7वी समाज अध्ययन पत्रक 21,22 KALIKA CHETARIKE 2022 7th SS Learning Sheet 21,22) अध्ययन अंश 12 भारताचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारणा

KALIKA CHETARIKE 2022 

इयत्ता – सातवी 

विषय- समाज  विज्ञान 
 
अध्ययन अंश
12

                          भारताचे
पहिले स्वातंत्र्ययुद्ध आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारणा

अध्ययन निष्पत्ती: भारताचे
पहिले स्वातंत्र्ययुद्ध आणि ब्रिटिश राजवटीतील सुधारणा तसेच भारतीयांच्या
प्रतिक्रियांचे विवरण करणे.

उत्तरे  

        अध्ययन पत्रक 21

कृती 1: पाठ्यपुस्तकात भारताच्या स्वातंत्र्य
संग्रामाचा इतिहास समजावून घेतला आहे याच आधारावर खाली दिलेल्या रिकाम्या जागेत एक
छोटीशी गोष्ट लिहा.

उत्तर – पोर्तुगीज,डच व्यापारासाठी
भारतात येऊन भरपूर नफा मिळवला होता.त्याचा इंग्रजानांही मोह झाला व ते
व्यापारासाठी भारतात आले.इंग्रज भारतात आल्यावर येथील अशिक्षित भारतीयांचा फायदा
घेऊन एका हाती तराजू तर दुसऱ्या हाती तलवार या धोरणाने भारतातील अनेक राज्ये
बळकावली व आपली सत्ता स्थापन केली. भारतीयांना गुलामाची वागणूक देऊन त्यांच्याकडून
जनावरासारखी कामे करून घेत होते.ही गुलामी कधी संपेल या प्रतिक्षेत प्रत्येक
भारतीय होता. यातूनच अनेक भारतीय सुपुत्रांनी ब्रिटीश सरकारविरुद्ध चळवळ सुरू
केली. प्राणाची आहुती दिली.त्या सर्वांच्या बलिदानातून
15 ऑगस्ट 1947 रोजी
ब्रिटिशांची गुलामी जाऊन भारत स्वतंत्र झाला.
कृती 3: भारतामध्ये
ब्रिटिशांनी केलेल्या सुधारणा तसेच त्याला संबंधित काही प्रमुख बदल दिले आहेत

त्या जोड्या जुळवून लिहा.

उत्तर –

1.नागरी सेवा
कंपनी
नोकर खाजगी व्यापारात सहभागी होऊ न
ये.

2.लष्करी
राजवट
डेहराडून मिलटरी अकॅडमी ची स्थापना

3. पोलीस व्यवस्था  – प्रत्येक स्तरावर पोलीस स्टेशन ची स्थापना

4.न्याय
व्यवस्था
कलकत्ता येथे पहिल्या सर्वोच्च
न्यायालयाची स्थापना

5.इंग्लिश
शिक्षण
विश्वविद्यालयाची स्थापना

6. कृषी सुधारणा शेतकऱ्यांना जमिनीचे हक्क पत्र देण्यात
आले
.


7.व्यापार वाणिज्य मुक्त व्यापार धोरण


8. सामाजिक सुधारणा सती पद्धत कायदा निषेध


भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे मुख्य अंश:


भारताचा राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना – 1885

मवाळ पक्षाचा कालावधी – 1885 – 1905

जहाल पक्षाचा कालावधी 1905 – 1919

बंगालचे विभाजन – 1905

मुस्लिम लीगची स्थापना 1906

सुरतची फाळणी – 1907

जालियनवाला बाग हत्याकांड – 1919

असहकार चळवळ 1920 – 22

कायदेभंग चळवळ 1930 – 31

भारत छोडो आंदोलन – 1942

भारत स्वतंत्र झाला 1947

कृती 1: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील
मवाळ व जहाल नेत्यांचे वर्गीकरण करा.

मवाळवादी

जहालवादी

दादाभाई नौरोजी
महादेव गोविंद रानडे
सुरेंद्रनाथ बॅनर्जी
गोपाळकृष्ण गोखले

लाला लजपतराय
बाळ गंगाधर टिळक
बिपिनचंद्र पाल

कृती 2: स्वातंत्र्यसंग्रामात
मवाळवादी व जहालवादी पक्षांच्या संघर्षातून झालेले बदल आणि सुधारणा
पाठ्यपुस्तकाच्या सहाय्याने यादी करा.


मवाळवादी

जहालवादी

१.भारतीय समाजातील धर्म,प्रांत,जाती संदर्भात गैरसमज दूर करण्याचा
प्रयत्न केला.

2.वसाहतीच्या स्वराज्याची मागणी केली.
3.अनेक चाचक कायदे रद्द करण्याचा
प्रयत्न केला.

१. भारतीय
जनतेत नवा आत्मविश्वास निर्माण केला.

2.इंग्रजी सत्तेचे खरे स्वरूप जनतेला पटवून दिले.
3.बंगालच्या फाळणी विरुद्ध जहालवादी नेत्यांनी महत्त्वाची
भूमिका बजावली.

4. संपूर्ण
स्वराज्याची मागणी केली.
 
कृती 4: अलीकडच्या
काळात भारतातील कोणत्याही एका चळवळ / संप / संघर्ष विषयी माहिती 

संग्रहित करा आणि
त्यांचा उद्देश व परिणाम लिहा व तुमचा अभिप्राय सांगा.

उत्तर –  कोविड 19 या
संसर्गजन्य रोगामुळे भारतातील अनेक नागरिकांचा मृत्यू होत होता.त्यामुळे खबरदारी
म्हणून मार्च
2020 मध्ये भारत बंद पुकारण्यात आला होता.त्या काळात मुलभूत
सुविधा सोडून इतर सर्व दुकाने
,शाळा,कॉलेज,बस सेवा,रेल्वे सेवा इत्यादी बंद ठेवण्यात आले
होते.त्यामुळे रस्त्यावर कोणीही माणूस फिरत नव्हता.लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले
होते. लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले होते.या भारत बंदमुळे कोरोना
रोगाच्या प्रसारास आळा बसला व कोरोनाची भिती दूर होऊन सर्व सुरळीत सुरू झाले.

 Share your love

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.