VIDYAPRAVESH DAILY ACTIVITY WEEK -1 DAY – 1 (विद्याप्रवेश – दैनंदिन कृती)




 
VIDYA%20PRAVESH.www.smartguruji.in%20(4)




 

         विद्याप्रवेश हा शाळा सिद्धता
कार्यक्रम
खेळता खेळता शिकया तत्वावर
आधारित असून यासाठी स्थळीय लभ्य सामुग्रींचा वापर अध्ययनासाठी करावयाचा आहे
.उदाहरणार्थ
बाहुल्या
,विविध प्रकारची खेळणी ,संग्रहित वस्तू,मुलांच्या आवडीची
कुतूहलजनक पुस्तके
,चित्रपट्ट्या,कथासंच इत्यादी.मुलांना सक्रीय
ठेवणारी साधने इथे आवश्यक आहेत
.आपण निवडलेली साधने अथवा
खेळणी मुलांसाठी कोणत्याही दृष्ट्या हानिकारक नसावीत याकडे विशेष लक्ष द्यावे
.

    शाळा सिद्धता कृती या दररोज 04 तास व आठवड्यातले
05 दिवस याप्रमाणे नियोजित
केल्या आहेत
.जर नियोजनाप्रमाणे 04 तासात या कृती
समर्पकपणे पूर्ण करणे साध्य झाले नाही तर त्या प्रक्रियेला अनुसरून योग्य तो क्रम
हाती घ्यावा
.शनिवार हा एक दिवस उजळणीसाठी
देण्यात आला आहे
.या दिवशी आपण इतर पाच दिवस
केलेल्या कृतींच्या उजळणीबरोबरच पुढील आठवड्यातील कृतींची पूर्वतयारी करावयाची आहे
.




विद्याप्रवेश – 72 दिवसांचा दैनंदिन कृती संच

विद्याप्रवेश – दैनंदिन कृती

आठवडा  1   

दिवस 1 (सोमवार)

तासिका

कृतींचे विवरण

अभिवादन / शुभेच्छांची देवाणघेवाण (मुलांसोबत शिक्षकांचे हितगुज)

सामर्थ्य : शुभेच्छा आणि स्वागत यासारख्या सामाजिक गोष्टींचा विकास.

कृतीचा उद्देश : आदराची भावना निर्माण करणे.

आवश्यक साहित्य : फुगे / फुले / चॉकलेट

पद्धत :

1.   मुलांना टाळ्या वाजवत वर्गात प्रवेश करू देणे.

2.   मुले वर्गात प्रवेश करत असताना शिक्षकांनी मुलांना “नमस्ते, गुड मॉंर्निंग” म्हणत शुभेच्छा देणे.

3.   नंतर प्रत्येक मुलाचे/मुलीचे नाव विचारून त्याचे/तिचे नाव घेत फूल/फुगा/चॉकलेट देत स्वागत करणे.

उदा. “गीता, तुझे स्वागत आहे, Welcome” असे म्हणत स्वागत करणे.

गुजगोष्टी (सकाळच्या सामुहिक कृती)

सामर्थ्य : स्वयंप्रज्ञा, धनात्मक व्यक्तिगत संकल्पानांचा विकास, ऐकणे आणि बोलणे.

कृती – 1 : माझ्याबद्दल… (ध्येय-1)

कृतीचा उद्देश : स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करणे.

आवश्यक साहित्य :

पद्धत :

1.   मुलांना वर्तुळाकारात थांबवणे.

2.   “नमस्कार, मुलांनो सुप्रभात” (हात जोडून) असे म्हणत त्यांचे स्वागत करणे आणि तीन वेळा टाळ्या वाजवणे.

3.   मुलांना “नमस्कार, टीचर सुप्रभात” (हात जोडून) असे म्हणत प्रतिक्रिया द्यावयास सांगणे आणि तीन वेळा टाळ्या वाजवण्यास सांगणे.

4.   त्यांना स्वतःबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करणे.

उदा. “महेश, तू सकाळी काय खाऊन आलास?”  सलीना, तुला कोणता नाश्ता आवडतो?”

* 2 री च्या वर्गातील मुलांना त्यांचे नाव, पालक आणि भावंडांची नावे सांगण्यास प्रोत्साहित करणे; तर 3 री च्या वार्गातील मुलांना त्यांच्या कुटुंबाबद्दल बोलण्यास सांगणे.

माझा वेळ    (Free Indoor play)

दिवस – 01

वर्गातील सर्व अध्ययन कोपऱ्यांकडे शिक्षकांनी मुलांना घेऊन जाणे. प्रत्येक साहित्य आणि त्यांचा वापर याबद्दल मार्गदर्शन करणे आणि काही नमुना कृतींचा परिचय करून देणे. मुलांना प्रश्न विचारत त्यांना समजल्याची खात्री करून घेणे.

पायाभूत संख्याज्ञान, परिसर जागरुकता आणि वैज्ञानिक दृष्टीकोन (शिक्षकांनी सुरु करावयाची मार्गदर्शित कृती)

सामर्थ्य : दृष्टी, ज्ञान, स्मरण, परिसर जागरुकता

कृती : 1 पहा आणि सांगा. (ध्येय-3)

कृतीचा उद्देश : पाहिलेली वस्तू ठराविक वेळेत स्मरण करून सांगण्याचे कौशल्य विकसित करणे.

आवश्यक साहित्य : वर्गात किंवा स्वयंपाक खोलीत उपलब्ध असलेली फळे, भाज्या, भांडी आणि इतर उपलब्ध वस्तू.

पद्धत : इयत्ता – 1 ली

मुलांना अर्धवर्तुळाकारात बसवणे. एकावेळी 8 ते 10 वस्तू काही मिनिटांसाठी दाखवणे आणि त्या झाकून ठेवणे. आता मुलांना पाहिलेल्या वस्तू स्मरण करून सांगण्यास सांगणे. नंतर त्या वस्तूंची चित्रे दाखवून त्यामधील पाहिलेल्या वस्तूंची चित्रे आणि न पहिलेल्या वस्तूंची चित्रे त्याचप्रमाणे परस्पर संबंध असलेली वस्तूंची चित्रे यांचे वर्गीकरण करावयास सांगणे. ही कृती नियोजनबद्ध आणि संथपणे व्हायला हवी.

इयत्ता – 2 री

त्याने/तिने पाहिलेल्या वस्तूंमधील परस्पर संबंध आणि समानता असलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करणे आणि यादी तयार करण्यास सांगणे.

इयत्ता – 3 री

या कृतीला संबंधित प्रश्न विचारणे.

उदा . 1. वस्तूंचे कोणत्या आधारावर वर्गीकरण केले आहे?

     2. लाल रंग असलेल्या भाजीचे नाव सांग.

वापरावयाची सराव पत्रके (worksheets) : I. L-1 (इयत्ता 1 ली, 2 री, 3 री)

सृजनात्मक कला आणि सूक्ष्म स्नायू चलन कौशल्ये (मुलांची कृती)

सामर्थ्य : सूक्ष्म चलन कौशल्यांचा विकास, सर्जनशीलतेच विकास आणि सामायीकरण

कृती : 37 ठसे उमटवून चित्र काढणे. (ध्येय-1)

उद्देश :

·         सूक्ष्म स्नायू विकसित होण्यास मदत होते.

·         एकाग्रतेतून रंगांचा परिचय होतो.

·         सामायिक करण्याची (sharing) आणि जोडण्याची वृत्ती वाढते.

आवश्यक साहित्य : रंग आणि कागद

पद्धत : दोन मुलांना प्रत्येकी एक वाटी याप्रमाणे रंग आणि कागद देणे. प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीचे चित्र काढण्यास सांगणे. नंतर त्यांची तर्जनी किंवा अंगठ्याचे टोक रंगात बुडवून कागदावर ते ठसे उमटवून चित्र काढण्यास सांगणे. याचप्रमाणे अक्षरे आणि अंक यांना बोटांच्या ठशांच्या सहाय्याने रंगविणे.

तफावत : मुलांना पाने रंगात बुडवून कागदावर ठसे उमटवून चित्रे काढण्यास सांगणे. याचप्रकारे पाय आणि हाताचे तळवे यांच्या ठशांच्या सहाय्याने चित्रे काढण्यास सांगणे.

विवरण : 2 री आणि 3 री च्या वर्गाला त्यांच्या कल्पनेनुसार चित्र काढण्यास व रंगविण्यास वाव देणे.

भाषा विकास आणि पायाभूत साक्षरता

 

श्रवण करणे आणि बोलणे

सामर्थ्य : स्मरण करणे, श्रेणीबद्ध विचार करणे, शब्दसंपत्तीचा विकास, अनुभव सामायीकरण (sharing)

कृती : 14 अनुभव सामायीकरण. (ध्येय – 2) ECL-1

उद्देश :

·         मुलाने स्वतः समजून घेतलेल्या गोष्टी आठवणे.

·         घटनांचा क्रम विचारात घेऊन क्रमाने मांडणी करणे.

·         आपल्या बोलण्यात नवीन शब्दांची भर घालण्याकडे लक्ष देणे.

आवश्यक साहित्य :

पद्धत : मुलांना वर्तुळाकारात डोळे मिटून बसण्यास सांगा. आदला दिवस किंवा आठवड्याचा शेवटचा दिवस कसा घालविला याचा विचार करण्यास सागाणे. नंतर सोपे प्रश्न विचारुन उत्तरे मिळविणे.

* तू आज किती वाजता उठलास/ उठलीस?

* शाळेला येताना तुझ्याजवळ काय होते?

* वाटेत तू काय काय पाहिलास /पाहिलेस?

* कालचा दिवस तू कसा घालविलास?

* काल कोणतीही विशेष घटना घडल्यास आमच्याशी सामायिक करशील का?

* काल तू मित्रांबरोबर कोणता खेळ खेळलास / खेळलीस?

इयत्तावार विवरण : 2 री च्या वर्गातील मुलांना सोपे प्रश्न विचारून त्यांचे अनुभव वाढविण्याची संधी देणे.

3 री च्या वर्गातील मुलांना मुक्त संधी देऊन आपले अनुभव क्रमबद्धतेने जोडून सांगण्यास सांगणे. मागील इतर अनुभवही सांगण्याची संधी देणे.

आकलनासहीत वाचन

सामर्थ्य : छापील मजकूराची जाणीव, शब्द ओळखणे, आकलन, शब्द संपत्तीचा विकास आणि पर्यावरण जागरूकता.

कृती : 18

1.   चित्र संचयीका (ध्येय – 2) विषय : तुम्ही बागेत पाहिलेल्या वस्तू / विषय.

उद्देश :

·         चित्र वाचन करणे आणि चर्चा करून समजून घेणे.

·         आनंद, मनोरंजन आणि इतर उद्देशांसाठी स्वतंत्रपणे वाचन करणे.

आवश्यक साहित्य : बागेशी संबंधित चित्रे, बागेमध्ये दिसणाऱ्या वस्तूंबद्दल कथन / कविता / गाणी यांची यादी.

पद्धत :

1.   मुलांच्या परिचयाची गाणी आणि शिशुगीतांना संबंधित चित्रे ओळखणे.

2.   गाण्यातील / कथेतील विशेष शब्द ओळखून त्यांची नावे सांगणे.

3.   गाणी / कथांमधील मुख्य पात्रे ओळखणे आणि पुनरावर्तीत शब्द / ओळी सांगणे / लिहिणे.

4.   नमुना चित्रे (बागेशी संबंधित) वाचणे आणि त्याबद्दल प्रतिक्रिया देत शिक्षकांशी चर्चा करणे.

5.   व्यक्तिगत चित्र संचयीका : कथा किंवा गाण्यातील वस्तू किंवा विशेष शब्द संदर्भ चित्रे वाचून समजून घेऊन व्यक्तिगतपणे चर्चा करण्यास मुलाला सक्षम करणे. त्या चित्र वाचनाचा अर्थ व्यक्त करण्याबाबत खात्री करणे.

उदा. फुले, झाडे, पक्षी, मुलांची खेळणी, आसनव्यवस्था इत्यादींची चित्रे / चित्रफिती / क्षेत्रभेटी इ.

शिक्षकांनी सुलभकार म्हणून कार्य करताना वापरण्याचे विकासाचे प्रश्न :

·        तुम्ही बाग पहिली आहे का?

·        तुम्ही उद्यानामध्ये काय काय पहिले आहे?

·        तुमच्या गावामध्ये असलेल्या बागेतील कोणकोणत्या प्रकारच्या वस्तू आणि विषय तुमच्या लक्षात आहेत?

·        तुमच्या आवडत्या बागेमध्ये काय काय असल्यास तुला आनंद होतो?

·        तुमच्या शाळेत सुंदर बाग तयार करावयाची असल्यास तू कोणकोणती जबाबदारी घेशील?

·        बाग तयार करण्यासाठी कोणकोणते साहित्य आवश्यक आहे?

अशाप्रकारे शिक्षकांनी आपल्या स्थानिक संदर्भानुसार प्रश्नावली तयार करून वर्गनियोजन करणे.

बागेशी संबंधित चित्रे / चित्रपट / चित्रफित / गाणी / कथा वापरून किंवा प्रदर्शित करून मुलांशी चर्चा केली जाऊ शकते.

यासंदर्भात शिक्षकांनी मुलांना मुक्तपणे बोलण्याची, प्रश्न विचारण्याची आणि आपल्या सोप्या भाषेमध्ये चर्चा करण्याची संधी देणे.

शिक्षकांनी 2 री आणि 3 री च्या वर्गातील मुलांना 1 ली च्या वर्गातील मुलांसोबत परस्पर चर्चा करण्यास सहाय्य करण्यास सांगणे आणि विषय विस्तारावर चर्चा करताना सर्व मुलांनी व्यक्त केल्याची खात्री करणे. त्याचबरोबर 2 री आणि 3 री च्या वर्गातील मुलांना त्यांच्या वयोमानानुसार विषयाच्या व्याप्तीचे उच्चतम विचार चर्चेत येतील असे वर्गनियोजन करणे.

(या कृतीचा पुढील भाग 5 व्या दिवशी पुढे चालू करावा)

उद्देशपूर्वक लेखन

सामर्थ्य : लेखनाच्या प्रारंभिक कौशल्यांचा सराव करून घेणे, लेखनाकडे मुलांची ओढ निर्माण करणे.

कृती : गिरविणे (ध्येय – 2) ECW-1

उद्देश :

·         लेखन कौशल्यांचा सराव करणे.

·         सूक्ष्म स्नायू कौशल्ये विकसित करणे.

आवश्यक साहित्य : फळा, खडू

पद्धत :

* मुलांना भिंतफळ्यावर आवडीनुसार गिरविण्यास / लिहिण्यास सांगणे.

* सर्व मुलांचे लेखन / चित्र रेखाटन पाहून प्रोत्साहीत करणे.

* चित्रे काढण्यास प्रवृत्त करणे.

इयत्तावार विवरण : 2 री व 3 री च्या वर्गातील मुलांना भिंतफळ्यावर आवडीनुसार चित्र रेखाटण्यास / लिहिण्यास सांगणे.

मैदानी खेळ

सामर्थ्य : स्थूल स्नायू चलन कौशल्य विकास, निर्णय घेणे.

कृती : 16 मैदानी खेळाचे ठिकाण आणि साहित्य समजून घेणे. (ध्येय – 1)

आवश्यक साहित्य : स्किपींग दोऱ्या, चेंडू, ब्याट

पद्धत :

·        मुलांना खेळाचे मैदान आणि संबंधित साहित्याचा परिचय करून देणे.

·        सुरक्षा नियमांची माहिती देणे.

·        मैदानी खेळाच्या साहित्याजवळ केंव्हाही पळणे किंवा इतरांना ओढणे आणि ढकलणे या गोष्टी करू नका.

·        तुम्ही इतरांबरोबर चेंडू घेऊन खेळता तेंव्हा तुम्हाला थांबत खेळावे लागते त्यावेळी सुरक्षितपणे खेळायाला विसरू नका.

2 री व 3 री च्या वर्गातील मुलानाही हे नियम सांगणे.

कथेची वेळ

शीर्षक : सिंह आणि उंदीर

आवश्यक साहित्य : कथेसाठी लागणारे साहित्य

उद्देश :

·        ऐकण्याची क्षमता विकसित करणे.

·       

अंदाज व्यक्त करण्याचे कौशल्य वाढविणे.

पद्धत :

 

 

Ø शिक्षकांनी कथा सांगण्यापूर्वी कथा वाचून अर्थ समजून घेणे.

Ø कथा सांगताना शिक्षकांनी मुलांसोबत वर्तुळाकारात बसणे.

Ø शिक्षकांनी योग्य हावभावासह सोप्या भाषेत कथा सांगणे.

Ø सोपे प्रश्न विचारुक कथा समजल्याची खात्री करणे.

कथा :

       एकदा जंगलाचा राजा सिंह याला खूप भूक लागली. तो अन्नासाठी जंगलात इकडे तिकडे फिरला. खूप शोधाशोध करूनही त्या दिवशी एकही प्राणी त्याच्या नजरेस पडला नाही. जसजसा वेळ निघून गेला तसा तो खूप दमला आणि एका मोठ्या झाडाखाली झोपी गेला. काही वेळानंतर त्याच झाडाखाली असलेल्या बिळातून एक उंदराचे पिल्लू बाहेर आले आणि खेळू लागले. खेळता खेळता ते सिंहाच्या अंगावर नाचू लागले; त्यामुळे सिंहाची झोपमोड झाली. रागातच तो उठला आणि उंदराच्या पिलाला हातात धरून म्हणाला, “अरे उंदरा तु माझ्या एका बोटाएवढाही नाहीस, तरी तुझी माझ्या अंगावर चढण्याची हिम्मत कशी झाली? भुकेने झोपलेलो असताना तू माझी झोपमोड केली आहेस. तुला आता एकाच घासात खाऊन संपवतो.” त्यामुळे घाबरलेल्या पिलाने सिहांकडे विनवणी केली, “हे जंगलाच्या राजा, माझ्याकडून नकळत चूक झाली आहे. मला सोड. मला तु खल्लास तरी तुझे पोट भरणार नाही. कृपा करून मला सोड. आज मला सोडून माझ्यावर उपकार केलास तर कधीतरी मी तुला मदत करीन.” काही क्षण सिंहाने विचार केला, “मी जंगलाचा राजा, आणि तू मला मदत करणार?” उपहासाने हसत सिंहाने त्या पिलाला “जा आणि कोठेही राहा” असे म्हणत उडवून दिले. तसे ते पिल्लू जीवाच्या आकांताने पळत बिळात शिरले.

       काही दिवसानंतर कोठूनतरी दूरवरून ‘मला वाचवा, मला वाचवा’ असा सिंहाच्या ओरडण्याचा आवाज त्या उंदराच्या पिलाच्या कानावर पडला. त्या आवाजाच्या दिशेने ते पळत सुटले. पाहते तर काय? सिंह जाळ्यात अडकला होता. कितीही धडपड करून त्याला त्यातून बाहेर पडता येत नव्हते. हे पाहून उंदीर म्हणाला, “महाराज, जरा थांबा, मी माझ्या तीक्ष्ण दातांनी हे जाळे तोडून तुमची सुटका करतो” आणि त्याने ते जाळे कुरतडून सिंहाची सुटका केली. जाळ्यातून बाहेर येऊन सिंहाने उंदराच्या पिलाचे आभार मानले. उंदराच्या पिलालाही आपण सिंहाने केलेल्या उपकाराची परतफेड केल्याचा आनंद झाला आणि ते आपल्या बिळाकडे निघून गेले.

कथा सांगितल्यानंतर सोपे प्रश्न विचारणे.

1)   या कथेमध्ये असलेल्या पात्रांची नावे सांगा.

2)   उंदराला खाऊन टाकेन असे सिंह का म्हणाला?

(कथेचा आनंद घेण्यासह ती व्यवस्थित ऐकत असल्याबाबत खात्री करणे.)

पुन्हा भेटू

·        आज पूर्ण केलेल्या कृतींचे पुनरावलोकन / स्मरण करणे.

·        आज मुलांनी पूर्ण केलेल्या सर्व कृती पालक आणि कुटुंबातील सदस्यांसोबत सामायिक करण्यास प्रोत्साहित करणे.

·        दुसऱ्या दिवशी मुले आनंदाने परततील यासाठी एक छोटीशी आनंददायी वातावरण निर्मितीची कृती करू मुलांना निरोप देणे.

“तूच करून बघ” ही कृती करण्यासाठी नियोजन करणे.

00



 

Share with your best friend :)