नववी मराठी 8.बाबाखान दरवेशी (9th MARATHI 8.BABAKHAN DARAVESHI)

                                             

 

     .बाबाखान दरवेशी

 

व्यंकटेश माडगूळकर (1927-2000)


 

परिचय :
पूर्ण नाव – व्यंकटेश दिगंबर माडगूळकर
मराठीतील थोर साहित्यिक म्हणून ओळखले जातात.
माडगूळकरांनी मी तुळस तुझ्या अंगणी‘, ‘वंशाचा दिवा‘, ‘सांगत्ये ऐकाइत्यादी चित्रपटांचे पटकथा
लेखन केले.
सत्तांतर‘, ‘कोवळे दिवस‘, ‘बनगरवाडीया त्यांचा कादंबऱ्या नागझिरा‘, ‘रानमेळाहे ललित लेखन,’ओझं‘, ‘काळी आई‘, ‘गावाकडील गोष्टी‘, हे कथा संग्रह असे विपुल लेखन केले आहे.
1983 मध्ये अंबेजोगाई येथे
भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

त्यांच्या साहित्यातून ग्रामीण निसर्ग आणि मानवी जीवन यांचे
अतिशय जिवंत रसरशीत प्रत्ययकारी दर्शन घडते.

बाबाखान दरवेशी हा पाठ माणदेशी माणसंया व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकातून घेतलेला आहे.बाबाखान दरवेशीचे
स्वभावदर्शन अतिशय स्वाभाविकपणे घडविले आहे.



शब्दार्थ :
येरगटणे.
आदाब- वंदन,मुजरा
कालवा – गर्दी
गहिवर मांडणे – कंठ दाटून येणे
सद्गदित होणे – दुःख व्यक्त
करणे

रामोशी – एक जात
दरवेशी – अस्वलाचा खेळ
दाखवणारा

दगावणे – मरण पावणे
कवाड – दार
कल्लोळ – आरडा ओरडा
हुंदके देणे – रडण्याचा
उमाळा

वैदू – वनस्पती औषधे देणारा
हुंद – हिसडा मारणे
कलागत – भांडण



 

हिरवट – चिडखोर, तिरसट
ओशाळणे – लज्जित होणे
इरेला पडणे – इर्षेला पडणे
काळीज – अंतःकरण
 गुर्मी – मगरूरी
खर्ची पडणे – संपणे
मन उतू जाणे – मन भरून येणे
धोंडा घालणे – घात करणे
स्वाध्याय :
प्र.1 ( ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(
अ) बाबाखानने कोणता प्राणी पाळला होता ?
(अ) माकड

(ब) अस्वल

(क) कुत्रा


(
ड) वाघ
उत्तर – (ब) अस्वल



 


(
आ) त्याच्या अस्वलाचे खाद्य कोणते होते?
(अ) गवत
(
ब) मांस
(
क) शेरभर भरडलेल्या कण्या

(ड) झाडांची फळे

उत्तर – (क) शेरभर भरडलेल्या कण्या

(इ) बाबाखान हा कोण होता ?
 (अ) कलाकार

 (ब)भांडखोर

(क)दरवेशी
 (
ड)वेडा
उत्तर – (क)दरवेशी

(ई) बाबाखानने अस्वल कोठे बांधले होते ?
(अ) येण्या जाण्याच्या रस्त्यात

(ब) झाडाखाली

(क) घरापासून दूर
(
ड) देवळापाशी
उत्तर – (अ) येण्या जाण्याच्या रस्त्यात



(उ) बाबाखानने अस्वलाला का मारले नाही?

 (अ) ते त्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते.

 (ब) ते त्याने पाळले
होते.

(क) ते त्याचे काम करत असे

(ड) ते त्याला प्रिय होते.

उत्तर – (अ) ते त्याचे उदरनिर्वाहाचे साधन होते.
प्र. 2 (रा) खालील प्रश्नांची उत्तरे का वाक्यात लिहा.
(
अ) दरवेश्याच्या घरापुढं माणसे का जमा झाली होती ?
उत्तर – मध्यान्ह रात्र टळून गेल्यावर दरवेशाच्या बायकोने गहिवर मांडला होता आणि त्याला त्याची चिल्लीपिल्ली साथ करत होती.ते पाहण्यासाठी सर्वेशेच्या घरासमोर माणसे जमा झाली होते.
(
आ) दरवेश्याचे नाव या पाठात काय आहे?
उत्तर – या पाठात दर देशाचे नाव बाबाखान असे आहे.
(
इ) बाबाखानने अस्वल का पाळले होते?
उत्तर – अस्वलाचे खेळ दाखवून महागाईच्या दिवसात त्यावर पैसा मिळवून स्वतःचे व कुटुंबाचे पोट भरण्यासाठी बाबाखानने अस्वल पाळले होते.



 


(
ई) बाबाखानला हिरवट टाळक्याचाअसे का म्हटले आहे?
उत्तर – बाबाखान गावातल्या लोकांशी जरी नीट वागे तरी त्याचा देवऋषीपणा,मंत्रतंत्र,उग्रमुद्रा आणि
तापट स्वभाव यामुळे बाबाखान म्हणजे
हिरवट टाळक्याचा माणूसअसे म्हटले आहे.
(
उ) बाबाखानला राहायला घर कोणी दिले होते?
उत्तर – गावच्या पाटलाच्या हाता पाया पडून त्याने पाटलाचा एक मोकळे छप्पर मागून घेतलं होतं आणि त्यात आपलं बिऱ्हाड थाटलं होतं.ते घर पाटलांनच दिलं होतं.
प्र. 3 खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
(
अ) दरवेशी, हा कोण होता ? तो पोटासाठी काय करत असे?
उत्तर – दरवेशी हा रामोशी जातीतील होता.तो पोटासाठी त्यांनी पाळलेल्या अस्वलाचा खेळ करून दाखवी.अस्वल होऊन तो वाड्यावरती हिंडी आणि मनगटातील लोखंडी कडी वाजवून म्हणे खडे रहो बेटा,बंदूक घेऊन लढाईला चालला गंगाराम,ओहो! रे गंगाराम,शाब्बास गंगाराम,असं म्हणून खेळ करी.पायली,दोन पायली जोंधळे सुगीच्या दिवसात जमा करीत असे.शिवाय देवऋषीपणाचा छुपा धंदा करी व थापा देऊन त्यांना लुबाडत असे.
(
आ) बाबाखानच्या अंगी कोणकोणते कसब होते ?
उत्तर – बाबाखान घरात जरी बायकोला मारहाण करीत असे तरी बाहेर लोकांशी तो आदबीने वागे.लहान मुलाला सुद्धा तो सरकार हजूर असे आदबीने बोले व वागे.गोड बोलून लोकांना आपलंसं करणं हे त्याचं कसब होतं.त्याचा वागण्याचा झोक तसाच होता.अंगापिंडानं गाजरासारखा लालबुंद,वागणं झोकात असे आणि बोलणं खडीसाखरेच्या खड्यागत गोड,मिठास बोलण्याबरोबरच तो भेदिकगाणार होता.मारुतीच्या देवळासमोर तो गात असे या कसबामुळे तो आसपासच्या गावातही सर्वांना परिचित होता.



 


(
इ) बाबाखान लेखकाच्या गावी का आला होता?
उत्तर –  बाबाखान आपले व आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी लेखकाच्या गावात
आला होता.सुगीचे दिवस होते.दारोदारी
, खेडोपाडी अस्वलाचा खेळ दाखवून तो धान्य पैसा गोळा करत असे.पाटलाने दिलेल्या जागेत
तो त्याची
बायको, तीन मुले,चार मुली अस्वल आणि घोडा असा संसार लेखकाच्या छपराखाली त्यांने
थाटला होता.

प्र.4 ( था ) संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
(
अ) “आन् या गाढवाला कळू नये का? अस्वल जाण्यायेण्याच्या वाटेवर बांधलंय ते!”
उत्तर –
संदर्भ – उपरोक्त विधान बाबा खान दरवेशी या पाठातील असून हे व्यक्तिचित्र व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिले आहे.
स्पष्टीकरण – अस्वलाने वर्षा दीड वर्षाच्या बाबा खानाच्या मुलाला आपल्या पंजाब धरलं होतं व घुसळत होतं.माणसं जमा होऊन गोखले लागली पोर मेलं असतं.आज खानाच्या बायकोने पोराला अस्वलापासून काढून घेतलं होतं.तेव्हा लोकांनी वरील विधान म्हटले आहे.
(
आ) “शिकलं सवरलेलं जनावर मिळणं कठीणं. आणि ते हाय म्हणून
जगतोय!”

उत्तर –
संदर्भ – उपरोक्त विधान बाबा खान दरवेशी या पाठातील असून हे व्यक्तिचित्र व्यंकटेश माडगूळकरांनी लिहिले आहे.
स्पष्टीकरण -लेखकाने बाबा खानला जेव्हा अधिक गृहस्था एवढ्याशा कारणावरून तू बायकोला ढोरा सारखा तुडवतोस आणि काल ते जनावर पुढच्या पोराला जीवे मारीत होतं तर त्याला चार बोटाने सुद्धा शिवला नाहीस त्यावेळी त्यांनी लेखकाला स्पष्टपणे सांगताना वरील विधान म्हटले आहे.

(
इ) “नवऱ्यानं मारलं आणि पावसानं झोडपलं तर तक्रार न्यायची कुणाकडे ?”
उत्तर –
संदर्भ – उपरोक्त विधान बाबा खान दरवेशी या पाठातील असून हे व्यक्तिचित्र व्यंकटेश माडगूळकरांनी
लिहिले आहे.

स्पष्टीकरण – काहीतरी भयंकर बघण्या-ऐकण्यासाठी फसफसलेली मन गप्प बसली.त्यांनीच मनात म्हटलं प्रश्नच मिटला.व्यंकटेश माडगूळकरांनी समाज कसा बोलतो बघतो त्याचं चित्रण करताना विधान म्हटले आहे.



 

प्र.5 (वा) खालील प्रश्नांची पाच ते सहा ओळीत उत्तरे लिहा.
(
अ) बाबाखान दरवेशाच्या स्वभावाचे वर्णन करा.
बाबाखान दरवेशी मोठा हिरवट टाकळ्याचा माणूसहोता पण इतरांशी त्याची वागणूक वावगी नव्हती.पाच वर्षाच्या पोरालादेखील तो सरकार,हुजूर संबोधत असे.तो अंगानं टणक होता.तो आदबिनं वाकून सलाम करून हुजूर कुणीकडे पाय?’ म्हटले की ऐकणारा खुश होऊन त्याला राम,रामम्हणत असे.त्याचा देवऋषीपणा,मंत्र-तंत्र,उग्रमुद्रा आणि तापट स्वभाव यामुळे बाबाखान गावकऱ्यांना हिरवट स्वभावाचा वाटत असे.
(
आ) अस्वलाच्या खेळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा.
उत्तर – बाबा खान त्याच्या अस्वलाला येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवरच बांधत असे. नाकातली व्यसन पुढच्या बाजूच्या खुंट्याला आणि मागला एक पाय मागच्या कुंट्याला जखडलेला असायचा बाबा खान अस्वल घेऊन तो वाड्यावर वस्त्यांवर फिरत असेल मनगटातील लोखंडाची कधी वाजवून म्हणत असे,’खडे रहो बेटा,बंदूक घेऊन लढाईला चालला गंगाराम,ओ..हो! रे गंगाराम,शाब्बास गंगाराम,असं ओरडून ओरडून त्या गया प्राण्याचा खेळ कधी सुगीचे दिवस असल्याने त्याला पायली दोन पायल्या जोंधळे मिळत असत.




प्र. 6 (वा) खालील प्रश्नांची आठ ते दहा ओळीत उत्तरे लिहा.
(
अ) बाबाखानने अस्वलाचा सांभाळ
कशा प्रकारे केला होता
?
उत्तर – बाबाखानने अस्वलाला चांगल्या तऱ्हेने सांभाळले होते.कारण त्या अस्वलाचा खेळ म्हणजे त्याच्या पोटा पाण्याचा प्रश्न होता.तो आपले अस्वल घराच्या दारालाच लागून असलेल्या येण्याजाण्याच्या वाटेवर एका बाजूला डांबून ठेवत असे.त्या अपुऱ्या जागेत ते गलिच्छ जनावर तोंडाने चमत्कारिक आवाज करीत झुलत असायचं. जमलेली मुले खडा मारत तेव्हा ते वसकन अंगावर येईल अस्वलाला खायला काय मांस लागत नाही काही नाही शेरभरच्या कण्या भरडून शिजवल्या म्हणजे त्याच्यावर अस्वलाचे पोट भागत असे.अस्वल खेळ शिकलेलं जनावर होतं.त्यामुळे तो त्याचा नीट सांभाळ करत असे.रागाच्या भरात त्याला मारून दुखापत झाल्यास खेळ बंद होईल दुसरे असे शिकवलेलं जनावर मिळणार नसल्याची जाणीव बाबाखानला होती म्हणून तो अस्वलाचा नीट सांभाळ करीत असे.
(
आ) बाबाखानच्या पत्नीचे वर्णन कसे केले आहे?
उत्तर – बाबाखानची बायको वेडसरच होती वेडसर म्हणण्यापेक्षा बिचारी भोळी भाबडी होती तिचं वेडबागड रूप झिंज्या सदा विस्फारलेल्या अंगावर कसंतरी गुंडाळलेले सुडक बाबाखानची बायको म्हणजे खरोखरच एक ध्यान होतं.पोरांचं लेंढार मागं घेऊन ती कुठंतरी भटकत असे गावात. पोरांचं लेंढार पाहून कुणीतरी बाबाखानला विचारलं तर हसत म्हणायचा,’ असुदे मायबाप अल्ला घराचा पानमळा हाय. पण या पानमळ्याच्या आईला बाबाखान गुरासारखा बडवीत असे व तिच्यावर आपला राग काढत असे.



 

भाषाभ्यास :
(
अ) वाक्प्रचारांचा अर्थ सांगून.
इरेला पडणे – इर्षीला पडणे
बाबाखान इरेला पडला की असा हिरवळ टाकळ्याचा वाटत असे.
गहिवर मांडणे – कंठ दाटून येणे
बाबा खानने बायकोला इतके बडवले होते की बोलताना तिला गहिवरून आले.
दगडाचे काळीज – मगरुरी असणे
अस्वलाच्या अंगातील गुर्मी कमी झाली नाही
गळा काढणे – मोठ्याने रडणे
बाबाखानची बायको गळा काढून रडत होती.
खर्ची पडणे – संपणे
त्याने उसनवार काढलेले पैसे घरासाठी खर्ची पडले.
मन भरून येणेमनात वाईट वाटणे
त्याची अशी अवस्था पाहून लोकांचे मन भरून येत होते.
उतू जाणे – भरून वाहणे
बाबाखानचे मुलावरील व अस्वलावरील प्रेम ऊतू जात होते.



 


(
आ) समानार्थी शब्द सांगा.
कवाड – झोपडीचा दरवाजा
ओशाळणे – चेहरा पडणे
कसब – अंगातील कला
दगावणे – मरणे
पुसणे – विचारणे
संबोधणे – एखाद्याला उद्देशून बोलणे
आदब – वंदन मुजरा

(इ) विग्रह करून समास ओळखा.
उग्रमुद्रा उग्र अशी मुद्रा
कर्मधारेय तत्पुरुष समास
काळोखीरात्र – काळी अशी रात्र

तत्पुरुष समास
रानोमाळ –
मायबाप –
पोरंबाळं –



 

helpdesk%20(1)

वरील प्रश्नोत्तरे pdf स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी CLICK HERE वर स्पर्श करा..

click here green button



Share with your best friend :)