सामासिक विग्रह करा व समास ओळखा तत्पुरुष समास (SAMASIK VIGRAH – SAMASACHE PRAKAR)

Table of Contents

  

Subject – Marathi

Topic – Grammar 

Samas ani Samasache prakar 

  

 

 

 




 

  

 

 

    

 

समास – :

 

दोन शब्दांचा परस्पर संबंध दाखविणारे किंवा प्रत्यय लोप पावून त्या दोन शब्दाचा जो एकत्र संयोग होतो त्यास समास म्हणतात.


 

 

सामासिक शब्द- :

 

समासातील शब्दांचा संबंध स्पष्ट करून सांगण्याच्या पद्धतीस समासाचा विग्रह असे म्हणतात. शब्दांच्या एकत्रीकरणाने जो एक जोडशब्द तयार होतो त्यास सामासिक शब्द म्हणतात.

तत्पुरुष समास -:

ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करतांना दुसऱ्या पदाला महत्व दिले जाते, व प्रथमपद गौण असते. त्याला तत्पुरुष समास असे म्हणतात.

तत्पुरुष समासाचे प्रकार

तत्पुरुष समासाचे प्रकार पुढीलप्रमाणे-
1) विभक्ती तत्पुरूष समास
2) उपपद तत्पुरूष समास
3) नञ् तत्पुरूष समास
4) कर्मधारय समास
5) द्विगु समास
6) मध्यमपदलोपी असे उपप्रकार आहेत. समास
उदा. राजवाडा, नीलकमल, पुरणपोळी, पंचवटी, विद्याधन.

तत्पुरुष समास म्हणतात.
तत्पुरुष समासाचे चार प्रकार पुढीलप्रमाणे-

1) विभक्ती तत्पुरूष :-

तत्पुरुष समासात अर्थदृष्ट्या गाळलेला विभक्ती प्रत्यय किंवा शब्द विग्रहामध्ये घालावा लागतो त्या समासास विभक्ती तत्पुरुष समास असे म्हणतात.
उदा. दुःखप्राप्त दुखाला प्राप्त – तोंडपाठ तोंडाने पाठ
पोळपाट- पोळीसाठी पाठ बालमित्र बालपणापासूनचा मित्र
राजपुत्र -राजाचा पुत्र
वनभोजन – वनातील भोजन



2) नञ् तत्पुरुष समास – 

ज्या तत्पुरुष समासातील पहिले पद नकारार्थी असते. त्यास ‘नञ् तत्पुरुष’ असे म्हणतात.
या समासात ‘अ, अन्, न, ना, नि, बे, गैर’ अशी अभाव किंवा निषेध दर्शविणारी पहिली पदे येतात. 
 
उदा : अयोग्य-योग्य नव्हे ते, 
 
अनादर – आदर नसलेला.

नापसंत – पसंत नाही ते 

 नावड  -आवड नसलेले 

3) उपपद तत्पुरुष समास : 

    ज्यात समासामध्ये दुसरे पद धातुसाधित किंवा कृदन्त असते. त्या समासाला ‘उपपद’ तत्पुरुष समास’ असे म्हणतात. 

उदा : 

पंकज – पंकात जन्मणारे ते, 

ग्रंथकार ग्रंथ लिहितो तो. 

  
4) कर्मधारय तत्पुरुष समास :-

तत्पुरुष समासातील दोन्ही पदे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा कर्मधारय समास होतो.

उदा. महादेव = महान असा देव

वेषांतर= दुसरा वेष

कमलनयन = कमलासारखे डोळे.

5) द्विगु
तत्पुरुष समास

कर्मधारय समासातील पहिले पद संख्याविशेषण असते. त्यास द्विगु समास म्हणतात (एकवचनी असतो)
उदा. –

1) पंचवटी – पाच वडांचा समूह
2) नवरात्र – नऊ रात्रींचा समूह

 

 

6) मध्यमपदलोपी तत्पुरुष समास :-

सामासिक शब्दातील पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी संबंध दाखविणारी मधली काही पदे लोप करावी लागतात त्याला मध्यमपदलोपी समास म्हणतात.

 


उदा. :- 1) पुरणपोळी – पुरण भरून तयार केलेली पोळी.
2) साखरभात- साखर घालून तयार केलेला भात.
3) चुलतसासरा – नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा

सरावासाठी खालील उदाहरणे पहा…
 

1) मामेभाऊ = मामाकडून भाऊ


2) विद्यागृह = विद्येसाठी गृह

 

3) समुद्रकाठ= समुद्राचा काठ


4) पोळपाट पोळीसाठी पाट


5) शेतकरी = शेती करणारा


6) नवरात्र = नऊ रात्रींचा समुदाय


7) क्रीडांगण = क्रीडेसाठी अंगण


8) धर्मभ्रष्ट = धर्मातून भ्रष्ट


9) तपोबल = तप हेच बल


10) नीलकमल = निळे असे कमळ


11) मनुज= मनूपासून जन्मलेला


12) गलितगात्र = गलित असे गात्र


13) पंचपाळे = पाच पाळ्यांचा समुदाय


14) पुष्पमाला = पुष्पांची


15) पुरणपोळी = पुरण घालून केलेली पोळी


16) मुख्याध्यापक = मुख्य असा अध्यापक


17) दुतोंड्या = दोन तोंड असणारा


18) सर्वज्ञ = सर्व जाणणारा


19) नवग्रह = नऊ ग्रहांचा समुदाय


20) जनसेवा = जनाची सेवा


21) कृष्णकमल = कृष्ण असे कमल


22) मतिमंद = मतीने मंद


23) भाचेजावई = भाचीचा नवरा म्हणून जावई


24) देशाभिमान = देशाचा अभिमान


25) गायरान = गायीसाठी असलेले रान


26) सुवासना = चांगली अशी वासना


27) गोधन =गो हेच धन


30) हस्तलिखित = हाताने लिहिलेले


31) रणशूर =रणामध्ये शूर


32) बालकिरण = बाल असे किरण


33) दलितोध्दारण = दलितांचे उध्दारण


34) कांदापोहे = कांदा घालून केलेले पोहे


35) जलद = जल देणारा


36) ईश्वरभक्ती = ईश्वराची भक्ती


37) गृहस्थ = घरात राहणारा


38) विद्याधनी = विद्या हेच धन


39) कुरूप = कु असे रूप


40) महादेव = महा असा देव


41) बालमित्र = बालपणाचा मित्र


42) राष्ट्रध्वज = राष्ट्राचा ध्वज


43)जन्मदा = जन्म देणारी


44) पंक्तीपठाण= पंक्तीमध्ये पठाण


45) स्वर्गवास = स्वर्गात असे वास


46) महात्मा = महान असा आत्मा


47)अन्नब्रह्म =अन्नरूपी ब्रह्म


48)हिमाद्रि =हिमाचा अद्री


49)पादचारी = पायी हिंडणारा


50)
वांगीभात = वांगी घालून केलेला भात

 

समासांच्या अधिक सरावासाठी खालील लिंकवर स्पर्श करा.. 
 
अव्ययीभाव समास – येथे क्लिक करा.. 
 
द्वंद्व समास – येथे क्लिक करा.. 
 




 




अ.नं.

    पाठाचे नाव

लिंक

1.

शब्दांच्या जाती भाग 1

क्लिक  करा

2.

शब्दांच्या जाती भाग 2

क्लिक  करा

3.

नाम व नामाचे प्रकार

क्लिक  करा

4.

वचन

क्लिक  करा

5.

विरुद्धार्थी शब्द

क्लिक  करा

6.

समानार्थी शब्द

क्लिक  करा

7.

काळ व काळाचे प्रकार

क्लिक  करा

8.

सर्वनाम 

9.

विशेषण

क्लिक  करा

10.

क्रियापद

क्लिक  करा

11.

 क्रियाविशेषण 

क्लिक  करा

12. 

 शब्दयोगी अव्यय 

क्लिक  करा

13.

 उभयान्वयी  अव्यय  

येथे क्लिक  करा 

14. 

 केवलप्रयोगी अव्यय 

येथे क्लिक करा. 

 15.

 वाक्प्रचार 

येथे क्लिक करा 

 16.

 शब्दसमुहाबद्दल एक शब्द 

येथे क्लिक करा  

17. 

 विभक्ती व विभक्तीचे प्रकार

येथे  क्लिक करा 

18. 

 प्रयोग व प्रयोगाचे प्रकार 

क्लिक करा  

 १९. 

 मराठी वर्णमाला 

क्लिक करा   

20. 

 संधी,स्वर संधी 

क्लिक करा   

21

विरामचिन्हे

क्लिक करा  

22 

 म्हणी व त्यांचे अर्थ 

क्लिक करा  

23

  समास व समासाचे प्रकार 

क्लिक करा  

24

 

 

 







 

 
Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *