इयत्ता – नववी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
स्वाध्याय
17. अहोम राजघराणे, मोंघल आणि मराठे
1. योग्य शब्दासह रिक्त जागा भरा.
2. अहोम घराण्याचे संस्थापक सुकपा राजा .
3. मोंघल घराण्याचे संस्थापक बाबर होते.
4. मोंघलाचा प्रसिद्ध सुलतान अकबर होय.
5. आग्य्राचा प्रसिद्ध ताजमहाल शहाजहान यांनी बांधला.
6. दिन-ई-ईलाही या नवीन धर्माची स्थापना केलेला मोंघल सुलतान अकबर यांनी केली.
7. छत्रपती शिवाजी महाराजांचा आईचे नांव जिजाऊ
2. समुहात
चर्चा करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
3. अहोम साम्राज्याची प्रमुख
कार्ये थोडक्यात लिहा ?
उत्तर –
1.अहोमांनी थोड्याच कालावधीत भारतीय संस्कृतीला आपलेसे केले.
2.अहोमांनी एकूण साम्राज्याच्या वेगवेगळ्या कालावधीत सहा राजधान्या केल्या. आसाममधील आदीवासी समुदायाला एकत्र करून बलशाली आणि ऐक्य निर्माण केले.
4.इशान्येकडे अहोमांनी राज्य केले.
5.त्यांनी मोघल राज्यकर्त्याना 17 युद्धमध्ये पराभूत केले. व इशान्येकडे 598 वर्षे (1228 ते 1826) राज्य केले.
2. बाबरांच्या सैनिक कारवायाबद्दल थोडक्यात
उत्तर – भारतात मोगल सत्तेचा पाया घालणारा बाबर मूळचा तुर्कस्तानचा होता. त्यांनी केलेल्या सैनिक कारवाया खालील प्रमाणे..
1.1526 मध्ये पानिपत लढाईत इब्राहिम लोदीचा पराभव केला.
2.मेवाडचा राजा संग्राम सिंग चंदेरी चा राजपूत राजा निधी नारायण यांना पराभूत केले.
3.सैनिक कारवाया करून बाबरने पानिपत घोगरा आणि कन्व जिंकले व उत्तर भारतात मोंघलांचे वर्चस्व निर्माण केले.
3. शेरशहाची राज्यव्यवस्था आणि सध्याची व्यवस्था यांची तुलना करून तुमचा अभिप्राय लिहा.
शेरशहाची राज्यव्यवस्था – | सध्याची व्यवस्था |
शेरशहा नि:पक्षपाती न्यायादानासाठी प्रसिद्ध होता. | सध्याच्या व्यवस्थेत न्यायदान नि:पक्षपातीआहे. |
शेरशहाने दाम नावाचे चलन अंमलात आणले होते. | सध्या रुपये नावाचे चलन अंमलात आहे. |
शेरशहा शेतकऱ्यांना मदत करत असे. | सध्या शेतकऱ्यांना विविध योजना राबवून सरकार शेतकऱ्यांना |
4. अकबराने कोणकोणते प्रदेश जिंकले?
उत्तर – आपल्या प्रबळ सैन्याच्या बळावर अकबराने माळवा, जयपूर, गोंडवाना, चितोड, रणथंभोर, कलिंजर, गुजरात बंगाल काश्मीर, सिंध, ओरीसा, बलुचिस्तान, कंदहार, अहमदनगर इत्यादी प्रदेश जिंकले.
5. कला आणि शिल्पकलेच्या क्षेत्रातील शहाजहानचे योगदान काय ते लिहा ?
उत्तर – शहाजहानने आपली पत्नी मुमताज हिच्या स्मरणार्थ ताजमहल बांधले.लाल किल्ला, मोती महल,जमा मशीद,शालिमार बाग आणि दिल्लीतील अनेक इमारती ही शहाजहानची देणगी आहे.म्हणून त्याच्या कालावधीला मोंघल कला आणि शिल्पकलेचा सुवर्णकाळ असे म्हटले जाते.
6. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर – छत्रपती शिवाजी महार विस्तृत साम्राज्याची राज्यव्यवस्था चोख ठेवली होती.त्यांनी साम्राज्याची विभागणी अनेक प्रातांमध्ये केली होती.सरकारी व्यवहार मराठी व प्राकृत भाषेत चालत असत.राजांना राज्यकारभारात मदत करण्यासाठी अष्टप्रधान मंडळ नेमले होते. याच बरोबर इतर अधिकारी असत.प्रांत,जिल्हे आणि खेडी राज्यकारभाराचे घटक होते.
7. पहिल्या बाजीरावाच्या कार्याचे वर्णन करा.
उत्तर – 19 वर्षांचा बाजीराव अप्रतिम वीर योध्दा होता.
1.उत्तरेकडील मराठी साम्राज्याचा विस्तार करण्याच्या हेतूने गुजरात, माळवा जिंकून चौथाई व सरदेशमुखी वसूल केली.
2.कर्नाटकतील चित्रदुर्ग व श्रीरंगपट्टण ताब्यात घेतले.
3.मोंघलाना मदत करणाऱ्या हैद्राबादच्या निजामाला पहिल्या बाजीरावने भोपाळ जवळील लढाईत पराभूत करून नर्मदा आणि चंबळचा दोआबचा प्रदेश जिंकला. आणि युद्ध भरपाई म्हणून 50 लाख रूपये खंडणी वसूल केली.
4.तसेच पोर्तुगिजाकडून साष्टी, वसई आणि सिद्धिकडून जंजिरा किल्ला मिळविला.
पहिल्या बाजीरावने आपल्या कर्तृत्वाने मराठी साम्राज्यांचे गतवैभव पुन्हा प्राप्त केले म्हणून त्यांना दुसरे शिवाजी महाराज असे म्हटले जाते.
वरील प्रश्नोत्तरे PDF मध्ये डाऊनलोड करा..