इयत्ता – नववी विषय – मराठी
पद्य 2. सत्वर पाव गे मला
संत एकनाथ-
परिचय: संत एकनाथ (1538-1599) हे पैठणचे रहिवासी.
जनार्दन स्वामी हे त्यांचे गुरु असून त्यांच्यावर भागवत संप्रदायाचा प्रभाव होता.
कठीण शब्दार्थ :
सत्वर – ताबडतोब,
बोडकी-विधवा,
रोडगा-देवाला वहावयाचा विशिष्ट रोट,
निर्दाळी करणे – नष्ट करणे, नाश करणे.
भारूडात वापरलेली रूपके :
1) सासुरवाशिण – जीव (सुन – जीव)
2) सासरा – वासना
3) सासु – देहबुद्धी
4) जावू – वासना
5) नणंदेच
पोर – मोह
6) नणंद – आशा, अहंकार
7) सासू
-देहबुद्धी
स्वाध्याय
:
प्र. 1 ला खालील पर्यायातून योग्य पर्याय निवडून लिहा.
अ) रोडगा म्हणजे………………
अ) भेटवस्तू
ब) देवीला वहावयाचा विशिष्ट रोट
क) रोडाविणे
ड) बक्षीस देणे
उत्तर – ब) देवीला वहावयाचा विशिष्ट रोट
आ) या भारुडात जागोजागी हा अलंकार आहे.
अ) यमक
ब) श्लेश
क) अनुप्रास
ड) रूपक
उत्तर – ड) रूपक
इ) सासुरवाशिण,कोण किरकीर करते असे म्हणते ?
अ) नणंद
ब)नणंदेचे पोर
क) दादला
ड) जावू
उत्तर – ब) नणंदेचे पोर
प्र. 2 रा खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा.
अ)संसाराच्या जाचाला कोण कंटाळले आहे ?
उत्तर -संसाराच्या जाचाला सासुरवाशीन कंटाळली आहे.
आ) एकनाथानी आपल्या भारुडात सासूसाठी कोणते रूपक वापरले आहे ?
उत्तर -एकनाथ आणि आपल्या भारतात सासु साठी देह बुद्धी हे रूपक वापरले आहे.
इ) सासूरवाशिणीला फडफड कोण बोलते?
उत्तर – सासूरवाशिणीला फडफड तिची जावू बोलते.
प्र. 3 रा खालील प्रश्नांची दोन किंवा तीन वाक्यात उत्तरे लिहा.
अ)या भारुडातील सासूरवाशिणीला कोण जाच करत आहे?
उत्तर -या भारूडातील सासुरवाशिणीला तिची सासू जाच करत आहे.जावू फडफड बोलणे,नणदेचे पोर किरकिर करत आहे.हा सगळा जाच
सासुरवाशिणीला भोगावा लागतो.
आ) जीवरूपी सुन भवानी आईला काय वाहू इच्छिते ?
उत्तर – संसाराच्या जाचाला कंटाळून सासुरवाशीण भवानी आईला प्रसन्न करून संसारातून मुक्ती दे असे मागणे मागत आहे.तेव्हा ती भवानी आईला म्हणते की,’भवानी आई तू मला पाव मी तुला रोडगा वाहिन‘ असे मागणे मागते.
प्र. 4 था संदर्भासहित स्पष्टीकरण करा.
अ) सासू माझी जाच करती । लवकर निर्दाळी तिला ।।
संदर्भ – वरील ओळ संत एकनाथांच्या ‘सत्वर पाव गे मला‘ या भारूडातील आहे.
स्पष्टीकरण – जेव्हा मुलीचं लग्न होऊन ती सासरला जाते तेव्हा ती सासुरवाशीन बनते व तिथे तिला सासूकडून झालेला त्रास सहन होत नाही.तेव्हा ती भवानी आईला मागणी मागताना वरील ओळी म्हणते.
आ) दादला मारून आहुती देईन । मोकळी करगे मला ।। I
संदर्भ – वरील ओळ संत एकनाथांच्या ‘सत्वर पाव गे मला‘ या भारूडातील आहे.
स्पष्टीकरण – केलेला छळ जावूचे फडफड बोलणे, नणदेच्या पोराने केलेली किरकिर हे सर्व सासुरवाशिणीला सहन होत नाही.तेव्हा ती भवानी आईला
मागणे मागते की, यातून मला मोकळी कर.मला एकटी राहू दे हे सांगताना सासुरवाशिणीने वरील ओळ म्हटली आहे.
प्र. 5 वा खालील प्रश्नाचे पाच ते सहा ओळीत उत्तर लिहा.
संत एकनाथांच्या या भारुडातून प्रकटणारे रूपक उलगडून दाखवा.
उत्तर – सासुरवाशीण – जीव
सासरा –अहंकार
सासू – देहबुद्धी
जावू – वासना
नणदेचे पोर – मोह
नणंद – आशा
प्र. 6 वा खालील प्रश्नाचे आठ ते दहा ओळीत उत्तर लिहा
या भारूडाचा सारांश तुमच्या शब्दात लिहा.
उत्तर – संत एकनाथांनी या भारुडात सासुरवाशिणीचे रूपक वापरले आहे.संसाराच्या जाचाला कंटाळून सासुरवाशीण भवानी आईला प्रसन्न करून संसारातून मुक्ती दे असे मागणे मागत आहे. तसेच त्यांच काहीतरी बरे वाईट होऊ दे.सासू मला खूप त्रास देते,माझा छळ करते,तिला लवकर घेऊन जा.मला माझी जावू सतत फडफड बोलत असते.तिला विधवा कर.नणंदेचं पोर सतत किरकिर करत असतं त्याला खरूज होऊ दे.मी तुला रोडगा वाहीन
आणि या सगळ्या त्रासातून मला एकटीच राहू दे असे भवानी आईकडे मागणी मागत आहे.सुनेने केलेली सासरच्या जाचाची तक्रार आणि तिचे अध्यात्माशी जोडलेले नाते यातून रंजकता, पारमार्थिक मार्गदर्शन या दोन्ही गोष्टी नाथांनी या भारूडातून साधल्या आहेत.