दिनांक: 14.08.2025 रोजीच्या सुधारित परिपत्रकानुसार –
- पाठ-आधारित मूल्यमापनासाठी इयत्ता 1 ते 5 वीसाठी 15 गुण आणि इयत्ता 6 ते 10 वीसाठी 20 गुण विचारात घ्यावे.
- भाषा विषयामध्ये प्रत्येक पाठ-आधारित मूल्यमापनासाठी एक पाठ आणि एक कविता विचारात घ्यावी.
- इयत्ता 6 ते 10 वीच्या समाज विज्ञान विषयामध्ये प्रत्येक 3 पाठांनंतर एक पाठ-आधारित मूल्यमापन करावे.
- इयत्ता 1 ते 5 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 10 गुणांची लेखी आणि 05 गुणांची तोंडी परीक्षा घ्यावी. एकूण 15 गुणांसाठी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि वर्णनात्मक प्रश्न समाविष्ट असलेली प्रश्नपत्रिका तयार करून पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
- इयत्ता 6 आणि 7 वीच्या पाठ-आधारित मूल्यमापनासाठी 20 गुणांसाठी LBA प्रश्न बँकेतील वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रश्न असलेली प्रश्नपत्रिका तयार करून लेखी पाठ-आधारित मूल्यमापन (Unit Test) करावे आणि SATS सॉफ्टवेअरमध्ये त्याची नोंद करावी.
पाठ आधारित मूल्यमापन 2025-26
१. जगातील प्रमुख घटना
२. मध्ययुगीन युरोप
३. युरोपियनांचे भारतात आगमन
Question Paper Blueprint
Learning Objective | Marks (Weightage) | Difficulty Level | Marks (Weightage) |
---|---|---|---|
Knowledge (ज्ञान) | 9 (45%) | Easy (सोपे) | 9 (45%) |
Comprehension (आकलन) | 8 (40%) | Average (साधारण) | 8 (40%) |
Application/Skill (उपयोजन/कौशल्य) | 3 (15%) | Difficult (कठीण) | 3 (15%) |
Total | 20 | Total | 20 |
I. योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. (1 × 3 = 3 गुण)
१. ख्रिस्ती धर्माचे सर्वोच्च गुरु कोणाला म्हणतात?
अ) खलिफा ब) पोप क) महंमद ड) फादर (ज्ञान – सोपे)
२. प्रिंटिंग प्रेसचा शोध लावणारे जर्मन शास्त्रज्ञ _________ होते.
अ) जॉन राईट ब) जॉन गुटेनबर्ग क) मार्कोनी ड) विल्यम हार्वे (ज्ञान – सोपे)
३. वास्को-द-गामाने भारताला जाण्यासाठी जलमार्ग शोधला ते वर्ष _________ होते.
अ) 17 मे 1498 ब) 16 मे 1495 क) 18 मे 1516 ड) 20 मे 1600 (ज्ञान – सोपे)
II. एका वाक्यात उत्तरे द्या. (1 × 3 = 3 गुण)
४. येशू ख्रिस्ताच्या आईचे नाव काय आहे? (ज्ञान – सोपे)
५. पुनरुज्जीवन म्हणजे काय? (ज्ञान – सोपे)
६. ‘दस्तक’ म्हणजे काय? (ज्ञान – सोपे)
III. थोडक्यात उत्तरे द्या. (2 × 3 = 6 गुण)
७. येशू ख्रिस्त यांच्या शिकवणी सांगा. (आकलन – साधारण)
८. पुनरुज्जीवनाची वैशिष्ट्ये काय आहेत? (आकलन – साधारण)
९. युरोपीय लोकांची मुख्य उद्दिष्टे कोणती होती? (आकलन – साधारण)
IV. जोड्या जुळवा. (1 × 4 = 4 गुण)
‘अ’ गट | ‘ब’ गट |
---|---|
१०. प्रेषित महंमद | अ) द डिव्हाईन कॉमेडी |
११. दांते | ब) बहामास |
१२. ख्रिस्तोफर कोलंबस | क) कॉन्स्टॅन्टिनोपल |
१३. तुर्की सुलतान | ड) इस्लाम (आकलन – साधारण) |
V. दीर्घोत्तरी प्रश्न. (4 × 1 = 4 गुण)
१४. पुनरुज्जीवनाची कारणे काय होती? (उपयोजन – कठीण)