STATE SYLLABUS
CLASS – 4
MARATHI MEDIUM
SUBJECT – EVS
PART – 2
परिसर अध्ययन
प्रकरण- 15
16.The Changing Families
16. बदलणारी कुटुंबे
गेल्या वर्षी काढलेले रामय्या आणि राजम्माच्या कुटुंबाचे हे चित्र आहे.
ह्या कुटुंबात एकूण किती सदस्य आहेत?
उत्तर – ह्या कुटुंबात एकूण 11 सदस्य आहेत.
रामय्याला किती मुले आहेत ? ती कोणकोणती ?
उत्तर –रामय्याला 5 मुले आहेत.
गोपी,सुरेश,रमेश,दिलीप,पिंकी ही त्यांची नावे आहेत.
गोपीला किती मुले आहेत ? ती कोणकोणती ?
उत्तर – गोपीला दोन मुले आहेत.सुहास व सुरभी ही त्यांची नावे आहेत.
गोपीला आपले कुटुंब दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावे असे का वाटत होते?
उत्तर – गोपीला शहरात नोकरी मिळालेली आहे म्हणून त्याला आपले आपले कुटुंब शहरात स्थलांतर करावे असे वाटत होते.
पिंकी दुसऱ्या शहरात का जाणार आहे ?
उत्तर – पिंकी पुढील उच्च शिक्षणासाठी शहरात जाणार आहे.
शिला या कुटुंबात का येणार ?
उत्तर – शिलाचे रमेश शी लग्न होणार आहे म्हणून ती या कुटुंबात येणार आहे.
सुरेशच्या घरातील नवीन सदस्य कोण ?
उत्तर – बाळ हे त्यांच्या घरातील नवीन सदस्य आहे.
रामय्याचा कुटुंब वृक्ष काढ. कुटुंबातून बाहेर गेलेल्या व्यक्तिंच्या नावाला गोल कर आणि कुटुंबात आलेल्या व्यक्तिच्या नावाला चौकोन कर. रामय्याच्या कुटुंबात झालेले बदल ओळख.
यावर्षी रामाय्याच्या कुटुंबात किती सदस्य आहेत?
उत्तर – यावर्षी रामय्याच्या कुटुंबातील सदस्य संख्या 7 आहे.कारण 11 जणांच्या कुटुंबामध्ये 6 सदस्य इतर ठिकाणी गेले आहेत व दोघे नवीन सदस्य कुटुंबात आले आहेत.
तुझ्या कुटुंबाचा कुटुंब वृक्ष काढ.
तुझ्या कुटुंबात नवीन कोणी राहायला आले असेल तर त्याच्या नावाला ∆ अशी खूण ठेव.त्याची माहिती लिही.
उदा.
नाव | नाते | कोठून आली | येण्याचे कारण |
शिला | काकी | बेळगाव | माझ्या काकांशी लग्न करून घरी आलेले नवीन सदस्य |
जर तुझ्या कुटुंबातील कोणीतरी दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले असेल तर त्याच्या नावाला O कर.त्याची माहिती लिही.
नाव | नाते | कोठे गेला | जाण्याचे कारण |
सुरज | भाऊ | पुणे | उच्च शिक्षणासाठी गेला |
येथे दोन कुटुंबांचे कुटुंब वृक्ष दिलेले आहेत. ‘O’ ही खुण कुटुंबातून बाहेर गेलेले व ‘△’ही खुण कुटुंबात आलेले दर्शवितात.
सलिम आणि फातिमा यांना किती मुले आहेत?
उत्तर – सलिम आणि फातिमा यांना आठ मुले आहेत.
सलिमच्या कुटुंबात आता किती सदस्य आहेत ?
उत्तर – सलिमच्या कुटुंबात आता 12 सदस्य आहेत.
सलिमच्या कुटुंबातील बाहेर गेलेले सदस्य किती ?
उत्तर – सलिमच्या कुटुंबातील बाहेर गेलेले सदस्य 2
सलिमच्या कुटुंबातील नवीन आलेले सदस्य किती ?
उत्तर – सलिमच्या कुटुंबातील नवीन आलेले सदस्य 2
राजूच्या कुटुंबात किती सदस्य आहेत ?
उत्तर – राजूच्या कुटुंबात 4 सदस्य आहेत.
राजूच्या कुटुंबात किती नवीन सदस्य जोडले गेले आहेत ?
उत्तर – राजूच्या कुटुंबात एक नवीन सदस्य जोडला गेला आहे.
राजूच्या कुटुंबातून किती सदस्य बाहेर गेले आहेत ?
उत्तर – राजूच्या कुटुंबातून एक सदस्य बाहेर गेला आहे.
राजू आणि सलीम यांच्या कुटुंबांची तुलना कर. कोणते कुटुंब मोठे आहे ? का.
उत्तर – सलीमचे कुटुंब मोठे आहे. कारण सलिमला जास्त मुले आहेत आणि त्याच्या मुलांचे लग्न झाले आहे.
तुमच्या घरातील वडिलधाऱ्यांच्या मदतीने तुमच्या कुटुंबाचा मागील 4 वर्षाचा व आता असलेल्यांचा कुटुंब वृक्ष काढ.
तू तयार केलेल्या कुटुंब वृक्षांची तुलना कर.
त्यातील मोठे कुटुंब कोणते ?
उत्तर – त्यातील मागील 4 वर्षाचे कुटूंब मोठे आहे.
गेल्या चार वर्षामध्ये तुझ्या कुटुंबात काही बदल झाले आहेत का ? जर होय, तर कारणे लिही.
उत्तर – या वर्षी माझ्या कुटुंबात बदल झाला आहे.बदलाचे कारण म्हणजे बहिणीचे लग्न झाले आहे.पुढच्या महिन्यात ती पतीच्या घरी जाणार आहे.त्यामूळे माझ्या कुटुंबातील एकूण सदस्य संख्येत बदल झाला आहे.
तुझ्या शेजारच्या कुटुंबांचे निरीक्षण कर. त्यातील एका मोठ्या कुटुंबाचा व एका लहान कुटुंबाचा कुटुंबवृक्ष काढ.
कुटुंबातील सदस्य दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर का करतात याची कारणे तुमच्या घरातील वडिलधाऱ्या व्यक्तिंच्याकडून माहिती करुन घे. कारणांची यादी करुन येथे लिही.
उत्तर –
कुटुंबातील सदस्य दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर0होण्यासाठी खालील करणे असू शकतात.
1. नोकरी किंवा व्यवसायासाठी
2. शिक्षणासाठी
3. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी
4. चांगल्या आरोग्य सुविधा मिळवण्यासाठी
5. घर किंवा जमिनीचे प्रश्न
6. नैसर्गिक आपत्ती (पुर, दुष्काळ इ.)
7. कुटुंबातील इतर सदस्यांसोबत राहण्यासाठी
8. अधिक चांगल्या जीवनशैलीसाठी
हे तुला माहीत आहे का ?
धारवाडहून 25 km अंतरावर असलेल्या लोकुळ गावातील एका कुटुंबात 7 पिढ्यापासूनचे लोक अजूनही एकत्र राहतात. आता या मोठ्या कुटुंबात 180 जण आहेत.
बेंगळूर येथे राहणाऱ्या एम.एम. उद्योग नावाने ओळखल्या जाणाऱ्या कृष्णमुर्ती यांच्या कुटुंबात एकूण 40 लोक एकत्र राहतात.
गैरसमज, एकमेकातील असहकार, कामांची असमान वाटणी, नवीन गरजा इत्यादी कारणामुळे मोठी कुटुंबे लहान कुटुंबात बदलत आहेत.
कुटुंब वृक्ष किंवा 3 पिढ्यांची माहिती ही काही घटना व आर्थिक व्यवहार यासाठी उपयोगी असते.