सरकारी प्राथमिक व माध्यमिक शाळा विभागातील अधिकारी,मुख्याध्यापक,सहाय्यक शिक्षक व इतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत हजेरीसाठी बायोमेट्रिक हजेरी व हालचाल रजिस्टर ठेवण्याच्या माननीय आयुक्तांच्या सुचना –
विषय :- सार्वजनिक शिक्षण विभागातील अधिकारी,शिक्षक आणि इतर सर्व कर्मचाऱ्यांनी विहित कार्यालयीन वेळेत हजर राहणेबाबत.
परिपत्रक दिनांक – 03.09.2022
विषयास अनुसरून माननीय शिक्षण मंत्री यांनी दिनांक 12 ऑगस्ट 2022 रोजी सरकारी उच्च प्राथमिक शाळा, नेल्लीगेरे,तालुका – नागमंगल जिल्हा – मंड्या या शाळेस अनपेक्षितपणे भेटी दिल्यानंतर शाळेतील तीन शिक्षक सकाळी 10.30 पर्यंत शाळेत हजर नव्हते.तसेच विद्यार्थी शाळेच्या आवरणामध्ये शिक्षकांची प्रतिक्षा करत असल्याचा प्रसंग माननीय शिक्षण मंत्री यांच्या आकस्मिक भेटीमध्ये दिसून आला.अशा कारणांमुळे विद्यार्थी अध्ययनापासून वंचित राहिले तसेच त्यांच्या सुरक्षेची बद्दल दुर्लक्षितपणा दिसून आला.शिक्षकांच्या अशा गैरहजेरीची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.राज्यातील कोणत्याही भागात अशी प्रकरणे दिसून आल्यास कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याची सूचना देण्यात आली आहे.
संदर्भ (2) मधील परिपत्रकामध्ये राज्य सरकारी नोकरांनी निश्चित वेळेमध्ये कार्यालयात हजर राहावे अशी सूचना देण्यात आली आहे.तरी अनेक सरकारी प्राथमिक/माध्यमिक शाळेतील शिक्षक वेळेचे पालन करत नाहीत तसेच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेबद्दल काळजी घेत नाहीत.यामुळे शाळेतील शैक्षणिक आणि प्रशासकीय विभाग तसेच शिक्षकांचा बेशिस्तपणा यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन गुणवत्तेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.
राज्यातील सरकारी प्राथमिक तसेच सरकारी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक,सहशिक्षक शालेय व इतर कार्यालयीन अधिकारी वर्ग यांनी निश्चित वेळेच्या पूर्वी किमान 15 मिनिटे अगोदर कार्यालयात हजर राहून पूर्व सिद्धता कार्य करावे.शालेय कृतीमध्ये सक्रियपणे भाग घेऊन परिणामपणे पाठ अध्यापन करणे.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी श्रम घेणे हे शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे.
राज्यातील शिक्षण विभागातील सर्व कार्यालयांसह प्राथमिक तसेच माध्यमिक शाळांमध्ये पूर्वपरवानगी घेऊन मंजूरी मंजुरी घेतल्यानंतर रजेवर जाण्यास सांगितले आहे. तसेच हालचाल रजिस्टर आणि बायोमेट्रिक हजेरीची व्यवस्था करणे अनिवार्य आहे. वेतन व्यवस्थापन अधिकारी आपल्या अंतर्गत येणाऱ्या कार्यालय तसेच शाळेचे बायोमेट्रिक उपस्थिती चेक इन आणि चेक आउट संबंधी हार्ड किंवा सॉफ्ट दाखल्यांच्या प्रती प्रत्येक महिन्याच्या 25 तारखेपूर्वी घेणे.त्यानंतर वेतन मंजूर करण्याची सूचना देण्यात आलेली आहे.पुढील महिन्याचे वेतन देताना मागील महिन्यातील उर्वरित दिवसांची हजेरी तपासणे व योग्य प्रशासकीय कारवाई करणे.बायोमेट्रिक उपस्थिती व्यवस्थितपणे कार्य करत असले संबंधी देखरेख ठेवण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय आणि शाळा प्रमुखांची आहे.
संबंधित अधिकारी/कर्मचाऱ्याच्या परिणामकारक देखरेखीच्या अभावामुळे अशी प्रकरणे निदर्शनास येत आहेत.या गोष्टीचा गांभीर्याने विचार करण्यात यावा.याविषयी जिल्ह्यांच्या उपनिर्देशकांनी संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी यांना मासिक सभेमध्ये बायोमेट्रिक व्यवस्थेबद्दल तसेच सर्व स्तरातील नोकरांची उपस्थिती बायोमेट्रिकमध्ये नोंद होणे अनिवार्य करणे व त्याचे अनुपालन करणे.
याशिवाय वक्तशीरपणा न पाळता निष्काळजीपणाने कार्य करणार्या व आपले कर्तव्य प्रभावीपणे न बजावणार्या शाळा व कार्यालयातील अधिकारी,मुख्याध्यापक, सहशिक्षक,कर्मचारी यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्हा उपनिर्देशक (प्रशासकीय) उपसंचालक (अभिवृद्धी),सभापती (CTE),संबंधित व्याप्तीतील क्षेत्र शिक्षणाधिकारी,वरिष्ठ व्याख्याते व अधिव्याख्याते यांनी वेळोवेळी शाळा व कार्यालयांना आकस्मिक भेटी देऊन कार्यालये व शाळांची बायोमेट्रिक उपस्थिती अनिवार्यपणे तपासणे व भेट अहवालात त्यांची नोंद करणे.शाळेतील शिक्षकांची शैक्षणिक आणि अध्यापन कौशल्ये आणि मुलांची शिकण्याची गुणवत्ता याविषयी आवश्यक सल्ला आणि मार्गदर्शन करणे.
सर्व शाळांमधील शिक्षकांनी त्यांची उपस्थिती बायोमेट्रिक पद्धतीने विहित वेळेत नोंदवून नंतर शाळेचे शैक्षणिक आणि अध्यापन कौशल्य सुधारण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास प्रयत्न करत आहेत याविषयी खात्री करून घेण्याची जबाबदारी संबंधित सी आर पी,बी आर पी,शिक्षण संयोजक, टी पी ओ,बीआरसी तसेच क्षेत्र शिक्षणाधिकारी यांची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांचे ज्ञान कौशल्य आणि मूल्ये वाढवणे,त्यांना समाजातील जबाबदार नागरिक म्हणून सुसज्ज करणे, सर्वांगीण प्रगतीसाठी झटणे या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी या सूचना देण्यात आली आहे.
त्यानुसार येत्या काही दिवसांत कर्मचाऱ्यांची शिस्तभंगाची प्रकरणे समोर आल्यास संबंधित अधिकाऱ्यांना थेट जबाबदार धरून योग्य ती शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.