इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण – 6
जैन आणि बौद्ध धर्मांचे विचार
I. रिकाम्या जागा योग्य शब्दांनी भरा.
1. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर वृषभदेव
2. वर्धमानाचा जन्म कुंडल या ठिकाणी झाला.
3. महावीरांना वयाच्या 42 व्या वर्षी दिव्यज्ञान प्राप्त झाले.
4. वयाच्या 72 व्या वर्षी महावीरांचे निर्वाण पावापुरी या ठिकाणी झाले.
5. गौतम बुद्धाचे सिद्धार्थ हे मूळ नाव होय.
6. बुद्धांनी आपले पहिले प्रवचन हरिणबाग या ठिकाणी दिले.
7. बुद्धाच्या पहिल्या प्रवचनाला धर्मचक्रप्रवर्तन असे म्हणतात.
II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
8. महावीरांच्या जीवनाबद्दल थोडक्यात माहिती लिहा.
उत्तर – महावीरांचा जन्म कुंडल गावात झाला.त्यांचे वडील सिद्धार्थ व आई त्रिशलादेवी होय.30व्या वर्षी त्यांनी सर्वसंघ परीत्याग केला.12 वर्षे उग्र उपासना करून 42 व्या वर्षी त्यांना दिव्य ज्ञान प्राप्त झाले.लोक त्यांना महावीर आणि जिन म्हणू लागले.जिन म्हणजे इंद्रियांवरती ताबा ठेवून जिंकणारा असा होतो.त्यांच्या वयाच्या 72 व्या वर्षी बिहारला पावापुरी येथे त्यांचे निधन झाले.
9. त्रिरत्न म्हणजे काय ?
उत्तर – भगवान महावीरांनी उपदेश केलेल्या 3 आचार नियमांना त्रिरत्न असे म्हणतात.सम्यकज्ञान,सम्यकदर्शन, सम्यकचारित्र्य
10. जैन धर्माच्या पंथांची नावे लिहा.
उत्तर – दिगंबर व श्वेतांबर हे जैन पंथ आहेत.
11. ‘मधला मार्ग‘ म्हणजे काय ?
उत्तर – बुद्धांनी इच्छा मुक्तीसाठी अष्टांगमार्गाचा उपदेश केला या मार्गाला ‘मधला मार्ग‘ असे म्हणतात.
12. नवीन धर्माने प्रभावित झालेले लोक कोण ?
उत्तर – श्रीमंत व्यापारी कारागीर आणि सामान्य लोक हे नवीन धर्माने प्रभावित झाले होते.
13. ‘त्रिपीटीका‘ वर टीपा लिहा.
उत्तर – त्रिपिटका हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख व महत्त्वाचा धर्मग्रंथ आहे.इ.स.पू. १०० ते इ.स.पू. ५०० या दरम्यान, मौर्य राजवंशाच्या कार्यकाळात या ग्रंथांची निर्मिती झाली. त्रिपिटका हा ग्रंथ पाली भाषेत लिहिला गेलेला एक ग्रंथसमूह असून तो तीन भागात विभागला आहे.त्रिपिटकाचे तीन विभाग — विनयपिटक, सुत्तपिटक व अभिधम्मपिटक या तीन पिटकांमुळे या ग्रंथाला ‘त्रिपिटक‘ हे नाव पडले.
Eknath pandurang patil