कोविड 19 संक्रमित रोगामुळे देशभरात गंभीर परिस्थिती उद्भवल्यामुळे कोणत्याही शैक्षणिक प्रवासास परवानगी देऊ नये असे सूचना करण्यात आली आहे.परंतु उल्लेख द2,3 आणि 4 मध्ये राज्याध्यक्ष,कर्नाटक राज्य माध्यमिक सहशिक्षक संघ,अध्यक्ष व कार्यदर्शी कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ बेंगळूर तसेच उपनिर्देशक बेंगलोर उत्तर आणि उडूपी व इतरानी दूरध्वनीमाध्यमातून चर्चा करून निवेदन दिल्याप्रमाणे प्रस्तुत 2022 23 या शैक्षणिक वर्षात राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवास आयोजित करण्यासाठी मार्गदर्शन व अनुमती देण्यात येत आहे.खालील अटीप्रमाणे क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी परिशीलन करून संबंधीत माहिती उपनिर्देशक कार्यालयांना द्यावी..
सहलीच्या अटी व नियम –
1.प्रत्येक वर्षी डिसेंबर महिना अखेर पूर्वी शैक्षणिक सहलीचे आयोजन करावे कोणत्याही कारणास्तव डिसेंबर महिन्यानंतर शैक्षणिक सहलीचे नियोजन करू नये.
2.पालकांची संमती असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीस घेऊन जाणे.
3.सहल शैक्षणिक असावी.विद्यार्थ्यांना अध्ययनास पूरक होईल अशा स्थळांची निवड सहलीसाठी करावी.
4.शैक्षणिक सहलीचे नियोजन करणाऱ्या खाजगी शाळांनी प्रस्तुत शैक्षणिक वर्षामध्ये शाळा मान्यता नवीकरण करणे अनिवार्य आहे.
5.शैक्षणिक सहल शाळा चालू दिवसात आयोजित केल्यास पुढील दिवशी म्हणजे शनिवार पूर्ण दिवस किंवा रविवारी शाळा भरून अभ्यास भरून काढावा.
6.शिक्षण खात्याकडून शैक्षणिक प्रवासासाठी कोणती सुविधा दिली जाणार नाही.
7. सहलीदरम्यान कोणतीही दुर्घटना घडल्यास शाळेचे प्रमुख थेट जबाबदार असतील,शिक्षण विभाग जबाबदार राहणार नाही.
8. शैक्षणिक सहल कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळ किंवा कर्नाटक राज्य पर्यटन विभागाच्या वाहनांनेच करावी.
9. कोणत्याही कारणास्तव अनधिकृत खाजगी आणि मिनी बसमधून प्रवास करू नये.
10.लहान मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता याला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे आणि कोविड 19 संदर्भात सुरक्षा उपायांचे काटेकोरपणे पालन करावे.
11. सहलीला नियुक्त केलेल्या महिला शिक्षिकांनी विद्यार्थिनींची काळजी घ्यावी.