इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण 7- मौर्य आणि कुशाण घराणे
स्वाध्याय
I. योग्य
शब्दाने रिकाम्या जागा भरा.
1. चाणक्य कौटिल्य म्हणून प्रसिद्ध झाले.
2. मौर्यांची राजधानी पाटलीपुत्र ही होती.
3 कुशाण घराण्याचा संस्थापक कजुल कडफायसिस हा
होय.
4. कनिष्काच्या नव्या पर्वाला शक काळ असे
म्हटले जाते.
II. खालील
प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
5. सम्राट
अशोकांच्या काळातील प्रमुख नगरांची नावे लिहा.
उत्तर – सम्राट अशोकांच्या काळामध्ये पाच नगर केंद्रे होती.
ती म्हणजे मौर्यांची राजधानी असलेले पाटलीपुत्र, तक्षशिला,उजैणी,कलिंग,तसेच सुवर्णगिरी ही अशोकाच्या
साम्राज्यातील प्रमुख दळणवळणांची व्यापारी केंद्रे होती.
6. अशोकाच्या
राज्यकारभाराचे वर्णन करा.
उत्तर – विस्तृत साम्राज्यावर व्यवस्थित राज्यकारभार
करण्यासाठी त्यांनी अनेक केंद्रे (सूत्रे) स्थापिली.ही केंद्रे राज्याच्या
मर्जीनुसार चालत होती.त्याने केलेले कायदे शिळांवर आणि स्तंभांवर आढळून
येतात.आपल्याला उपलब्ध असलेले हे पहिले कायदे होय.अशोकाच्या कालावधीत व्यापक
व्यापार तसेच कृषी सुधारणा पहावयास मिळतात.
कलिंगाच्या युद्धात झालेली जीवितहानी पाहून अशोकाचे मन परिवर्तन
झाले.बुद्धांनी उपदेशीलेल्या करुणा या गुणाने तो प्रभावीत झाला.त्याने संपूर्ण
देशभर बुद्धांच्या शिकवणुकीचा प्रसार केला.त्यासाठी त्यांनी धर्म महामात्रांची
नेमणूक केली.त्यांच्या कायद्यातून धार्मिक दृष्टिकोन व्यक्त होतात.
7.कुशाण
कोणत्या वंशाचे होते?
उत्तर – कुशाण यूची वंशाचे होते.
8. कनिष्काचे
साम्राज्य कुठपर्यंत विस्तारले होते ?
उत्तर – दक्षिणेतील सांची आणि पूर्वेकडे बनारसपर्यंत
कनिष्काचे साम्राज्य विस्तारले होते.
आठवी समाज विज्ञान प्रश्नोत्तरे साठी येथे स्पर्श करा..