विषय: 2022-23 पासून राज्य पाठ्यक्रमाच्या सर्व शाळांमध्ये इयत्ता 5 आणि 8 वी साठी वार्षिक परीक्षा / मूल्यमापन आयोजित करणेबाबत…
सध्या 2022-23 या वर्षात मुलांसाठी अध्ययन कमतरतेवर मात करण्यासाठी अध्ययन पुनर्प्राप्ती कार्यक्रम राबवून अध्ययन प्रगती करण्यात येत आहे.तसेच सद्या शालेय स्तरावर पहिली ते नववीपर्यंत सीसीई मूल्यांकनाचे विश्लेषण केले जात असल्याने आणि वार्षिक परीक्षा घेतल्या जात नसल्यामुळे राज्य अभ्यासक्रमातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांची एकूण प्रगती जाणून घेणे शक्य होत नाही.यातून मुलांची एकूण अध्ययन पातळी काय आहे? तोटे काय आहेत? विद्यार्थी कोणत्या विषयात मागे आहे? यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात हे ठरवता येत नाही.म्हणून, अध्ययन निष्पत्तीवर आधारित एकसमान साधन व तंत्र वापरून सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचे मूल्यांकन आणि विश्लेषण करण्याची गरज आहे.
प्रस्तुत कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्य निर्धारण मंडळ (KSEAB) त्यांच्या स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करुन शाळांना पुरवणे आणि शालेय स्तरावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून विषयनिहाय विश्लेषण करणे व विषयनिहाय, शाळानिहाय,क्लस्टर/तालुकानिहाय अध्ययन कमतरता जाणून घेऊन पुढील वर्षात त्याविषयी आवश्यक उपाययोजना करून अध्ययन प्रगती साधणे.या उद्देशाने सदर मूल्यांकन घेण्यात येणार आहे.
बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009. सुधारणा कायदा, 2019 च्या कलम 15(1) ते 16(4) मध्ये खालीलप्रमाणे सांगण्यात आले आहे.
Examination and holding back in certain cases.
2. In the Right of Children to Free and Compulsory Education Act. 2009(hereinafter referred to as the principal Act) for Section 16. the following section shall be substituted. Namely:-
16.(1) There shall be a regular examination in the fifth and in the eighth class at the end of every academic year.
(2) If a child fails in examination referred to in sub-section (1). He shall be given additional instruction and granted opportunity for re-examination within a period of two months from the date of declaration of the result.
(3) The appropriate Government may allow schools to hold back a child in the fifth class or in the eighth class or both classes, in such manner and subject to conditions as may be prescribed, if he fails in the re-examination referred to in sub-section(2):
Provided that the appropriate Government may decide not to hold back a child in any class till the completion of elementary education.
(4) No child shall be expelled from a school till the completion of elementary education”.
वरील बाबी लक्षात घेता,शासनाने संदर्भ (2) नुसार चालू शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 5 आणि 8 ची वार्षिक परीक्षा मंजूर केली आहे आणि परवानगी दिली आहे.
मात्र, चालू वर्षात अर्धे शैक्षणिक वर्ष संपले असून आधीच FA-1,FA-2 आणि SA-1 परीक्षा घेतल्या आहेत आणि त्यांचे मूल्यांकन केले आहे व SATS मध्ये प्रगती नोंदवली जात आहे.त्यामुळे या शैक्षणिक वर्षात वार्षिक परीक्षा घेण्याऐवजी आणि ती उर्वरित सहामाहीपर्यंत मर्यादित ठेवून,नोव्हेंबर-2022 च्या पहिल्या आठवड्यापासून मार्च-2023 पहिल्या आठवड्यापर्यंत प्रतीकात्मकरित्या केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित संकलित मूल्यमापन-2 [SA-2] घेण्यात येणार आहे.
2022-23 वर्षातील इयत्ता 5 आणि 8 ची वार्षिक मूल्यांकन आयोजित करण्यासाठी मार्गदर्शक सूचना-
1. परीक्षा नोंदणी प्रक्रिया –
SATS नुसार नोंदणीकृत राज्य अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांची नोंदणी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाने SATS मध्ये केल्याचे प्रमाणित करून प्रत्येक शाळेने क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे विद्यार्थ्यांची यादी सादर करणे.कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी. सदर परीक्षेस विद्यार्थ्याचा SATS नंबर हा परीक्षा क्रमांक असेल.
02. परीक्षा नोंदणी शुल्क:
सरकारच्या आदेशनुसार 2022-23 या वर्षातील परीक्षा आणि परीक्षा नियोजन खर्च संपूर्णपणे कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाने करावा.विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेण्यात येऊ नये.त्यानुसार K.S.E.A.B.ला संबंधित खर्चाबाबत प्रस्ताव तयार करून नियमानुसार शासनाकडून मंजुरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
03. परीक्षा केंद्रांची स्थापना:-
शाळानिहाय मुलांच्या संख्येवर आधारित 5 वी परीक्षेच्या एका केंद्रावर किमान 25 विद्यार्थी असावेत.शाळानिहाय विद्यार्थी कमी असल्यास शाळेपासून 2 कि.मी. व्याप्तीतील मूलभूत सुविधा असलेल्या जवळच्या प्राथमिक/उच्च प्राथमिक शाळांतील मुलांसह परीक्षा केंद्र स्थापन करण्याची व्यवस्था करणे.
किमान 50 विद्यार्थी असलेल्या संबंधित उच्च प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये 8वी परीक्षा केंद्र स्थापन केले जावे.ज्या उच्च प्राथमिक/माध्यमिक शाळांमध्ये मुलांची संख्या कमी असल्यास शाळेपासून किमान 2 कि.मी. व्याप्तीतील मूलभूत सुविधा असलेल्या जवळच्या उच्च प्राथमिक/माध्यमिक शाळांतील मुलांसह परीक्षा केंद्र स्थापन करण्याची व्यवस्था करणे.
अशाप्रकारे… CRP कडून परीक्षा केंद्रांच्या स्थापनेबाबत अहवाल मिळाल्यानंतर, DIET प्राचार्य आणि क्षेत्रशिक्षण अधिकारी यांनी परीक्षा केंद्र स्थापनेचा KSEAB ला अहवाल देतील.
04. परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करणे:-
परीक्षा आयोजित करण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा संबंधित परीक्षा केंद्राच्या शाळेने पुरवाव्यात आणि संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक परीक्षा केंद्र प्रमुख असतील आणि क्लस्टर शाळांच्या शिक्षकांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केले जातील.याबाबत क्षेत्र शिक्षणाधिकारी योग्य कार्यवाही करतील.
05. प्रवेशपत्राची छपाई आणि वितरण:-
S.A.T.S मध्ये नोंदणी केलेल्या इयत्ता 5 वी आणि 8 वी च्या सर्व विद्यार्थ्यांची शाळा स्तरावरील मुख्याध्यापक माहिती ऑनलाईन घेतील आणि नंतर प्रवेशपत्र तपासून प्रिंट करून ते वितरित करतील.या संदर्भात K.S.E.A.B SATS विभागाशी चर्चा करेल.विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र पोहोचवण्याची जबाबदारी संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकाऱ्यांची असेल.
06. प्रश्नपत्रिका स्वरूप:-
चालू वर्षात अर्धे शैक्षणिक वर्ष आधीच पूर्ण झाले असल्याने आणि उर्वरित सहामाहीच्या अभ्यासक्रमावर आधारित अभ्यासक्रमावर आधारित (नोव्हेंबर-2022 पासून मार्च 2023च्या पहिल्या आठवड्यापर्यंत) संकलित मूल्यमापन-2 (SA-2)आयोजित करण्यात येणार आहे.
5वी आणि 8वी साठी 50 गुण आणि 2 तासांचा वेळ घेऊन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यापैकी 40 गुण लेखी परीक्षेसाठी,10 गुण तोंडी परीक्षेसाठी दिले जातील.40 गुणांची लेखी परीक्षेमध्ये 20 गुणांचे MCQ (बहुपर्यायी) प्रश्न आणि उर्वरित 20 गुणांचे लेखी प्रश्न विश्लेषण स्वरूपात समाविष्ट करून ब्लू-प्रिंट तयार करणे. अध्ययन पुनर्प्राप्ती अभ्यासक्रमांतर्गत प्रश्नपत्रिका तयार करण्याची सूचना शासनाने केली आहे.त्यानुसार अध्ययन पुनर्प्राप्ती अभ्यासक्रम प्रस्तुत वर्षातील पाठ्यपुस्तकावर आधारित असल्याने पाठ्यपुस्तक आणि अध्ययन पुनर्प्राप्ती आधारीत नमुना प्रश्नपत्रिका K.S.E.A.B. द्वारे तयार केली जाईल.या संदर्भात D.S.E.R.T. च्या सहाय्याने जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात मॉडेल प्रश्नपत्रिका शाळांना प्रसिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
07. परीक्षा व्यवस्थापन,मूल्यमापन आणि निकाल वेळापत्रक:
चालू शैक्षणिक वर्ष 2022-23 दिनांक:10.04.2023 रोजी संपणार असल्याने, खालील तात्कालिक वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.अंतिम वेळापत्रक K.S.E.A.B द्वारे प्रकाशित केले जाईल.
परीक्षा नियोजन: 09.03.2023 ते 17.03.2023पर्यंत
परीक्षा निकाल जाहीर करणे: 08.04.2023 ते 10.04.2023
09. मूल्यांकन केंद्र आणि मूल्यांकन व्यवस्थापन:-
5वी वर्गाच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यमापनासाठी संबंधित तालुका केंद्रातील एका शाळेला मूल्यमापन केंद्र म्हणून निवडणे.या केंद्राचे प्रमुख म्हणून B.R.C यांची नियुक्ती करणे.शाळानिहाय/परीक्षा केंद्रनिहाय मिळालेल्या उत्तरपत्रिका लिफाफे एकत्रित करून, क्लस्टरनुसार स्वतंत्रपणे, तालुका केंद्रावरील नियुक्त मूल्यमापन केंद्राकडे पाठवले जातील आणि सुरक्षित ठेवले जातील.मूल्यमापन कार्य [Inter Cluster Weise] आंतर क्लस्टरनिहाय उत्तरपत्रिकांची बदली करून सुरक्षित ठेवणे.त्याचप्रमाणे, मूल्यांकनसाठी शिक्षक बदली करण्यात यावी.
मुल्यांकनाच्या कामासाठी तालुका शासकीय आणि अनुदानित शाळा शिक्षकांची नियुक्ती अनिवार्य असेल.त्यांची संख्या कमी असल्यास विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना (इंग्रजी माध्यम/इतर माध्यम) नियोजित करणे.मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिका अनुक्रमे शाळानिहाय लिफाफ्यात आणि क्लस्टरनिहाय/शाळानिहाय पॅकिंग करणे.त्यानंतर C.R.P द्वारे संबंधित शाळांना पाठवणे.या मूल्यमापन केलेल्या उत्तरपत्रिका सहा [06] महिन्यांसाठी संबंधित शाळांमध्ये सुरक्षित ठेवल्या जाव्यात. या मूल्यमापन कार्यासाठी कोणताही मोबदला दिला जाणार नाही.
एकाच वेळी सर्व विषयांसाठी स्वतंत्र खोलीत मुल्यांकन सुरू होईल.सदर मूल्यमापन कार्य चार ते पाच दिवसांत पूर्ण करण्यात यावे.
क्षेत्र शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून मूल्यमापनकर्त्यांची विषयनिहाय यादी तयार करण्यात करून DIET प्राचार्यांकडून त्यावर मान्यता घ्यावी आणि मूल्यांकनाचे काम पार पाडावे.एका तालुक्यातील शिक्षकांना कोणत्याही कारणास्तव दुसऱ्या तालुक्यात नियुक्त करण्यात येऊ नये.
10. 5 वी आणि 8 वी परीक्षा निकाल आणि उत्तीर्ण होण्याचे नियम:
FA-1 FA-2 आणि SA-1 परीक्षा आधीच पूर्ण झाल्या आहेत आणि त्यांचे निकाल SATS मध्ये प्रविष्ट केले जात आहेत.त्यामुळे सद्याच्या गुणांच्या विभागणी नुसार गुणांची नोंद करणे योग्य ठरेल.म्हणजेच 4 Formative Assessment चे गुण (FA1, FA2, FA3, FA4) + Summative Assessment-1 [SA-1) चे गुण मार्क्स आणि सध्या प्रस्तावित Summative Assessment-2 [SA-2] चे गुण असे एकूण 100 गुण. प्रति विद्यार्थी 100 गुण होतील. प्रत्येक विद्यार्थ्याला 100 पैकी शेकडा 35 टक्के गुण मिळाल्यास अध्ययनात प्रगती साध्य केलेले विद्यार्थी असे त्याची नोंद करणे.ज्या विद्यार्थ्याना 35% पेक्षा कमी गुण प्राप्त केलेले विद्यार्थी अध्ययनात प्रगती न साध्य केलेले विद्यार्थी असे समजून 2023 मध्ये जून ते जुलै महिना अखेर पर्यंत परिहार बोधन करून दोन पूरक परीक्षा घेऊन संबंधीत विद्यार्थ्याना अध्ययन प्रगती करण्यात प्रोत्साहन देणे.
या कारणास्तव कोणत्याही विद्यार्थ्याने शैक्षणिक प्रगती न केलेल्या विद्यार्थी समजून अनुत्तीर्ण करू नये.
Summative Assessment-2 (SA-2) 50 गुणांची असून त्यातील 10 गुण मौखिक आणि 40 गुण लेखी असतील.शेवटी,लेखी परीक्षेचे 40 गुण SA-2 मध्ये रूपांतरित केले जातील.याविषयी D.S.E.R.T.द्वारे परिपत्रक जारी करण्यात येईल.
एकंदरीत: वर नमूद केल्याप्रमाणे 5वी आणि 8वीच्या परीक्षेसाठी FA1, FA2, FA3, FA4 आणि SA-1,SA-2 परीक्षांचे एकूण 100 गुणांमध्ये एकत्रित करून आणि यावर्षीच्या निकाल निश्चितीसाठी अंतिम केले जावे.याविषयी D.S.E.R.T द्वारे सविस्तर परिपत्रक जारी केले जाईल.
11. निकाल जाहीर करणे:-
मूल्यमापनानंतर,संबंधित मूल्यमापन केंद्रावर शाळानिहाय निकाल तयार आणि अनुक्रमित करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केले जाईल आणि त्यानंतर संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांना SATS मधील नोंद करण्यास कळवण्यात येईल.उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केल्याच्या त्याच दिवशी उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या समुदाय दत्त शाळा कार्यक्रमात निकाल जाहीर करावे लागणार असल्याने मूल्यमापन केल्यानंतर त्वरित K.S.E.A.B. कडून ONLINE MARKS PORTING करून विश्लेषणात मदत करण्यासाठी सॉफ्टवेअर तयार करून त्याची अंमलबजावणी करावी आणि स्वतंत्र परिपत्रक जारी करावे.
12. अध्ययन गुणवत्ता सुधारणेसाठी क्रिया योजना आणि निकालाचे विश्लेषण :-
K.S.EA.B परीक्षा मंडळाच्या K.S.Q.A.A.C. विभागाला प्रस्तुत परीक्षांच्या निकालाचे विश्लेषण करण्याची जबाबदारी दिली आहे.त्यानुसार मूल्यमापनानंतर DIET आणि BRCs द्वारे मुलांची अध्ययन प्रगती / SATS मध्ये नोंदवल्यानंतर SA-2 परीक्षेचा निकाल तपासून कोणत्या विषयात,कोणती शाळा,क्लस्टर,तालुका आणि जिल्हा अध्ययन प्रगतीमध्ये कमी आहेत याच्या माहितीचा अहवाल D.S.E.R.T. ला देणे.
13.पुढील वर्षापासून परीक्षा आयोजित करण्याबाबत:-
सदर 5वी आणि 8वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा/मूल्यांकन-1 आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इयत्ता 5 वी CCE मूल्यांकनासाठी 60 गुण,फक्त Summative Assessment-2 (SA-2) 40 गुणांची लेखी परीक्षा (नोव्हेंबर ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात पर्यंतच्या अभ्यासक्रम) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.
इयत्ता 5वी च्या निकालासाठी CCE मूल्यांकन आणि लेखी परीक्षा समाविष्ट करून एकूण 100 पैकी 35% गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
इयत्ता 8 च्या CCE मुल्यांकन 40 गुण, 60 गुणांची वार्षिक लेखी परीक्षा जून ते फेब्रुवारी पर्यंतचा अभ्यासक्रमावर आधारित घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
इयत्ता 8वी च्या वार्षिक निकालासाठी CCE मूल्यांकन 40 गुण आणि लेखी परीक्षा 60 गुण समाविष्ट करून एकूण 100 पैकी 35% गुण प्राप्त करणे अनिवार्य असेल.
कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच वर्गात अनुत्तीर्ण न करता, कोणतीही प्रगती न केलेला विद्यार्थी म्हणून लक्षात घेऊन, आवश्यक असल्यास अनुक्रमे पुढील वर्षी जून आणि जुलै अखेर पर्यंत परिहार बोधन करून अध्ययन प्रगतीसाठी शालेय स्तरावर पूरक परीक्षा घेण्यात यावी याविषयी मार्गदर्शन सूचना देण्यात येतील.
इयत्ता 5 वी आणि 8 वी परीक्षा तात्कालिक वेळापत्रक
विवरण | कालावधी |
परीक्षेबद्दल मार्गदर्शक सुचना | 13.12.2022 |
नमुना प्रश्नपत्रिका | 10.01.2023 |
परीक्षा व मूल्यमापन केंद्र | 20.02.2023 |
प्रवेश पत्र मुद्रण व वितरण | 20.02.2023 ते 28.02.2023 |
प्रश्नपत्रिका मुद्रण व वितरण | 03.03.2023 ते 07.03.2023 |
परीक्षा वेळापत्रक | 09.03/2023 ते 18.03.2023 |
उत्तरपत्रिका वाहतूक | 18.03.2023 ते 20.03.2023 |
मूल्यमापन वेळापत्रक | 21.03.2023 ते 28.03.2023 |
निकाल एकत्रीकरण | 31.03.2023 ते 04.04.2023 |
निकाल जाहीर करणे | 08.04.2023 (इ.5वी) 10.04.2023 (इ.8वी) |
SATS पोर्टल वर गुण नोंदणी | 11.04.2023 ते 20.04.2023 |
मुल्यांकन निकाल | 21.04.2023 ते 30.04.2023 |
निकाल विश्लेषण आधारित पुढील वर्षाची | 01.05.2023 ते 20.05.2023 |