इयत्ता – नववी
विषय – मराठी
9. वाचू आनंदे
लेखिका – डॉ. स्नेहलता देशमुख
परिचय :
■ डॉ. स्नेहलता देशमुख (जन्म 1938) शिक्षण एम.बी.बी.एस. व एम.एस.
■वैद्यक आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रात त्यांची अफाट मुशाफिरी आहे.
■लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा (डीन) कार्यभार त्यांनी प्रदीर्घकाळ सांभाळला.
■मुंबई विद्यापीठाच्या त्या पाच वर्षे कुलगुरु होत्या.
■साहित्यक्षेत्रातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.‘अरे संस्कार संस्कार‘, ‘गर्भसंस्कार तंत्र मंत्र‘, ‘तंत्रयुगातील उमलती मने‘, ‘लोकशाही जाणीव व जोखीम‘, ‘अन्न संस्कार‘, ‘टेक केअर‘, ‘आई‘ इत्यादी संस्कारक्षम साहित्य प्रसिद्ध आहे.
■‘वाचू आनंदे‘ हा पाठ ‘तंत्रयुगातील उमलती मने‘ या पुस्तकातून वाचनाचे महत्त्व सांगितले आहे. आहे. या पाठात लेखिकेने
शब्दार्थ :
■ उद्धृत करणे – उतरवून घेणे
■प्रगल्भता – परिपक्वता अष्टा
■ द्योतक – प्रतीक
■ चोखंदळ – चिकित्सक
■वर्धिष्णु – वाढणारा
टीपा :
■ चरक संहिता – चरक संहिता नावाचा आयुर्वेद शास्त्रावरील उत्कृष्ट ग्रंथ.
■ वाग्भट -प्राचीन काळातील आयुर्वेद शास्त्रातील पारंगत वैद्य.
■ गंगालहरी – जगन्नाथ पंडित यानी गंगालहरी हे काव्य लिहिले. यात गंगानदीचे महत्त्व वर्णन केले आहे.
■ शाकुंतल – संस्कृत साहित्यातील महाकवी कालिदासाने ‘अभिज्ञान शाकुंतलम” नावाचे उत्कृष्ट
■ रघुवंश – महाकवी कालिदासाने लिहिलेले हे महाकाव्य आहे. रघुवंश म्हणजे प्रभू रामचंद्राच्या वंशातील राजे लोकांच्या पराक्रमाचे व सदाचाराचे वर्णन केलेले काव्य.
प्र.1 (ला) खालील पर्यायातून योग्य तो पर्याय निवडून लिहा.
(अ)आपण प्रत्येक गोष्ट याच्या कसोटीवर पडताळून बघत आहोत.
(अ)धर्माच्या
(ब) विज्ञानाच्या
(क) लोकमताच्या
(ड) देवाच्या
उत्तर –(ब) विज्ञानाच्या
आ) ‘वाचाल तर वाचाल‘ असे यानी म्हटले आहे.
(अ) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
(ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(क) वि.दा. सावरकर
(ड) लोकमान्य टिळक
उत्तर –(ब) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
(इ) माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात हा अविभाज्य घटक आहे.
(अ) मोबाईल
(ब) दूरदर्शन
(क) संगणक
(ड) रेडिओ
उत्तर – (क) संगणक
(ई) आज मुलांच्या मनांवर या माध्यमाचा पगडा आहे.
(अ) इलेक्ट्रॉनिक
(ब) तंत्रज्ञान
(क) यंत्रज्ञान
(ड) मंत्रज्ञान
उत्तर – (अ) इलेक्ट्रॉनिक
प्र. 2 रा खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. संस्कार म्हणजे काय
उत्तर – संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दुर्गुणांचा भागाकार सजगता संवेदनशिलतासहयोग सुंसस्कृतता सहमत सहभाग सहिष्णुता आणि सदसविवेक बुद्धीने वागणे होय .
2. आजकाल माणसाचे सर्वस्व कोणते?
उत्तर – आज काल माणसाचे सर्वस्व वाचन विचार व ज्ञान मिळवणे हे आहेत केवळ पैसा मिळवणे नाही .
३. पूर्ण ब्रह्म असे कशाला म्हटले आहे ?
उत्तर – अन्न हे पूर्णब्रह्म असे म्हटले आहे.
४. लेखिकेवर वाचन संस्कार कोठे घडले?
उत्तर – लेखिकेवर वाचन संस्कार घरातच तिच्या आजोबांनी वारंवार रोज काहीतरी वाचित जावे म्हणून सांगितल्याने घरातील ग्रंथ वाचनाने झाले .
5. मनाचे शोषण कशामुळे होते?
उत्तर – अन्न जसे शरीराचे पोषण करते. तसेच वाचन मनाची शुद्धता ठेवते आणि मनाचे पोषण करते .
प्र. 3 रा – खालील प्रश्नांची दोन तीन
वाक्यात उत्तरे लिहा.
१.मुलांचा भावनिक बुद्ध्यांक उत्तम असतो हे कोणत्या प्रयोगाने सिद्ध केले आहे?
उत्तर – वाचनालयात जाणारी मुले साधारणतः शांत स्वभावाची निपजली.गर्भावस्थेत बाळाच्या आईनेवाचन केले मनन केले, चिंतन केले व गर्भाशय संवाद साधला,तर गर्भावर चांगला परिणाम होतो.त्यांचा भावनिक बुद्ध्यांक उत्तम असतो.असा निष्कर्ष माध्यम टेलिव्हिजन व त्यावरील बातमी पाहणे.तीच दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रातून सविस्तर वाचणे.जास्त परिणामकारक ठरते व वार्तापत्रातील उपयुक्त स्तंभ ज्ञानात भर घालतात.चांगली मासिके,नियतकालिके,पुस्तके,काव्य हे सर्व वाचनीय चिंतनीय ठरते.त्यांचा स्पर्श,रंग,रस,गंध साठवून वाचनाची सवय वाढते आणि बुद्ध्यांक वाढतो,
2.आपल्या भूतकाळाची माहिती कशावरून मिळते?
उत्तर – आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात संगणक अविभाज्य घटक असला तरी त्यात बदल होत आहेत.हार्ड डिस्क,फ्लॉपी,कॉपॅक्ट डिस्क असे बदल झाले तरी ते कितपत शाश्वत आहेत.असे मनात येते.उत्खनामध्ये शिलालेख ताम्रपट मिळणे हे संस्कृतीचे द्योतक आहे.त्या काळाची माहिती मिळणे शक्य झाले.
इजिप्तमध्ये पॅपिरस ग्रंथ,आपल्याकडे चरक सुश्रुत,मार्कडेय पुराण,अष्टादश महापुराणांपैकी एक.तसेच अनेक भाषांमधील प्राचीन ग्रंथ.शिलालेख.ताम्रपट.पानावर लिहिलेले लेख.यातून आपल्याला आपल्या भूतकाळाची माहिती मिळते.
प्र.
४ था – संदर्भ सहित स्पष्टीकरण करा
१. “ज्ञान विज्ञान सांहित”
संदर्भ – वरील विधान ‘वाचू आनंदे’ या पाठातील असून लेखिका डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या ‘तंत्र युगातील उमलती मने’ या पुस्तकातील
हा उतारा आहे.
स्पष्टीकरण- आपले भूतपूर्व राष्ट्रपती राधाकृष्णन यांनी असे म्हटले आहे.‘ज्ञान,विज्ञान सहित म्हणजेच विज्ञान आणि ज्ञान हे दोन्ही घटक अतिशय महत्त्वाचे आहेत.ज्ञानाला विज्ञानाचे डोळे असले पाहिजे.प्रगती निश्चित म्हणून संस्कार हे विज्ञाननिष्ठ असावेत असे वरील ओळीतून सांगण्यात आले आहे.
2. “कविता करतो तेव्हा ती माझी असते.पण एकदा का ती कागदावर उतरली की ती लोकांची होते.”
संदर्भ – वरील विधान ‘वाचू आनंदे’ या पाठातील असून लेखिका डॉक्टर स्नेहलता देशमुख यांच्या ‘तंत्र युगातील उमलती मने’ या पुस्तकातील
हा उतारा आहे.
स्पष्टीकरण –कवी ब्राऊनिंगने कवितेबद्दल म्हटले आहे की,ती सुद्धा जीवाला भिडते.तो म्हणतो कविता करतो तेव्हा ती माझी असते.पण एकदा का ती कागदावर उतरली की ती लोकांची होते.कारण लेखक किंवा कवी लिहितो तेव्हा ते वाचकांनी वाचावे म्हणून तो चोखंदळ वाचकावर प्रेम करतो आणि लिहित जातो ते लिहिणे ग्रहण करायला बुद्धी लागते या दोहाचा मेळ बसला तरच वाचनाने मन समृद्ध आणि शांत होईल.
प्र. 5 वा खालील प्रश्नांची पाच-सहा ओळीत उत्तरे लिहा.
१. आजच्या परिस्थितीचे वर्णन लेखिकेने कसे केले आहे
उत्तर – आजच्या परिस्थितीचे वर्णन करताना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात संगणक हा अविभाज्य घटक आहे.त्यातही बदल होत आहे.पूर्ण खोली व्यापणाऱ्या संगणकापासून ते हाताच्या तळव्यात मावणाऱ्या संगणकापर्यंत प्रगती झाली.हार्ड डिस्क,फ्लॉपी,कॉम्पॅक्ट डिस्क असे बदल झाले.पण हे बदल कितपत शाश्वत कायम टिकणारे आहेत.ताम्रपटामुळे त्या काळाची माहिती झाली.पण या डिस्कचे तसे होईल काय? याची खात्री नाही.पण अशा अडचणी वाचनात येणार नाहीत. कारण त्यात कोणताच अडथळा नाही
2 . लेखिकेच्या मैत्रिणीने वाचनाची साथ कशी पसरवली?
उत्तर – वाचनामुळे अनेक फायदे होतात नवीन विचार सुचतात.लेखिकेच्या एका मैत्रिणीने वाचनालयाच्या
सहाय्याने सुसंस्कारिकत वाचन चळवळ सुरू केली.तिला आवडलेल्या एका पुस्तकाचा शेवट ती मुलांना सांगत असे.पुस्तक घेऊन वाचावेसे वाटावे असे तिचे संवाद कौशल्य होते.लहानपणीच हे वाचन संस्कार झाले.एवढेच नव्हे तर गर्भावस्थेत असताना वाचन संस्कार झाले.अशाप्रकारे मैत्रिणीने वाचनाची साथ अशी पसरवली.
प्र. 6 वा खालील प्रश्नांची ८/१० ओळीत उत्तरे लिहा.
१. उद्योजकाने आपल्या मुलांना काय विचारले मुलांनी त्यांना कोणकोणती उत्तरे दिली?
उत्तर – एका प्रथितयश उद्योजकांनी आपल्या चार मुलांना त्यांना पुढे काय व्हायचे आहे? असे विचारले. पहिला मुलगा म्हणाला, ‘डॉक्टर व्हायचं’ दुसऱ्याला इंजिनिअर व्हायचे होते.तर तिसऱ्याला आय ए एस करायचे होते.चौथा पुत्र म्हणाल,’ मला समजून घ्यायचे आहे.’ साहजिकच वडील चकित होऊन म्हणाले,’काय समजून घ्यायचे आहे?’ तेव्हा पुत्राने उत्तर दिले,’मला माणसं समजून घ्यायची,तसं शिक्षण हवं.’कारण हा मुलगा संस्कारित होता त्याने अनेक ग्रंथ वाचली
2.लेखिकेने वाचनाचे महत्त्व कसे स्पष्ट केले आहे?
उत्तर – लेकीने वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना मुलांच्यावर वाचनाचे संस्कार होणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.आज चंगळवाद वाढला असून प्रत्येक जण पैशाच्या मागे लागला आहे.लेखिकेच्या घरात तिचे वडील स्वतः संस्कृत पंडित होते आणि उत्तम ग्रंथ वाचण्यासाठी होते.वाचन ही 64 कलापैकी एक कला आहे.वाचनामुळे ज्ञानाचा साठा मिळतो.जो दिल्याने बुद्धिगत होतो.जसं सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो तसंच सुंस्कारित वाचन घडो अशी प्रार्थना करून लेखिकेने वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.
भाषा अभ्यास
१.वाक्यात उपयोग करा
■ आकाशाला गवसणी घालणे -अशक्य वाटणारे शक्य करणे
वाक्य – मी आकाशाला गवसणी घातली.
■ झुगारून देणे – नाकारणे
वाक्य -रमेशने मुलगी झुगारली.
■ पगडा करणे – वर्चस्व ठेवणे
वाक्य – शिक्षणात इंग्रजीचा पगडा आहे.
■ चकित होणे – आश्चर्य वाटणे
वाक्य – मी सर्प पाहिले तेव्हा चकित झाले.
2. समानार्थी शब्द लिहा
चित्त -मन
डोळे – नेत्र
बळ -ताकत
गोडी – आवड
स्मरण -आठवण
गंध -वास
आयुष्य – जीवन
⭕गद्य -8 बाबाखान दरवेशी⭕
https://www.smartguruji.in/2022/12/8-9th-marathi-8babakhan-daraveshi.html
⭕सर्व पाठ व कविता प्रश्नोत्तरे ⭕
https://www.smartguruji.in/2022/01/navavi-marathi-prashnottare.html