सामासिक विग्रह करा व समास ओळखा बहुव्रीही समास (SAMASIK VIGRAH – SAMASACHE PRAKAR)

 

 

Subject – Marathi

Topic – Grammar 

Samas ani Samasache prakar 

  

 

 

 

 




 

  

 

 

    

 

समास – :

 

दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दाचा जो एकत्र संयोग होतो त्यास समास म्हणतात.

 

 

 

सामासिक शब्द- :

 

समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीस समासाचा विग्रह असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.

बहुव्रीही समास -:

ज्या समासिक शब्दांतील दोन्ही पदावरून तिसऱ्याच एखाद्या वस्तूचा अर्थ सूचीत होतो त्या समासाला बहुव्रीही समास असे म्हणतात.
उदा. गजानन, चौकोन, मृगनयना, सार्थ, अष्टपैलू.

 

  

 

बहुव्रीही समास :- यात दोन्ही पदे गौण असून ही दोन्ही पदे मिळून निराळ्याच गोष्टीचा बोध होतो.त्यास बहुव्रीही समास म्हणतात.
1) लंबोदर – लंब आहे उदर ज्यांचे तो – गणपती.
2) नीलकंठ – नीळा असा कंठ असलेला -शंकर
3) जिनेंद्रिय – जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो -मारुती

सरावासाठी खालील उदाहरणे पहा…
 

 

1) नीलकंठ = ज्याचा कंठ निळा आहे असा.


2) इंद्रादी = इंद्र आहे आदि ज्यामध्ये असे.
3) जटाधारी = जटा धारण केल्या आहेत ज्याने असा.
4) अकर्म = कर्म नाही ज्याला.
5) निर्धन = धन ज्याच्यापासून निघून गेले आहे.
6)त्रिनयन तीन डोळे आहेत ज्याला असा.
7) चौकोन= चार आहेत. कोन ज्याला असा.
8) दीनानाथ=दीनांचा नाथ आहे असा जो तो.
9) लक्ष्मीकांत = लक्ष्मीचा पती आहे असा तो.
10) चंद्रमुखी =चंद्रासारखे मुख आहे जिचे अशी.
11) दशानन = दहा तोंडे आहेत ज्याला असा.
12) महाकाय = मोठे आहे ज्याचे शरीर असा.
13) जितेंद्रिय = इंद्रिये जिंकली आहेत ज्याने असा.
14) मुरलीधर =मुरली धारण केली आहे ज्याने असा..
15) लंबोदर = ज्याचे उदर मोठे (लांब) आहे असा.
16) वक्रतुंड = ज्याचे तोंड वक्र आहे असा.
17) चक्रपाणी = ज्याच्या हातात चक्र आहे असा.
18) अष्टभुजा = अष्ट आहेत भुजा जिला अशी.
19) भालचंद्र = भाली आहे चंद्र ज्याच्या असा.
20) अनाथ = नाथ नाही ज्याला असा.
21) कमलाक्षी = कमळासारखे डोळे आहेत जिचे अशी.
22) करुणासागर = करुणा आहे ज्याच्या जवळ असा.
23) निर्बल = बल नाही ज्याच्यापाशी असा.
24) शूलपाणी = शूल आहे हातात ज्याच्या असा.
25) अल्पमोली = किंमत जिची अल्प आहे अशी.
26) सिंहकटि =सिंहासारखी कंबर आहे जिची अशी.
27) अनंत = नाही अंत ज्याला असा
28) सनाथ = नाथ आहे ज्याला असा.
29) चर्तुमुख = चार मुखे आहेत ज्याला असा.
30) प्राप्तधन = प्राप्त आहे धनं ज्यास असा.
31) आखुडशिंगी = जिची शिंगे आखुड आहेत अशी.

 

समासांच्या अधिक सरावासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.. 
 
तत्पुरुष समास – येथे क्लिक करा.. 
 
द्वंद्व समास – येथे क्लिक करा.. 
 

अव्ययीभाव समास – येथे क्लिक करा.. 
 



 



AVvXsEiaMbJXH2nlN9HdGmK2VOzgZTHYdy2kqbcxdiORcBpMwSWqKfWXdat 1aHSzo8cTT5w3i5PeZ9lf NavHBJ 1jNe 1Ie1tY6Qd5J NFXYrrZjZKr1hxrgumNRn0SCiaP3UQ4hapX 97yx0HhNCaiip 5STrL229sInjcDEqX08i68YZ3S052Qw5SQYsQ=w640 h144


अ.नं.

    पाठाचे नाव

लिंक

1.

शब्दांच्या जाती भाग 1

क्लिक  करा

2.

शब्दांच्या जाती भाग 2

क्लिक  करा

3.

नाम व नामाचे प्रकार

क्लिक  करा

4.

वचन

क्लिक  करा

5.

विरुद्धार्थी शब्द

क्लिक  करा

6.

समानार्थी शब्द

क्लिक  करा

7.

काळ व काळाचे प्रकार

क्लिक  करा

8.

सर्वनाम 

9.

विशेषण

क्लिक  करा

10.

क्रियापद

क्लिक  करा

11.

 क्रियाविशेषण 

क्लिक  करा

12. 

 शब्दयोगी अव्यय 

क्लिक  करा

13.

 उभयान्वयी  अव्यय  

येथे क्लिक  करा 

14. 

 केवलप्रयोगी अव्यय 

येथे क्लिक करा. 

 15.

 वाक्प्रचार 

येथे क्लिक करा 

 16.

 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 

येथे क्लिक करा  

17. 

 विभक्ती व विभक्तीचे प्रकार

येथे  क्लिक करा 

18. 

 प्रयोग व प्रयोगाचे प्रकार 

क्लिक करा  

 १९. 

 मराठी वर्णमाला 

क्लिक करा   

20. 

 संधी,स्वर संधी 

क्लिक करा   

21

विरामचिन्हे

क्लिक करा  

22 

 म्हणी व त्यांचे अर्थ 

क्लिक करा  

23

  समास व समासाचे प्रकार 

क्लिक करा  

24

 

 

 










 


 

 

 

 

 
 







 

 
 

 

Share with your best friend :)