दहावी समाज विज्ञान महत्वाचे प्रश्न 2. ब्रिटीश सत्तेचा विस्तार (SSLC SS IMP QUESTIONS AND ANSWERS )

 इयत्ता – दहावी 

विषय समाज विज्ञान 


 
दहावी समाज विज्ञान महत्वाचे प्रश्न 2. ब्रिटीश सत्तेचा विस्तार (SSLC SS IMP QUESTIONS AND ANSWERS )
 
. ब्रिटीश सत्तेचा विस्तार
प्र. . खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
. पहिले अँग्लोमराठा युद्ध या कराराने थांबले ?
उत्तर : साल्बाईचा (सालण्याचा) करार
. सहाय्यक सैन्य पद्धतीयांने अंमलात आणली?
उत्तर : लॉर्ड वेलस्ली
. सहाय्यक सैन्य पद्धत स्वीकारणारा पहिला राजा कोण ?
उत्तर : हैद्राबादचा निजाम
. मराठ्यांचा शेवटचा पेशवा कोण ?
उत्तर : दुसरा बाजीराव पेशवा
. दत्तक वारसा नामंजूर (खालसा धोरण) कायदा कोणी केव्हा लागू केला ?
उत्तर : लॉर्ड डलहौसी. १८४८ मध्ये लागू केला.
. ब्रिटिशांच्या विस्तारासाठी सहाय्यक ठरलेल्या दोन पद्धती कोणत्या?
उत्तर : . सहाय्यक सैन्य पद्धत
. दत्तक वारस नामंजूर
. दुसऱ्या अँग्लोमराठा युद्धाचे मुख्य कारण काय?
उत्तर : मराठ्यांमधील अंतर्गत संघर्ष
. खालसा धोरणांतर्गत कोणकोणती संस्थाने विलीन झाली?
उत्तर : . सातारा . नागपूर . संबलपूर . उदयपूर . जयपूर . झाशी .
 
प्र. . खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा
. पहिल्या अँग्लोमराठा युद्धाची कारणे द्या.
उत्तर : . दुसऱ्या शाह आलमने कोरा आणि अलाहाबाद हे प्रांत मराठ्यांना दिले.
.पेशवेपदासाठी मराठ्यांत आंतरिक वाद निर्माण झाला.
. राघोबा ब्रिटीशांच्या आश्रयाला गेला.
. या संधीचा आपल्याला पुरेपूर फायदा घेतला पहिले अँग्लो मराठा युद्ध झाले.
. दुसऱ्या अँग्लोमराठा युद्धाचे वर्णन करा.
उत्तर : . मराठ्यांधील अंतर्गत संघर्ष हेच या युद्धाचे मूळ कारण ठरले.
. १८०२ मध्ये होळकारांनी शिंदे (सिंदिया) पेशव्यांचा पराभव केला.
. पेशव्यांनी वसईच्या तहाद्वारे सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारली.
. यामुळे पेशवे आणि मराठा साम्राज्याचे वैर वाढले.
. १८०३ ते १८०५ दरम्यान लॉर्ड वेलस्लीने अनेक मराठा घराण्यांचा पराभव केला.
. ब्रिटीश साम्राज्याच्या विस्तारासाठी दत्तकवारसा नामंजूर कायदा कसा सहाय्यक ठरला ?
उत्तर. १८४८ मध्ये लॉर्ड डलहौसीने : दत्तकवारसा नामंजूरकायदा अंमलात आणला.
. यानुसार वारस नसलेल्या अनेक राजांना आपले राज्य गमवावे लागले.
. अनेक भारतीय राज्ये ब्रिटीश साम्राज्यात विलीन केली गेली.
. या कायद्यानुसार सातारा, नागपूर, संबलपूर, उदयपूर, जयपूर, झाशी राज्ये खालसा करण्यात आली.
प्र. . खालील प्रश्नांची पाच सहा वाक्यात उत्तरे लिहा
. तिसऱ्या अँग्लोमराठा युद्धाचे वर्णन करा.
उत्तर : . स्वतःची पत स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी मराठा घराण्यांनी शर्थीचे प्रयत्न केले.
. १८१७ साली पेशव्यांनी पुण्यातील इंग्रजांच्या रेसिडेन्सीवर हल्ला चढविला.
. नागपूरच्या आप्पासाहेबांनी मल्हारराव होळकरांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले.
. शेवटी दुसऱ्या बाजीराव पेशव्यांने ब्रिटीशांविरुद्ध कोरेगांव अष्टी येथे १८१८ मध्ये युद्ध केले. . इंग्रजानी पेशवा हे पद रद्द करून बाजीरावला निवृत्तीवेतन दिले.
. अशारीतीने त्यांनी मराठ्यांचा विरोध पूर्णपणे दडपून टाकला आणि इंग्रजांचे साम्राज्य भारतभर पसरले.
 
. सहाय्यक सैन्यपद्धतीमधील अटी कोणत्या ?
उत्तर : . सहाय्यक सैन्य पद्धती स्वीकारणाऱ्या राज्यकर्त्यानी इंग्रजांची एक मोठी फौज आपल्या राज्यात ठेवून घेवून तिच्या खर्चाची तरतूद करावयाची.
. राज्यकर्त्यांनी इतर राज्यांशी / संस्थानांशी स्वतंत्र करार करावयाचे नाहीत.
. राज्यकर्त्यांना इंग्रजांचा वकील आपल्या दरबारी ठेवावा लागे.
. इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतर कोणत्याही युरोपियनांची नेमणूक करता येणार नाही.
. सर्व सेवांच्या बदल्यात त्या राज्यकर्त्याला ईस्ट इंडिया कंपनी संपूर्ण संरक्षण मिळेल.


ABC 

Share your love
Smart Guruji
Smart Guruji
Articles: 2261

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *