S.S.L.C. MODEL QUESTION PAPER-2 : 2024-25
Subject : SOCIAL SCIENCE
Subject Code : 85-K
Time : 3 Hours 15 Minutes
Translated by – Smart Guruji
परीक्षार्थींसाठी सामान्य सूचना:
1. या प्रश्नपत्रिकेत एकूण 38 प्रश्न आहेत.
2. प्रश्नांसाठी दिलेल्या सूचनांचे पालन करा.
3. उजव्या बाजूला दिलेले आकडे प्रश्नांसाठी पूर्ण गुण दर्शवतात.
4. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी 15 मिनिटांसह उत्तर देण्यासाठी दिलेला वेळ, प्रश्नपत्रिकेच्या शीर्षस्थानी दिलेला आहे.
I: खालील प्रश्नांसाठी चार पर्याय दिलेले आहेत. योग्य उत्तर निवडा आणि अक्षरासह उत्तर लिहा. 8 × 1 = 8
- रयतवारी पद्धत कोणी अंमलात आणली?
(अ) अलेक्झांडर रीड
(ब) कॉर्नवॉलिस
(क) जेम्स थॉमसन
(ड) आर. एम. बर्ड - हंटर कमिशन नेमण्याचा मुख्य उद्देश काय होता?
(अ) चौरी-चौरा घटनेची चौकशी करणे
(ब) जलियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करणे
(क) भारत आणि पाकिस्तानची सीमा निश्चित करणे
(ड) भारताला सार्वभौम (डॉमिनियन) दर्जा देणे. - पेट्रोलियमला ‘द्रवरूपातील सोनं’ का म्हणतात?
(अ) बहुउपयोगी ऊर्जा स्त्रोत असल्यामुळे
(ब) मोठ्या प्रमाणात निर्यात होते म्हणून
(क) सर्वाधिक भेसळयुक्त स्त्रोत असल्यामुळे
(ड) युद्ध आणि शांततेच्या काळात वापरले जाते म्हणून - सार्वजनिक प्रशासनाचा जनक कोण आहे?
(अ) एफ. एम. मार्क्स
(ब) लूथर गुलिक
(क) वूड्रो विल्सन
(ड) पिफ्नर - आपल्या संविधानातील कोणता अनुच्छेद अस्पृश्यतेवर बंदी घालतो?
(अ) 14
(ब) 17
(क) 24
(ड) 29 - गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला?
(अ) 1992
(ब) 1993
(क) 1986
(ड) 1994 - भारत सरकारने 1965-66 मध्ये दुष्काळावर उपाय म्हणून कोणता निर्णय घेतला?
(अ) गव्हाच्या उच्च उत्पादनक्षम प्रकाराच्या बिया सादर केल्या
(ब) शेतकऱ्यांसाठी अनुदान जाहीर केले
(क) भातासाठी आधारभूत किमती लागू केल्या
(ड) निती आयोगाची स्थापना केली - यशसने स्विग्गीवरून डोसा विकत घेतला. त्याने कोणत्या प्रकारच्या विपणन प्रणालीचा वापर केला?
(अ) घाऊक विक्री
(ब) आयात
(क) टेलिशॉपिंग
(ड) निर्यात
II: खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तर द्या: 8 × 1 = 8
- ब्रिटिशांनी चन्नम्माला बैलहोंगलहून कुसुगाळ तुरुंगात का हलवले?
- चार्टर कायद्यांचा मुख्य उद्देश काय होता?
- किनारपट्टीवर मॅन्ग्रोव्ह जंगलं का वाढवावीत?
- राष्ट्रीय विद्युत जाळ्याचा उद्देश काय आहे?
- भरती म्हणजे काय?
- हुंडा हा लिंगभेदाचे कारण आहे. स्पष्ट करा.
- सध्या सार्वजनिक खर्च का वाढत आहे?
- जिल्हा औद्योगिक केंद्रे का स्थापन करण्यात आली?
III: खालील प्रश्नांची प्रत्येकी दोन ते चार वाक्यांत उत्तर द्या: 8 × 2 = 16
- गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून कसा मुक्त झाला?
- फॅसिझमच्या वैशिष्ट्ये काय होती?
- कागद उद्योगासाठी वापरण्यात येणारा कच्च्या मालाची यादी करा.
- ऑक्टोबरपासून नैऋत्य मान्सूनचे वारे परत जाण्यास प्रारंभ का करतात?
- महिला स्वसहाय गट ग्रामीण भागात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.कशी?
- ग्राहक संरक्षण कायद्याचे उद्दिष्टे सांगा.
- यूपीएससी सार्वजनिक प्रशासन व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावते. स्पष्ट करा.
किंवा
भारताने अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याच्या धोरणासाठी वचनबद्धता का ठेवली आहे? - चिपको आंदोलनाबद्दल संक्षिप्त माहिती द्या.
किंवा
बालविवाहाची कारणे स्पष्ट करा.
भाग IV: खालील प्रश्नांची प्रत्येकी सहा वाक्यांत/मुद्यांत उत्तर द्या: 9 × 3 = 27
- सत्यशोधक समाजाच्या सुधारणा सांगा.
- बक्सारच्या लढाईचे परिणाम काय होते?
- भारत सरकार साक्षरता नष्ट करण्यासाठी खूप प्रयत्नशील आहे. स्पष्ट करा.
- असंघटित क्षेत्रातील कामगारांना भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या?
- भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील बंदरांची नावे सांगा.
- सहाय्यक सैन्य पद्धतीच्या अटी स्पष्ट करा.
किंवा
नाल्वडी कृष्णराज वडेयर यांच्या कामगिरीचे वर्णन करा. - आपण मातीची धूप कशी थांबवू शकतो?
किंवा
भारताच्या आर्थिक विकासात कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका काय आहे? - भारत सरकार भारतीय शेतीच्या विकासासाठी कोणते प्रयत्न करत आहे?
किंवा
प्रत्यक्ष कर हा अप्रत्यक्ष करापेक्षा वेगळा कसा आहे? - बँक खाते उघडण्याचे फायदे काय आहेत?
किंवा
उद्योजकाची वैशिष्ट्ये कोणती?
V: खालील प्रश्नांची प्रत्येकी आठ वाक्यांत उत्तर द्या: 4 × 4 = 16
- सुभाषचंद्र बोस यांची भूमिका भारतीय स्वातंत्र्य संग्रामात एक महत्त्वाचा टप्पा आहे. स्पष्ट करा.
- जंगलांचे महत्त्व स्पष्ट करा.
- संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची रचना आणि कार्य स्पष्ट करा.
- ब्रिटिश शिक्षणाचे भारतीयांवर झालेले परिणाम स्पष्ट करा.
किंवा
पहिल्या भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे परिणाम स्पष्ट करा.
VI: दिलेल्या भारताच्या नकाशावर खालीलपैकी कोणतीही पाच स्थाने चिन्हांकित करा: 1 × 5 = 5
(अ) 82°30′ पूर्व रेखांश
(ब) इंदिरा पॉईंट
(क) भाक्रा नानगल
(ड) लातूर
(इ) कन्याकुमारी
(फ) आपल्या देशाच्या वायव्य दिशेला असणारे शेजारील देश
(ग) भारताचे चहाचे बंदर
दृष्टीहीन विद्यार्थ्यांसाठी पर्यायी प्रश्न:
(प्रश्न क्र. 38 च्या ऐवजी)
हिमालय पर्वत भारतीयांसाठी कसा उपयुक्त आहे हे स्पष्ट करा.
Translated by – Smart Guruji