इयत्ता – आठवी
विषय – विज्ञान
कलिका चेतरिके
9. ध्वनी
अध्ययन निष्पत्ती
1 – ध्वनी निर्मितीचा अर्थ समजून घेऊन ध्वनी निर्माण करणाऱ्या
साधनांचे वर्गीकरण करणे.
2. ध्वनी प्रसारित करण्यासाठी माध्यमाची
आवश्यकता असते हे कृतीद्वारे करून दाखवणे.
3. कंपन, वारंवारता, आवर्तनकाल, आयाम अर्थ समजण्याबरोबर ध्वनीची तीव्रता आणि आवर्तन यांचे
एकक वर्णन करणे.
अध्ययन निष्पत्ती : 1
अध्ययन पत्रक – 1
कृती : 1 संगीत वाद्य आणि
त्यांच्या कंपन होणाऱ्या भागांची यादी करा
अध्ययन निष्पत्ती : 2
अध्ययन पत्रक – 2
कृती : 1 खाली दिलेली चित्रे पाहून रिकाम्या जागेत माहिती लिहा.(या
कृतीचे उत्तर लिहिण्यास पुस्तकाची किंवा शिक्षकांची मदत घ्या.)
अध्ययन निष्पत्ती : 3
अध्ययन पत्रक – 3
कृती : 1
हे चित्र पहा मोजपट्टीच्या सहाय्याने मोजमाप करा.
तुमची निरीक्षणे लिहा. कोणत्या संदर्भामध्ये तुम्ही मोठ्याने ध्वनी ऐकता? का? (सूचना
-जादा माहितीसाठी शिक्षकांची मदत घ्या.) वरील कृतीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे
लिहिण्याचा प्रयत्न करा.
1. कंप पावणाऱ्या वस्तूच्या एका
सेकंदामध्ये होणाऱ्या आंदोलनाला कालावधी असे म्हणतात. (बरोबर / चूक)
चूक (वारंवारता म्हणतात,)
2. कंपनाची वारंवारता जितकी जास्त तितका आवाज कमी होतो.
(बरोबर/चूक)
चूक (आवाज (ध्वनी) जास्त होतो.
3. कंपन आयाम जितका कमी असेल तितकी
उच्च निश्चता जास्त. (बरोबर/चूक)
चूक (निश्चता कमी)
मी अध्ययन केलेल्या घटकांचे मी स्वतः पडताळणी करेन.
1. ध्वनी कसा निर्माण होतो?
उत्तर – दोन पृष्ठभाग एकमेकांवर आदळल्याने कंपने
निर्माण होतात व ध्वनी निर्माण होतो.
2.ध्वनी प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.हे प्रयोगाच्या साहाय्याने स्पष्ट
करा.
उत्तर – एका कारगाडीच्या काचा बंद असतील तर आतील
व्यक्तीने बोललेले बाहेरच्या व्यक्तीला ऐकू येत नाही.
3.ध्वनीची उच्चनिश्चता निर्धारित करणारा घटक कोणता?
उत्तर – आंदोलनाची वारंवारता हा ध्वनीची उच्चनिश्चता
निर्धारित करणारा घटक आहे.
4. एक साधा लंबक 4 सेकंदामध्ये 40 आंदोलने पूर्ण करतो.तर त्याचा आंदोलन काल आणि वारंवारता काढा.
उत्तर –
वारंवारता = आंदोलन
/ काल
= 40/4
= 10 Hz
काल = 1 / वारंवारता
= 1
/ 10
= 0.1 Sec
5. वारंवारता आणि आयाम यातील फरक स्पष्ट करा.
उत्तर – कंपनाची
वारंवारता जास्त असल्यास, ध्वनीचा चढउतार जास्त असतो.
कंपनाचा आयाम मोठा असेल तर ध्वनी मोठा असतो.
6.तरंगाची वारंवारता 20 असेल
तर आंदोलन काल काढा.
काल = 1 / वारंवारता
= 1
/ 20
= 0. 05 Sec
7.ध्वनी प्रदूषणापासून होणारे तोटे कोणते?
उत्तर – झोप न लागणे,उच्च
रक्तदाब,अति काळजी बहिरेपणा
8.ध्वनी प्रदूषण नियंत्रण करण्याचे उपाय सांगा.
उत्तर – गोंगाट निर्माण करणारे उद्योग दूर उभारले गेले
पाहिजेत.
गाड्यांचा,भोंग्याचा आवाज कमीत कमी
होईल हे पाहिले पाहिजे.