कलिका चेतरिके
2022
इयत्ता – चौथी
विषय – परिसर अध्ययन
अध्ययन निष्पत्ती यादी
1. प्राणी आणि मानवामध्ये दिसून येणारे साम्य
व फरक ओळखणे (बाह्यलक्षणे)
2. प्राणी आणि मानवामध्ये असणारा संबंध(परस्परावलंबन) समजणे
3. प्राण्यांचे वर्तन निरीक्षण करणे.
4. मध गोळा करण्याची प्रक्रिया आणि उपयोग समजणे.
5. फळांचा परिचय करून घेणे आणि उपयोगाची यादी करणे.
6. झाडे तोडू नये, हे आमचे आहेत ही भावना वाढविणे.
7. झाडे लावून वाढविण्याचे महत्व समजून घेणे.
8. मुळाच्या कार्याची यादी करणे.
9. विविध प्रकारच्या फुलांचा संग्रह करून त्यांचा आकार रंग, पाकळ्यांचा
वास इत्यादी बद्दल चर्चा करणे.
10. नित्य जीवनातील फुलाचा वापर ओळखणे.
11.शरीरामध्ये चालणाऱ्या मुख्य क्रिया आणि त्याला संबंधित मुख्य अवयवांचा परिचय
करून घेणे उत्तम आरोग्याच्या सवयी समजून घेणे
12. पाण्याचे महत्त्व विवरण करणे.
13. पाण्याचे अनौपचारिक मापणाने मापन करणे.
14. पाण्याची कमतरता आणि पाण्याचा अपव्यय
यामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांची यादी करणे.
16. पाण्याचा पुनर्वापर आणि पावसाच्या
पाण्याचे संवर्धन याचे महत्त्व समजणे.
17. निर्जलीकरण याची कारणे आणि पूनर्जलिकरण
द्रावण (ORS) तयार करण्याची पद्धत समजणे.
18. पृथ्वी हे सर्वांचे निवास येथे जगण्यास
आवश्यक हवा, माती पाणी आहे म्हणून कौतुक वाटणे
19. हवा आणि मातीचे महत्व ओळखणे.
20. विविध पोषक (पौष्टीक) घटकांचे वर्गीकरण
करणे आणि समतोल आहाराचे विवरण (स्पष्टीकरण) देणे.
21. प्राणी आणि पक्ष्यांच्या आहाराबद्दल चर्चा
करणे
22. आहार संरक्षणाच्या काही पद्धती समजणे.
23. आम्ही आहार कोठून व कसे मिळवतो हे सांगतो.
24. आहार आणि सांस्कृतिक वैविध्यतेचा आदर करणे, तुझ्या
जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील आहार आणि सांस्कृतिक विविधता समजणे.
25. सामुहिक भोजन असणाऱ्या घटना ओळखणे.तेथे
पाळावयाच्या गोष्टी आत्मसात करणे.
26. खेडे व शहरांमधील घरांमध्ये असलेला फरक
ओळखणे
27. शहरांमधील बहुमजली इमारती आणि
झोपडपट्टीबद्दल समजणे.
28. ग्रामीण आणि शहरातील कचऱ्याच वर्गीकरण
करणे.
29. स्थानिक पातळीवर दिशा दर्शविणे,नकाशा काढणे,प्राथमिक पायऱ्या,स्थळ दाखविण्यासाठी विविध चिन्हे वापरून
नकाशा रचणे.
30. वाहतुकीची चिन्हे (संकेत),सुरक्षिततेचे
नियम आणि ते पाळण्याची आवश्यकता (गरज) समजणे.
31. संपर्कामध्ये/ वाहतुकीमध्ये प्राण्यांचा
वापर समजणे आणि प्राण्यांबद्दल संवेदनशील पद्धतीने वागणे.
32. वेळोवेळी बदललेली विविध प्रकारची संपर्क
साधने ओळखणे.
33. विविध प्रकारच्या कुटुंबाच्या अभिवृद्धी
सरळ वंशवृक्षाद्वारे जुळविणे.
34. कुटुंबातील समाजामध्ये झालेले बदल पाहणे.
35. कुटुबाच्या सदस्याचे तसेच मित्राचे गुण
आणि कौशल्ये ओळखणे तसेच प्रत्येक व्यक्ती विशिष्ट आहे हे समजतात.
36. विविध कारागिरांना आणि राबणाऱ्या मुलांना
येणाऱ्या समस्या ओळखणे.
37. सण, यात्रा, समारंभ आणि राष्ट्रीय सणांमध्ये भाग घेणे.
राष्ट्रीय सणाचे महत्त्व समजणे तसेच राष्ट्रीय चिन्हे ओळखणे आणि मान देणे.
38. खेळ आणि नियम यांची ओळख करून घेणे.
39. नैसर्गिक साधनसंपत्ती आणि सर्जनशीलतेने
मानवतेचे जीवन कसे बदलले हे उदाहरणासह स्पष्ट करणे.
40. कपड्यांमध्ये असणारी विविधता, कापड
तयारीसाठी वापरणारा रंग आणि डिझाईन याबद्दल चर्चा करणे.तसेच विविध जिल्ह्यांमध्ये
वापरली जाणाऱ्या वेगवेगळ्या कपड्याबद्दल समजणे.
41. भारताच्या नकाशामध्ये कर्नाटक ओळखतो आणि
कर्नाटक स्वाभाविक विभाग परिचय करून घेणे.
42. राज्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे आणि
विविध निसर्गधाम ओळखणे.त्यांचे महत्त्व समजून संरक्षित करण्याचा
मनोभाव वाढविणे.
वरील सर्व अध्ययन निष्पत्ती यादी PDF मध्ये डाऊनलोड करा..