सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना मिळणार बूट – सॉक्स
कर्नाटक राज्यातील सरकारी शाळेतील 2022-23 या शैक्षणिक वर्षात शिकणाऱ्या इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी सॉक्स वितरीत करण्यासाठी आवश्यक अनुदान राज्यातील एकूण २०४ तालुक्यांच्या संबंधित क्षेत्र शिक्षणाधिकारी यांच्या खात्यावर जमा करण्यात आले असून सदर क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी संबंधित शाळेचे बँक विवरण घेऊन k2 मध्ये माध्यमातून रीसिपियंट आयडी तयार करून नियमानुसार शाळेच्या sdmc खात्यावर जमा करण्याच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.तसेच संबंधित सर्व क्षेत्र शिक्षणाधिकारी यांनी 30.09.2022 पर्यंत या अनुदानाचे उपयोगिता प्रमाण माननीय उपनिर्देशक कार्यालय यांना सादर करावे असेही सांगण्यात आले आहे.
तालुकानुसार जमा अनुदान यादी खालीलप्रमाणे –