DASARA HOLIDAY STUDY CLASS – 9 दसरा सुट्टीतील अभ्यास




 
दसरा सुट्टी दि. 08.10.2023 ते 24.10.2023 पर्यंत विद्यार्थ्यांनी करावयाचा अंदाजित अभ्यास – 
इयत्ता – नववी 

विषय – विज्ञान 

माध्यम – मराठी 

दररोजचा अभ्यास 
इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त विज्ञान विषयाशी संबंधित सराव करण्यासाठी आवश्यक दररोजचा अभ्यास उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे..
 

 दिनांक 03.10.2022

1) द्रव्याच्या कणांचे गुणधर्म लिहा.


2) घन, द्रव, वायूचे गुणधर्म लिहा.

3) तापमान आणि दाबातील बदलामुळे पदार्थांची स्थिती कशी बदलते उदाहरणासह स्पष्ट करा.

4) बाष्पीभवन म्हणजे काय? बाष्पीभवनावर परिणाम करणारे घटक कोणते?

5) बाष्पीभवनामुळे थंडावा कसा येतो.उदाहरणासह स्पष्ट करा.

 दिनांक 04.10.2022

1) द्रावण, निलंबन,मिश्रण,कलील यांचे गुणधर्म लिहा.

2) मिश्रण वेगळे करण्याच्या पद्धती जसे की उर्ध्वपातन, स्फटिकीभवन पद्धत, संप्लवन पद्धत,पृथक्करण पद्धत स्पष्ट करा.

3) भौतिक बदल आणि रासायनिक बदल यातील फरक स्पष्ट करा.

4) मिश्रण आणि संयुगे यामधील फरक लिहा.



 
 दिनांक 05.10.2022

1) पेशी म्हणजे काय? पेशीचा शोध कोणी लावला?


2) पेशीचे प्रमुख भाग कोणते?

3) द्रावणाची संहती दर्शवणाऱ्या दोन पद्धती सांगा.

4) पेशीचे प्रमुख भाग व त्यांची कार्य लिहा.

 दिनांक 06.10.2022

१) ऊती म्हणजे काय?

2) वनस्पतींच्या अवयवांचे वर्गीकरण सांगा.

3) प्रकाष्ठ आणि परिकाष्ठ या ऊतींच्या रचना व कार्याबद्दल माहिती लिहा.

4)संयोगी ऊतींचे प्रकार व कार्य सांगा.

5)ऐच्छिक व अनैच्छिक स्नायू ऊतींमधील फरक स्पष्ट करा. चेतन ऊतींचे महत्त्व सांगा.

 दिनांक 07.10.2022
1)आहारातील मुख्य घटक कोणते?


2)खनिज असणारे आहार पदार्थ कोणते?


3)वनस्पतींमध्ये असणारे मुख्य आणि सूक्ष्म पोषकांश कोणते? उदाहरणासहित स्पष्ट करा.


4)रासायनिक खते आणि सेंद्रिय खते यामधील फरक स्पष्ट करा.


5)पिकांच्या वाढीचा कालावधी लक्षात घेऊन पिकांचे वर्गीकरण करा.उदाहरणे द्या.


6)पिकांच्या वाढीच्या टप्प्यांची यादी करा.


7)प्राणी आणि कोंबड्यांच्या स्वदेशी व विदेशी प्रजाती कोणत्या?


8)मिश्र मासेमारीचे महत्त्व लिहा.

 दिनांक 08.10.2022
1)विस्थापन,गती,अंतर,वेग,त्वरण यांच्या व्याख्या लिहून एकके लिहा.

2)समान गती आणि असमान गती यामधील फरक सांगा.

3)गतीचे प्रकार सांगून प्रत्येकी एक उदाहरण द्या.

4)अंतर,वेळ आलेख व वेग,काळ आलेख काढा.

5)गतीच्या समीकरणांची यादी करा.

 दिनांक 09.10.2022
1)बलाचा अर्थ सांगून संपर्क बल व संपर्करहित बल याची उदाहरण द्या.


2)संतुलित बल व असंतुलित बल यातील फरक सांगा.

3)न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम सांगून उदाहरणे द्या.

4)न्यूटनचा गतीविषयक दुसरा नियम सांगून उदाहरणे द्या व सूत्र लिहा.


5)जोर म्हणजे काय?न्यूटनच्या दुसऱ्या नियमाशी त्याचा असणारा संबंध स्पष्ट करा.


6)न्यूटनचा गतीचा तिसरा नियम सांगून उदाहरणे द्या.

 दिनांक 10.10.2022
1)गुरुत्व बलाचा अर्थ सांगा.

2)केंद्राभिमुख जोराची व्याख्या सांगा.

3)गुरुत्वाकर्षणाचा वैश्विक नियम व सूत्र सांगा.

4)गुरुत्वाकर्षण त्वरण म्हणजे काय? ‘G’ चे मूल्य किती आहे?

5) वस्तुमान आणि वजन यांच्यातील संबंध सांगा.

6) बल आणि दाब स्पष्ट करा.

7) उत्प्लाविता म्हणजे काय? आर्किमिडीजचा सिद्धांत सांगा.




Share with your best friend :)