इयत्ता- सहावी
विषय – मायबोली मराठी
1. देह मंदिर,चित्त मंदिर
कवी – वसंत बापट
देह मंदिर, चित्त मंदिर, एक तेथे प्रार्थना
नवीन शब्दार्थ –
देह – शरीर, काया
चित्त – मन
नित्य – दररोज, नेहमी
कामना – इच्छा
दुर्बल – अशक्त
सद्भावना – चांगली भावना
आराधना – पूजा
अ. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा.
1. नित्य कोणती आराधना झाली पाहिजे ?
उत्तर – नित्य सत्य,सुंदर,मंगळाची आराधना झाली पाहिजे.
2. दुःख कोणाचे जावो असे कविला वाटते?
उत्तर – दु:खितांचे दु:ख जावो असे कवीला वाटते.
3. वेदना जाणावयाला काय केले पाहिजे ?
उत्तर- वेदना जाणावयाला संवेदना जागवली पाहिजे.
4.मानवाच्या जीवनाला कशाचा वेध लागला पाहिजे?
उत्तर – मानवाच्या जीवनाला सुंदराचा वेध लागला पाहिजे
5. एकतेची कल्पना पूर्ण होण्यास काय विसरले पाहिजे?
उत्तर – एकतेची कल्पना पूर्ण होण्यास आपल्यातील भेद,वैर आणि वासना विसरल्या पाहिजेत
आ.खालील कवितेच्या ओळी पूर्ण करा.
1) दुःखितांचे दुःख जावो ही मनाची कामना
वेदना जाणावयाला जागवू संवेदना
दुर्बलांच्या रक्षणाला पौरूषाची साधना
सत्य-सुंदर-मंगलाची नित्य हो आराधना ।।1।।
2) भेद सारे मावळू द्या, वैर साऱ्या वासना
मानवाच्या एकतेची पूर्ण होवो कल्पना
मुक्त आम्ही फक्त मानू बंधूतेच्या बंधना
सत्य-सुंदर-मंगलाची नित्य हो आराधना ।।3।।
इ. खालील प्रश्नांची दोन तीन वाक्यात उत्तरे लिही.
1. दुःखितांच्या वेदना दूर करण्यास काय काय केले पाहिजे असे कवीला वाटते?
उत्तर – दुःखितांच्या वेदना दूर करण्यासाठी सर्वप्रथम दु:खितांचे दु:ख समजले पाहिजे.त्यासाठी संवेदना जागवली पाहिजे.दु:खितांचे पौरुषाने रक्षण केले पाहिजे.तसेच दु:खितांचे दु:ख दूर जावो अशी आपली भावना झाली पाहिजे.या सर्वांमुळे दुःखितांच्या वेदना दूर होतील असे कवीला वाटते.
2. मानवाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन कसा असला पाहिजे?
उत्तर – मानवाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असला पाहिजे .मानवाच्या जीवनात नवतेज राहिले पाहिजे.जीवनाला सुंदराचा वेध लागला पाहिजे.आपण सर्वजण एक आहोत अशी भावना मनात झाली पाहिजे.
3. बंधुत्वाची भावना दृढ करण्यास काय पाहिजे?
उत्तर –सर्वांनी एकमेकातील भेद,वैर व वासना विसरुन जगातील सर्व मानव एकच आहेत अशी भावना ठेवली पाहिजे. असे झाले तरच बंधुत्वाची भावना दृढ होईल.
4. एखादा गरीब विद्यार्थी तुझ्या वर्गात असल्यास तू त्याला कशाप्रकारे मदत करशील?
उत्तर – एखादा गरीब विद्यार्थी माझ्या वर्गात असल्यास त्याला आवश्यक सर्व प्रकारची मदत करण्याचा मी प्रयत्न करीन.त्याला शिक्षणासाठी आवश्यक वह्या,पुस्तके,पेन इत्यादी देण्याचा प्रयत्न करीन आणि त्याच्याशी कायम सद्भावनेने वागीन.
खालील शब्दांचे समानार्थी लिहा.
1. मंदिर – देऊळ
2. शौर्य – धैर्य,धीटपणा
3.कामना – इच्छा
4. वैर –द्वेषभाव , शत्रूत्व
5.वेध – दृष्टी
6.नित्य – दररोज
उ. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा.
1.नित्य ✖ अनित्य, अनियमित
2.सुंदर ✖ कुरूप
3. मंगल ✖ अमंगल
4.अंतरंग बाह्यरंग
5. मुक्त ✖ निर्बंध , बंध
6. दुर्बल ✖ बलवान
ए. खालील चक्र कवितेतील शब्दांचा वापर करू पूर्ण करा.
1. प्रार्थना
2. भावना
3. वासना
4. कामना
5. बंधनं
6. जीवना
7. वेदना
8. साधना
वरील प्रश्नोत्तरे PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी येथे स्पर्श करा..