इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
व्यवहार अध्ययन
पाठ 29 – विविध व्यापारी संघटनांचा उदय
स्वाध्याय
I. रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. एका व्यक्तिच्या मालकीच्या संस्थाना व्यक्तिगत व्यापारी संघटना असे म्हटले जाते.
2. भारतीय भागीदारी व्यवसाय नोंदणी कायदा 1932 या वर्षी अंमलात आला.
3. बँकिंग व्यवसायात भागीदारांची कमाल संख्या 10 इतकी असावी लागते.
4. भारतीय अविभक्त कुटुंब व्यवसायाच्या प्रमुख सदस्याला जेष्ठ/कर्ता असे म्हटले जाते.
5.फक्त भारतात आढळून येणारी वैयक्तिक व्यवसाय संघटना हिंदू अविभक्त ही होय.
II. खालील प्रश्नांची उत्तरे दोन–तीन लिहा.
6. लघु उद्योगधंद्याच्या संघटना कोणत्या ?
उत्तर – वैयक्तिक मालकीच्या संघटना संस्था भागीरदारीतील व्यवसाय संघटना
हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यवसाय संघटना इत्यादी लघु उद्योगधंद्याच्या संघटना होत.
7. लघु उद्योगधंदे ग्राहकांना कोणत्या सेवा पुरवितात ?
उत्तर – रोजगार आणि वस्तू पुरवठा
8. भागीदारी व्यवसाय म्हणजे काय ?
उत्तर – दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यापार सुरू करतात त्याला भागीदारी
व्यवसाय असे म्हणतात.
9. नाममात्र भागीदार म्हणजे काय ?
उत्तर – जे भागीदार व्यवसायामध्ये भांडवलही गुंतवत नाहीत आणि कोणत्याही
व्यवहारात भाग घेत नाहीत. व्यवसायातील कोणत्याही फायदा तोट्यामध्ये त्यांची वाटणी
नसते.पण त्या क्षेत्रातील विश्वासावर किंवा त्यांच्या नावावर व्यवसाय चालतो अशा
भागीदारांना नाममात्र भागीदार असे म्हणतात.
10. भागीदारी व्यवसायाचे विसर्जन कसे करता येते ?
उत्तर – भागीदारीतील व्यवसाय सहजपणे विसर्जित केला जातो.कोणताही भागीदार 14
दिवसांची नोटीस देऊन किंवा इतर भागीदारांची अनुमती घेऊन आपली भागीदारी रद्द
करू शकतो.
III. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
11. वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाचे चार फायदे लिहा.
उत्तर – वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाचे पुढीलप्रमाणे –
1. स्वतःच्या भांडवलाने व्यवसाय सुरू करता येतो.
2. मालक फायदा व तोटा सहन करतो.
3. लोकांना रोजगार मिळतो.
4. ग्राहकांच्या आवडीनुसार वस्तू तयार होतात.
12. वैयक्तिक मालकीच्या व्यवसायाचे चार तोटे लिहा.
उत्तर – वैयक्तिक मालकीच्या तोटे पुढीलप्रमाणे –
1.व्यापाराचा विस्तार होत नाही.
2.व्यवस्थापनासाठी लागणारी निर्णय क्षमता कमी
3.एकाच व्यक्तीला तोटा सहन करावा लागतो.
4.मालकांच्या मृत्यूनंतर संघटना बंद पडण्याची शक्यता असते.
13. भागीदारी व्यवसाय कसा सुरु केला जाऊ शकतो ? थोडक्यात सांगा.
उत्तर – दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन व्यापार सुरू करतात.भागीदारी
व्यवसायासाठी 1932 मध्ये भागीदारी कायदा अस्तित्वात आला.या कायद्यातील चौथ्या
कलमानुसार भागीदारी व्यवसायातील सर्व भागीदारांनी होणारी नफा नुकसान वाटून
घेण्यास तयार असावे लागते. बँकांसारख्या व्यवसायात जास्तीत जास्त 10 भागीदार
आणि सामान्यपणे इतर व्यवसायात 20 भागीदार असावे लागतात.
14. भागीदारांचे वेगवेगळे प्रकार कोणते ?
उत्तर – भागीदारांचे प्रकार खालीलप्रमाणे –
1.क्रियाशील भागीदार
2.तटस्थ भागीदार
3.नाममात्र भागीदार
4.अल्पवर्धन भागीदारी
15. भागीदारी व्यवसायाचे चार फायदे सांगा.
उत्तर – भागीदारी व्यवसायाचे चार फायदे पुढीलप्रमाणे-:
1.सहज प्रारंभ
2.अधिक भांडवल
3.नफा तोट्याची वाटणी
4.व्यवसायातील गुप्तता
16. भागीदारी व्यवसायाचे चार तोटे सांगा.
उत्तर – भागीदारी व्यवसायाचे पुढील तोटे होऊ शकतात..
1.भागीदारांच्या मधील मतभेद व भांडण
2.जबाबदारी घेण्यास टाळाटाळ
3.भागीदारीचा निष्काळजीपणा
4.एखाद्या भागीदाराचा मृत्यू झाल्यास व्यवसाय बंद पडू शकतो
17. भागीदारी व्यवसायाची नोंदणी करण्याचे फायदे कोणते ?
उत्तर – भागीदारी व्यवसायाची नोंदणी करण्याचे खालील फायदे होतात –
1.नोंदणी केलेल्या संस्था तिसऱ्या पक्षाबद्दल न्यायालयात दाद मागू शकते.
2.ही संस्था कर्जाच्या वसुलीसाठी इतर भागीदारांच्या विरुद्ध दावा ठोकू शकते.
3.नोंदणीकृत संस्था हिशोबातील सत्यता पडताळून पाहण्यासाठी न्यायालयात दाद मागते.
18. हिंदू अविभक्त कुटुंबातील व्यवसायाबद्दल थोडक्यात लिहा.
उत्तर – या संस्था बहुतेक करून फक्त भारतात आढळून येतात.ज्या हिंदू कायद्यानुसार
चालविल्या जातात.या संस्थांमध्ये फक्त हिंदू एकत्र कुटुंबातील पुरुष असतात. ज्यामध्ये
तीन पिढ्यातील मुलगा नातू पणतू इत्यादींना जन्मानुसार हा हक्क प्राप्त झालेला
असतो.कुटुंबातील सर्वात श्रेष्ठ व्यक्ती व्यवसाय सांभाळते त्याला करता असे
म्हणतात.व्यवसायातील सर्व गोष्टी करता सांभाळतो. कर्त्याचा अधिकार मोठा
असतो.त्यामानाने इतरांचे हक्क मर्यादित असतात.