7VI MARATHI 1. SARVATMAKA SHIVASUNDARA (1.सर्वात्मका शिवसुंदरा)

 


7VI MARATHI 1. SARVATMAKA SHIVASUNDARA (1.सर्वात्मका शिवसुंदरा)कवी परिचय –

   पूर्ण नाव – विष्णू वामन शिरवाडकर

  टोपण नाव   कुसुमाग्रज  

 
जन्म –
२७ फेब्रुवारी १९१२ (जिल्हा नाशिक ,महाराष्ट्र)

 मृत्यू  १० मार्च १९९९

       सन 1988 साली मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणारे कवी.

         प्रसिद्ध कवी , कथालेखक, कादंबरीकार, नाटककार,

प्रसिद्ध साहित्य – विशाखा,किनारा,मराठी माती इ. (काव्यसंग्रह). नटसम्राट,दुसरा पेशवा बाजीराव,वीज

म्हणाली धरतीला (रुपांतरीत नाटके) ययाती आणि देवयानी (प्रसिद्ध नाटक) वैष्णव, जान्हवी इ. (प्रसिद्ध कादंबरी)

कुसुमाग्रजांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा

 दिवस म्हणून साजरा केला जातो.
 

नवीन शब्दार्थ   

अभिवादन – नमस्कार  

श्रमिक – श्रम करणारे

कर – हात

रंजले गांजलेले – गोरगरीब,दीनदुबळे

दीप – दिवा

साधना – प्रयत्न

तिमिर – अंधार

सुमन – फूल पुष्प  

सर्वात्मक – सर्व व्यापी

करुणा – दया

प्र. १ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.

1.कवीने प्रभूला कोणती विनंती केली आहे?

उत्तर – तू आम्हाला अंधारातून प्रकाशाकडे जाणारा मार्ग दाखव आणि आलेल्या संकटांवर मात करण्याची शक्ती दे. अशी कवीने प्रभूला विनंती केली आहे.

2.ईश्वर कोठे कोठे आहे असे कवीला वाटते?

उत्तर – ईश्वर चोहीकडे आहे असे कवीला वाटते.

3.ईश्वर कोणाची आसवे पुसतो?

उत्तर – ईश्वर गोरगरीब ,दीनदुबळ्यांची आसवे पुसतो.

4.न्यायासाठी लढणाऱ्याना ईश्वर काय देतो?

उत्तर –  न्यायासाठी लढणाऱ्याना ईश्वर हाती तलवार देतो.

5.माणसाला केंव्हा भय वाटत नाही?

उत्तर – दयाळू ईश्वराची दया सोबत असताताना माणसाला भय वाटत नाही.

6.ईश्वर कोणासमवेत व कोठे श्रमतो?

उत्तर –  ईश्वर श्रमिकासोबत,शेतकऱ्यांसोबत शेतात श्रमतो.
 

प्र. २  खालील प्रश्नांची तीन-चार
वाक्यात उत्तरे लिहा.

1.ईश्वराला सर्वात्मक असे का म्हटले आहे?

उत्तर –  देव फूल-पानात, ताऱ्यांत, सगळीकडेच वेगवेगळ्या रूपांत वास करतो.जगात जे सद्धर्म होते.त्यामध्ये ईश्वर असतो.म्हणून ईश्वराला सर्वात्मक असे म्हटले आहे.

प्र. ३ खालील शब्दाप्रमाणे शब्द तयार करा.

नमुना – ध्येय – ध्येयार्थ , ध्येयासाठी

         1.न्याय – न्यायार्थ , न्यायासाठी                                 

        २. ज्ञान – ज्ञानार्थ , ज्ञानासाठी

 

३.ध्यास – ध्यासार्थ , ध्यासासाठी                 

 

४. राष्ट्र – राष्ट्रार्थ , राष्ट्रासाठी

 

५.त्याग – त्यागार्थ , त्यागासाठी                  

 

६. हित – हितार्थ , हितासाठी

प्र. ४ खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.

1)    जे रंजले अन गांजले

        

    पुसतोस त्यांची आसवे

 

    स्वार्थावीना सेवा जिथे

 

    तेथे तुझे पद पावना ॥

                  2)  सुमनांत तू, गगनांत तू

 

तार्‍यांमध्ये फुलतोस तू

 

सद्धर्म जे जगतामध्ये

 

सर्वांत त्या वसतोस तू

 
 

प्र. ५ खालील कवितेच्या ओळींचा तुमच्या शब्दात अर्थ लिहा.

न्यायार्थ जे लढती रणी

 

तलवार तू त्यांच्या करी

ध्येयार्थ जे तमी चालती

तू दीप त्यांच्या अंतरी

उत्तर –  वरील ओळी कुसुमाग्रज लिखित “सर्वात्मका शिवसुंदरा” या कवितेतील असून या ओळीच्या माध्यमातून कवी म्हणतात कि,ईश्वर हा सर्वत्र व्यापलेला असून न्यायासाठी जे रणांगणावर लढत असतात त्यांच्या हाती तलवार बनून त्याना ताकद देतो.तर ध्येयासाठी जे आपल्या मार्गावर चालत असतात.त्याच्या मनातील दीप बनून त्यांना उजेडाकडे नेतो.

प्र.६ समानार्थी शब्द लिहा.

अ)    अंधार – तिमिर               

ब) प्रकाश – उजेड                    

क) फूल – सुमन

ड) आकाश – नभ                        

इ) अश्रू – आसवे             

ई) दिवा – दीपक
 

प्र. ७ शब्दातील अर्थाचे नमुन्याप्रमाणे फरक सांगा.

नमुना –      कर – हात

                    कर – काम करण्याची आज्ञा

   

पद – हुद्दा     

 

पद – पाय                

    

सुमन   फूल

 

सुमन – चांगले मन                

   

अंतर   मन

         अंतर   फट

प्र. ८ वाक्यात उपयोग करा.

१.       अभिवादन – नमस्कार करणे

 

रोहन दररोज आई-वडिलांना अभिवादन करतो.

 

२.     प्रार्थना – ईश्वराची नित्याची प्रार्थना

 

मुलांनी शाळेत प्रार्थना म्हटली.

३.     करुणा – दया    

 

प्राणीमात्रांवर कायम करुणा करावी.

 

प्रश्नोत्तरे PDF स्वरुपात  डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा… 

 

7VI MARATHI 1. SARVATMAKA SHIVASUNDARA (1.सर्वात्मका शिवसुंदरा)

 

  

Share your love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *