Karnataka Public Holidays 2025| कर्नाटकातील सुट्ट्या: २०२५ साली कर्नाटकातील सार्वजनिक व मर्यादित सुट्ट्यांच्या माहितीसाठी मार्गदर्शक..

2025 सार्वजनिक सुट्टी यादी

२०२५ मध्ये कर्नाटकातील सार्वजनिक सुट्ट्या आणि मर्यादित सुट्ट्यांची यादी

2025 हे वर्ष विविध सण, उत्सव, आणि महत्त्वाच्या घटनांनी भरलेले असेल.प्रत्येकाला आपल्या सुट्ट्यांचे नियोजन वेळेवर करता यावे, यासाठी सार्वजनिक आणि मर्यादित सुट्ट्यांची यादी माहित असणे आवश्यक आहे. कर्नाटक सरकार दरवर्षी अशा सुट्ट्यांची यादी जाहीर करते, जी राज्यभरातील शासकीय कार्यालये, शाळा, आणि बँकांसाठी लागू असते.2025 सालातील सार्वत्रिक आणि मर्यादित सुट्ट्यांच्या यादीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.

1. 14 जानेवारी: मकर संक्रांती

2. 26 फेब्रुवारी : महाशिवरात्री

3. 31 मार्च: कुतुब-ए-रमजान

4. 14 एप्रिल: डॉ.बी.आर.आंबेडकर जयंती

5. 10 एप्रिल: महावीर जयंती

6. 18 एप्रिल: गुड फ्रायडे

7. 30 एप्रिल : बसव जयंती, अक्षय्य तृतीया

8. 1 मे : कामगार दिन

9. 7 जून : बकरी- ईद

10. 15 ऑगस्ट : स्वातंत्र्यदिन

11. 27 ऑगस्ट: गणेश चतुर्थी

12. 5 सप्टेंबर : ईद-मिलाद

13. 1 ऑक्टोबर : महानवमी, आयुधा पूजा, विजया दशमी

14. 2 ऑक्टोबर : गांधी जयंती

15. 7 ऑक्टोबर : महर्षी वाल्मिकी जयंती

16. 20 ऑक्टोबर : नरक चतुर्दशी

17. 22 ऑक्टोबर : बलिप्रतिपदा पाडवा

18. 01 नोव्हेंबर : कर्नाटक राज्योत्सव

19. 25 डिसेंबर: ख्रिसमस

1. या सुट्टीच्या यादीत प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी), उगादी (गुढी पाडवा) (30 मार्च), मोहरम (6 जुलै), महालया अमावस्या (21 सप्टेंबर) आणि दुसऱ्या शनिवारी येणारी कनकदास जयंती (8 नोव्हेंबर) यांचा उल्लेख नाही.

2.सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी राज्यभरातील सरकारी कार्यालये बंद असतील.तरी विभाग प्रमुखांनी कार्यालयातील आवश्यक कामे मार्गी लावण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी.

3. या यादीत समाविष्ट मुस्लिम बांधवांचे सण विहित तारखांवर येत नसल्यास,शासकीय सेवेत असलेल्या मुस्लिम बांधवांना विहित रजेच्या बदल्यात सुट्टी देण्यात यावी.

4.तारीख:03.09.2025 (बुधवार) कैल मुहूर्त, दिनांक:18.10.2025 (शनिवार) तुला संक्रमण आणि तारीख: 05.12.2025 (शुक्रवार) हुत्तरी सण स्थानिक सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला आहे जो फक्त कोडगू जिल्ह्यासाठी लागू आहे.

5. सार्वजनिक शिक्षण आयुक्त शिक्षण विभागाशी संबंधित सुट्यांना लागू असलेल्या स्वतंत्र सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध करतील.

6. सार्वजानिक सुट्ट्यांच्या व्यतिरिक्त,राज्य सरकारी कर्मचारी पूर्व परवानगी घेऊन 2025 मध्ये अधिसूचना-1 च्या परिशिष्टात नमूद केलेल्या मर्यादित / निर्बंधित रजेपैकी दोन दिवसांची रजा घेऊ शकतात.

वर्ष 2025 साठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मर्यादित / निर्बंधित सुट्ट्यांची यादी:
मर्यादित / निर्बंधितसुट्ट्या वैयक्तिक निवडीवर अवलंबून असतात.यादीतील कोणत्याही दोन सुट्ट्या निवडून प्रमुखांच्या परवानगीने कर्मचारी किंवा विद्यार्थी घेऊ शकतात.

1) 01.01.2025 – बुधवार – नव वर्षारंभ
2) 06.02.2025 – शुक्रवार – मध्य नवमी
3) 14.02.2025 – शुक्रवारी – शब – ए – बरात
4) 13.03.2025 – गुरुवार – होळी सण
5) 27.03.2025 – गुरुवार – शब – ए – खादर
6) 28.03.2025 – शुक्रवार – जुमत – उल – विदा
7) 02.04.2025 – बुधवार – देववर दासीमय्या जयंती
8) 19.04.2025 – शुक्रवार – होली सॅटर डे
9) 02.05.2025 – शुक्रवार – श्री शंकराचार्यजयंती श्री रामानुजाचार्य जयंती
10) 12.05.2025 – सोमवार – बुद्ध पौर्णिमा
11) 08.08.2025 – शुक्रवार – श्री वर महालक्ष्मी व्रत
12) 16.08.2025 – शुक्रवार – श्री कृष्ण जन्माष्टमी
13) 26.08.2025 – मंगळवार – श्री स्वर्ण गौरी व्रत
14) 06.09.2025 – शनिवार – श्री अनंतपद्मनाभ जयंती
15) 08.09.2025 – सोमवार – कन्नड मरियम्मा जयंती
16) 17.09.2025 – बुधवार – विश्वकर्मा जयंती
17) 18.10.2025 – शनिवार – तुळा संक्रमण
18) 05.11.2025 – बुधवार – गुरु नानक जयंती
19) 05.12.2025 – शुक्रवार – हुत्तरी हब्बा
20) 24.12.2025 – बुधवार – ख्रिसमस उत्सव

महत्त्वाची सूचना:


1. श्री रामनवमी (06.04.2025) आणि ब्रह्मश्री नारायणगुरु जयंती (07.09.2025) रविवारी येत असल्याने आणि ऋग् उपकर्म आणि यजुर उपकर्म (09.08.2025) दुसऱ्या शनिवारी येत असल्याने, ही सुट्टी सूचीमध्ये समाविष्ट केलेली नाही.

2. सौरमान उगादी (14.04.2025) सोमवार , डॉ. बी.आर. आंबेडकर जयंती आणि थिरुओनम (05.09.2025) शुक्रवार ईद-मिलाद सुट्टी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी येत असल्यामुळे ही सुट्टी यादीमध्ये समाविष्ट केलेली नाही.

Share with your best friend :)
WhatsApp Group Join Now
WhatsApp Students Group Join Now
Telegram Group Join Now