इयत्ता – आठवी
विषय – समाज विज्ञान
प्रकरण 2 भारतवर्ष
2024
स्वाध्याय
I. रिकाम्या जागा भरा.
1. भौगोलिक दृष्ट्या भारत द्विपकल्प आहे.
2. राखेचे अंश कर्नुल या गुहेत आढळले आहेत.
3. मध्यपाषाणयुगातील शस्त्रांना नाजूक शस्त्रे म्हटले जात असे.
II. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा.
4. भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये कोणती ?
उत्तर- भारताची भौगोलिक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे-:
हिमालय पर्वतरांगा – खैबर बोलन खिंड उंच शिखरे
उत्तरेकडील महामैदाने – सिंधू संस्कृतीचा उदय
दख्खनचे पठार –दक्षिण व उत्तर पठार
किनारपट्ट्या –भारताला एकूण 6100 मैल किनारपट्टी लाभली आहे.पूर्व किनारपट्टी (कोरोमंडल) पश्चिम किनारपट्टी (कोकण किनारपट्टी)
5. कोणत्या खिंडीतून भारतावर आक्रमणे झाले आहेत?
उत्तर – खैबर व बोलन खिंडीतून भारतावर आक्रमणे झाली आहेत.
6. इतिहासपूर्व काल म्हणजे काय?
उत्तर – लेखनकलेच्या पूर्वीचा काळ म्हणजे इतिहासपूर्व काल म्हणतात.
7. पशुपालन आणि दुग्धोत्पादनाची कशी सुरुवात झाली ?
उत्तर – पृथ्वीचे तापमान हळूहळू वाढू लागले.त्यामुळे अनेक ठिकाणी कुरणे वाढली.प्राणी व पक्ष्यांच्या संख्येत वाढ झाली.हरीण,याक,शेळ्या-मेंढ्या इत्यादी प्राणी या गवताळ कुरणात वाढले.अजूनपर्यंत ज्या प्राण्यांची तो शिकार करत असे त्या प्राण्यांची वैशिष्ट्ये,खाण्यापिण्याच्या सवयी,उत्पत्ती यांचे निरीक्षण करू लागला.कालांतराने प्राण्यांना पकडून त्यांने माणसाळवले याप्रमाणे पशुपालन व दुग्ध उत्पादनाचे व्यवसाय सुरू झाले.
8. इतिहासातील वेगवेगळ्या कालखंडाला पुरातत्त्व संशोधकानी वेगवेगळी नावे दिली आहेत,ती कोणती?
उत्तर –