारलेल्या स्थळालाच म्हैसूरु हे नाव पडले

3. म्हैसूरु संस्थानाच्या प्रगतीसाठी 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात कारणीभूत ठरलेल्या वडेयरांची नावे लिहा.

उत्तर – नाल्वडी कृष्णराज वडेयर हे म्हैसूरु संस्थानाच्या प्रगतीसाठी 20 व्या शतकाच्या पूर्वार्धात कारणीभूत ठरलेले वडेयर होय.

4. किनारपट्टीच्या प्रदेशाला ब्रिटिशांनी सुरुवातीला कोणत्या नावाने संबोधले ?

उत्तर – किनारपट्टीच्या प्रदेशाला ब्रिटिशांनी सुरुवातीला केनर या नावाने संबोधले.

5. म्हैसूरु विभागातील दोन प्रसिद्ध नद्यांची नावे लिहा. 

उत्तर – कावेरी,हमावती, हारंगी, नेत्रावती या म्हैसूरु विभागातील प्रसिद्ध नद्यांची नावे होय.



6. म्हैसूरु विभागातील जिल्ह्यापैकी अति जास्त व अति कमी पाऊस पडणारे जिल्हे कोणते?

उत्तर – म्हैसूरु विभागातील उडुपी जिल्ह्यात अति जास्त पाऊस व मंड्या जिल्ह्यात अति कमी पाऊस पडतो.

7. म्हैसूरु विभागातील जिल्ह्यामध्ये सापडणाऱ्या दोन खनिजांची नावे लिहा. 

उत्तर – बॉक्साईट, मँगॅनीज, चुनखडी, क्रोमाईट 

8. म्हैसूरु विभागाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यातील लोकांचा प्रमुख व्यवसाय कोणता?

उत्तर – मासेमारी 

9. म्हैसूरु विभागातील दोन प्रसिद्ध अरण्य प्रदेश कोणते?

उत्तर – बंडीपुर, नागरहोळे, पुष्पगिरी, भत्रा 

10. म्हैसूरु विभागातील जिल्ह्यात राहणाऱ्या दोन आदिवासी समुदायांची नावे लिहा. 

उत्तर – जेनकुरुबरू, सोलिगुरू , हक्किपिक्की, कोडगु 

11. दोन पक्षीधाम आणि दोन वन्यप्राणी अभयारण्यांची नावे लिहा.

उत्तर – पक्षीधाम – रंगनतिट्टू , गुडवी

वन्यप्राणी अभयारण्य – बंडीपूर, नागरहोळे , भद्रा 



12. म्हैसूरु विभागातील दोन राष्ट्रीय उद्यानांची नावे सांगा.

उत्तर – बंडीपूर , मंड्या 

13. म्हैसूरु विभागातील निवडक सहा प्रमुख पिके सांगा..

उत्तर – भात ,नाचना ,जोंधळा ,मूग ,उडीद , सुपारी ,बटाटे 

14. म्हैसूरु विभागात शेतीला पाणी पुरवठा करणाऱ्या दोन जलयोजना कोणत्या?

उत्तर – कृष्णराजसागर ,सारंगी ,हेमावती आणि काबीनी 

15. म्हैसूरु विभागात असणाऱ्या तीन प्रमुख उद्योगधंद्यांची नावे सांगा.

उत्तर – पेट्रोलियम कारखाने ,साखर कारखाना ,सिमेंट कारखाना, रासायनिक खतांचे कारखाने 

16. कोडव साजरा करत असलेल्या सुग्गी उत्सवाचे नाव काय ?

उत्तर – पुत्तरी 

17. कर्नाटक सरकारची नाटकसंस्था रंगायणाचे केंद्रस्थान कोणत्या शहरात आहे? 

उत्तर – म्हैसूर 

18. कन्नडच्या दोन प्रसिद्ध कादंबरीकारांची नावे लिहा.

उत्तर – शिवराम कारंत,एम गोपाल कृष्ण, बी.एम. श्रीकंठय्या,ए.एन.मूर्तीराव



19. म्हैसूरमधील शतमानोत्सव साजरा केलेल्या विश्वविद्यालयाचे नाव लिहा.

उत्तर – म्हैसूरु विश्वविद्यालय ( स्थापना -1915)

20. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देणाऱ्या केंद्रांचे नाव काय? 

उत्तर – प्राथमिक आरोग्य केंद्र

21. दोन आरोग्य सूचींची नावे सांगा.

उत्तर – लहान मुलांना रोगनिरोधक इंजेक्शन देण्यात येतात गर्भिने आणि बाळंतिणींची सेवा करण्यास आरोग्य सहाय्यक आशा कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे.

22. मैसूरु विभागात समाविष्ट झालेल्या दोन प्रसिध्द इंग्लिश कादंबरीकारांची नावे लिहा.

उत्तर – राजाराव , आर.के. नारायण 

23. स्वातंत्र्य लढयांबरोबर अस्पृश्यता निवारण चळवळीत सहभागी असलेल्या दोन समाजसुधारकांची नावे लिहा.

उत्तर – कुदमल रंगराव,तगडुरू रामचंद्रराव

24. श्रवणबेळगोळ कशासाठी प्रसिध्द आहे ?

उत्तर – श्रवणबेळगोळ गोमटेश्वर यांच्या एकशिला मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे.



25. या जिल्ह्यातील चार स्वातंत्र्य सैनिकांची नावे लिहा.

उत्तर – एच. सी. दासप्पा, यशोधरम्मा दासप्पा,कर्नाड सदाशिवराव,एच. के. वीरण्णगौड, के.टी. भाषम्, कमलादेवी चट्टोपाध्याय इत्यादी.

Share with your best friend :)