6th SS 12. Kingdoms of North India (१२. उत्तर भारतातील कांही राजवंश)




 




इयत्ता – सहावी

विषय – समाज विज्ञान 

माध्यम – मराठी 

अभ्यासक्रम – २०२२ सुधारित 

 स्वाध्याय 

१२.
उत्तर भारतातील कांही राजवंश




 

                    कार्कोट राजवंश 625-855
                               रजपूताचा काळ – 650-1200
                               अहोम राजवंश 1228-1826
अभ्यास
गटामध्ये चर्चा करा आणि
उत्तरे द्या.

1.
कार्कोट राजवंशातील सर्वात
प्रभावशाली राजा कोण होता
?
उत्तर ललितादित्य हा कार्कोट राजवंशातील सर्वात प्रभावशाली राजा होता.
2.
रजपूतांचे गुणधर्म कोणते ?
उत्तर  रजपुतांचे गुणधर्म खालीलप्रमाणे -: 

गोरक्षण, अनाथ, दुर्बल आणि स्त्रियांचे रक्षण करणे आपला धर्म आहे असे रजपूत समजत शरण आलेल्यांचे रक्षण करत. 

आपल्या पूर्वजांच्या पराक्रमाबद्दल गाथा गाऊन स्फूर्ती घेत असत.

स्त्रिया आपल्या पतीला युध्दामध्ये गमावल्यावर अपमानित होऊन जगण्यापेक्षा मरण पत्कारलेले बरे असे समजून आत्म समर्पण करत.
3.
रजपूतांच्या तीन प्रसिद्ध वास्तुशिल्पाची नावे सांगा. ती कोठे आहेत?
उत्तर  खजुराहो (मध्य प्रदेश)
कोणार्क मंदिर (ओरिसा)
दिलवारा मंदिर (राजस्थान)




 


4. ‘
पृथ्वीराजरासोआणि गीत गोविंदहे कोणी लिहिले ?
उत्तर चांद बर्दाई यांनी पृथ्वीराजरासोआणि गीत गोविंदहे कवी जयदेव यांनी लिहिले.
5. ‘
पृथ्वीराज चौहानयांच्या विषयी टिपा लिहा.
उत्तर पृथ्वीराज चौहान हे चौहान घराण्यातील प्रसिद्ध राजे होते. त्यांची राजधानी दिल्ली होती.पृथ्वीराज चौहान त्याच्या शौर्य आणि धैर्यासाठी ओळखला जात असे,’पृथ्वीराजरासो” या हिंदी महाकाव्यात चांद बर्दाई या कवीने त्याच्या पराक्रमाचे वर्णन केले आहे.पृथ्वीराज चौहानने मंहमद घोरीच्या आक्रमणांना विरोध केला. स्वतःच्या रजपूत राजाना एकत्र केले.
6.
बाप्पारावळ कोण होता ?
उत्तर रजपूतामधील गुहील वंशाचा राजा खोमन्ना हा बाप्पारावळ होता.
7.
राणा संग्रामसिंहावर टिपा लिहा.
उत्तर राजासंग अथवा राणा संग्रामसिंह गुहील घराण्याचा आणखीन एक प्रसिद्ध राजा होता तो 100 लढायां करणारा शूरवीर राजा होता. त्यांच्या शरीरावर 80 जखमा झाल्या होत्या, त्याने दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध अनेक लढाया केल्या.




 


8.
रजपूतांच्या सामाजिक स्थितीवर टिपा लिहा.
उत्तर  रजपूत काळात व्यवसायानुसार वेगवेगळी वर्ग व्यवस्था होती.महिलांना समाजात आदराचे स्थान होते. स्त्रिया साहित्य, नृत्य, संगीत, चित्रकला, आणि कलाकुसरतीच्या कार्यात निपूण होत्या. रजपूत राजे हे पूण्यक्षेत्रामध्ये स्नान करणे हे पवित्र समजत असत ब्रम्हदेवाचा वास असलेले पुष्कर‘ (अजमेर जवळ) हे एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले. येथे दरवर्षी भरणारी मोठी जत्रा आज ही जग प्रसिद्ध आहे.
9.
अहोम राजघराण्याचा प्रसिद्ध राजा कोण होता?
उत्तर सुकापा हा अहोम राजघराण्याचा प्रसिद्ध राजा होता.




 
✳️इयत्ता – सहावी✳️

विषय – समाज विज्ञान

✒️प्रश्नोत्तरे✒️

2022 सुधारित पाठ्यपुस्तकांनुसार

⚜️3.मौर्य आणि कुशाण

https://bit.ly/3LnSPOi

⚜️4.गुप्त आणि वर्धन

https://bit.ly/3Lm9MsJ

⚜️5.दक्षिण भारतातील प्राचीन राजघराणी

https://bit.ly/3RSHwQU

भूगोल

✳️10.ग्लोब आणि नकाशे

https://bit.ly/3LnT0sW

✳️11.पृथ्वीचे स्वरूप

https://bit.ly/3RVKpQH



Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *