Bridge Course CLASS 8 PRE Test Science 8वी विज्ञान पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका

सेतूबंध हा कार्यक्रम वैज्ञानिक,अचूक आणि वस्तुनिष्ठ असला पाहिजे.तो एक प्रक्रिया म्हणून न घेता, मागील वर्गातील अध्ययन आणि पुढील वर्गातील अध्ययन यांना जोडण्याचा प्रयत्न असावा आणि विद्यार्थ्याची प्राप्त सामर्थ्ये समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.समस्या विद्यार्थ्यामध्ये किंवा शिक्षकांमध्ये असू शकते.ती समस्या किंवा कमतरता शोधण्याचे प्रयत्न सेतुबंधासारख्या कार्यक्रमाने शक्य झाले पाहिजे.त्यामुळे ही प्रक्रिया अधिक बळकट केली पाहिजे.या संदर्भात सेतुबंधाचे व्यवस्थापन प्रभावीपणे केले तर काही अध्ययनातील अडथळे टाळता येतील आणि अध्ययनाची सोय करता येईल.

सेतूबंध म्हणजे काय?

सद्या शिकण्यास आवश्यक अध्ययनांश किंवा अध्ययन निष्पत्तीस संबंधीत पूरक अध्ययन सामर्थ्य किंवा अध्ययनांश जोडणे.मुलांची शिकण्याची पातळी, त्यांची क्षमता ओळखणे आणि त्यांना पुढील शिक्षणासाठी तयार करणे हा एक क्रियाकलाप आहे. थोडक्यात मुलांनी जे शिकले आहे आणि जे शिकत आहेत त्यात परस्परसंबंध निर्माण करणे म्हणजे सेतुबंध म्हणता येईल.

सेतुबंधचे टप्पे कोणकोणते? (Steps of bridge course)

`नैदानिक (पूर्व) परीक्षे’चे नियोजन आणि आयोजन

प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययनाचे /अध्ययन कमतरतेचे विश्लेषण करणे.

परिहार बोधन नियोजन आणि अंमलबजावणी

साफल्य परीक्षेद्वारे पुन्हा एकदा प्राप्त सामर्थ्य तपासणे.

येथे प्रामुख्याने नैदानिक (पूर्व) परीक्षा आणि साफल्य परीक्षा अशी दोन साधने आहेत.सेतुबंध कार्यक्रमानंतर ज्या विद्यार्थ्याने क्षमता गाठली नाही,अशा विद्यार्थ्याना निरंतर परिहार बोधन अध्यापनाचे नियोजन करावे.


BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU

 

 

 



सेतुबंध कार्यक्रम

            इयत्ता – आठवी                 

विषय – विज्ञान  

पूर्व परीक्षा नमुना प्रश्नपत्रिका  

BASED ON Sethubandha Literature By DSERT BANGALURU



 

1. प्रकाश संश्लेषणात कोणता वायू वापरला जातो?

A) कार्बन डाय ऑक्साईड

B) नायट्रोजन
C)
हायड्रोजन
D)
ऑक्सिजन
2.
खालीलपैकी कोणत्या फळात / भाजीत टार्टारीक आम्ल असते?
A)
चिंच
B)
कारले
C)
संत्रे
D)
टोमॅटो
3)
आभासी प्रतिमा म्हणजे काय?

4) दिलेल्या प्रकरणात कारचा वेग 72km/h आहे.हे m/s मध्ये रूपांतरित करा.
5)
स्फटिकिकरण म्हणजे काय?
6)
आम्लाची अल्कलीशी क्रिया होऊन कोणते घटक तयार होतात?
7)
मानवी पचनक्रियेचे टप्पे कोणकोणते?
8)
विद्युत प्रवाहामुळे वाहकामध्ये तयार होणारे दोन परिणाम लिहा.
9)
भौतिक आणि रासायनिक बदलांमधील फरकांची यादी करा.
10)
नैसर्गिक आणि कृत्रिम तंतू म्हणजे काय?उदाहरण द्या.
11)
जलप्रदूषण म्हणजे काय? हे रोखण्यासाठी कोणती पावले उचलावीत याची यादी करा
12)
यांची रासायनिक नावे लिहा.
a)
स्वयंपाकाचे मीठ
b)
धुण्याचा सोडा
c)
बेकिंग सोडा
d)
चुना
e)
पाणी

प्रश्नपत्रिका PDF डाऊनलोड करा. 

 

अधिकृत कन्नड साहित्य पाहण्यासाठी येथे स्पर्श करा… – CLICK HERE



Share your love

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *