इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
माध्यम – मराठी
अभ्यासक्रम – २०२२ सुधारित
विषय – स्वाध्याय
इतिहास
प्रकरण – 5
सनातन
धर्म
I. खालील रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1. सनातन धर्माचे दुसरे नाव हिंदू धर्म आहे.
2. उपनिषदाचा वेदसिद्धांत हा एक भाग आहे.
3. वेद हा शब्द विद पासून बनला आहे.
4. विद याचा अर्थ ज्ञान
5. जे ऐकले जाते त्याला श्रुती म्हणतात.आणि जे आठवणीत
असते त्याला स्मृती असे म्हणतात.
6. भारताच्या दोन मुख्य इतिहास कृती रामायण आणि
महाभारत आहेत.
7. स्मृती साहित्याचा तिसरा भाग हे भारतीय
तत्वज्ञानाचा आधारस्तंभ आहे.
8. शाक्त आगमा पासून निर्माण झालेल्या तत्वज्ञानाचे
तंत्र हे विशाल क्षेत्र आहे.
II. खालील प्रश्नांची योडक्यात उत्तरे लिहा.
9. वेद म्हणजे काय ?
उत्तर – वेद म्हणजे ज्ञान याचाच अर्थ विद्या असा
होतो.
10. ऋग्वेदात किती मंत्र आहेत ? त्याची विभागणी कशी केली आहे ?
उत्तर – ऋग्वेदात 10552 मंत्र आहेत.पुढे सुक्तांची विभागणी 85 विभाग व 10 मंडलामध्ये विभागणी केली आहे.
11. ऋग्वेदात वापरलेल्या कोणत्याही दोन काव्यांची नावे सांगा?
उत्तर – गायत्री,उष्णिक,पुरुषनिक,काकुप ही ऋग्वेदात वापरलेल्या दोन काव्यांची नावे होय.
12. वेदांची नावे सांगा ?
उत्तर – ऋग्वेद,यजुर्वेद,सामवेद,अथर्ववेद ही वेदांची
नावे आहेत.
13. वेदांचे वर्गीकरण कोणी केले ? का ?
उत्तर – कृष्ण – द्वैपायनमहर्षींनी वेदांचे
वर्गीकरण केले.कारण त्या काळात वेदांचा प्रचंड कोश अस्तित्वात होता.इतका मोठा होता
की,एका मानवी जीवनात सर्वांचा अभ्यास करणे आणि शिकविणे
व्यावहारिक दृष्ट्या अशक्य होते.म्हणून वेदांचे वर्गीकरण करण्यात आले.
14. शक्तिविशिष्ट- अव्दैतच्या चार प्रमुख पंथांची नावे सांगा
उत्तर – काश्मीर शैवदर्शन,शैवसिद्धांत,वीरशैव,पशुपता,कालमुख ही
शक्तिविशिष्ट- अव्दैतच्या प्रमुख पंथांची नावे होय.
15. आस्तिक साहित्य म्हणजे काय ? दोन आस्तिक ग्रथांची नावे द्या ?
उत्तर – जे वेद,कर्म आणि
पुनर्जन्म या सिद्धांतावर विश्वास ठेवतात त्यांना आस्तिक म्हणतात व यावर विश्वास –
ठेवणाऱ्या सर्व साहित्याला आस्तिक साहित्य असे म्हणतात.
वेद,उपनिषद,मनुस्मृती,संहिता, रामायण,महाभारत इत्यादी आस्तिक ग्रंथ आहेत.