इयत्ता – सातवी
विषय – विज्ञान
माध्यम – मराठी
भाग – 2
स्वाध्याय
11. प्रकाश
तुम्ही काय शिकलात ?
• प्रकाश नेहमी सरळ रेषेत जातो.
• कोणतेही पॉलीश केलेले किंवा चमकदार / गुळगुळीत पृष्ठभाग आरशाप्रमाणे कार्य करतात.
• ज्या प्रतिमा पडद्यावर घेता येतात त्यांना सत्य किंवा वास्तव प्रतिमा असे म्हणतात.
• ज्या प्रतिमा पडद्यावर घेता येत नाहीत त्यांना आभासी प्रतिमा असे म्हणतात.-
• सपाट आरशातील प्रतिमा सुलटी आणि भ्रामक असते आणि वस्तूच्या आकाराइतकी असते. प्रतिमा आरशाच्या मागे तेवढ्याच अंतरावर बनते, जेवढ्या अंतरावर वस्तू आरशाच्या समोर ठेवलेली असते.
• सपाट आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमेत वस्तुचा डावा भाग उजवा आणि उजवा भाग डावा असल्याप्रमाणे दिसतो. म्हणजेच बाजूंची आदलाबदल होते.
• अंतर्गोल आरसे वास्तव आणि उलटी प्रतिमा बनवू शकतात. जेव्हा वस्तू आरशाच्या खूप जवळ ठेवतो तेव्हा प्रतिमा भ्रामक, सुलटी आणि वर्धित (magnified) असते.
• बहिर्गोल आरशाद्वारे बनणारी प्रतिमा सुलटी, भ्रामक किंवा वस्तूच्या आकारपेक्षा लहान असते.
• बहिर्गोल भिंगाद्वारे वास्तव आणि उलटी प्रतिमा बनवू शकतो. जेव्हा आपण वस्तू या भिंगाच्या खूप जवळ ठेवतो, तेव्हा बनणारी प्रतिमा भ्रामक, सुलटी व वर्धित असते. वस्तुंना वर्धित करुन पाहण्यासाठी बहिर्गोल भिंग उपयोगात आणले जाते. म्हणून या भिंगाला वर्धक भिंग असे म्हणतात.
• अंतर्गोल भिंगाद्वारे नेहमी सुलट, आभासी व आकाराने वस्तूपेक्षा लहान प्रतिमा बनतात.
• पांढरा प्रकाश सात रंगाचे मिश्रण आहे.
1. रिकाम्या जागा भरा.
(a) ज्या प्रतिमांना पडद्यावर घेता येत नाही, त्यांना आभासी प्रतिमा असे म्हणतात.
(b) जर प्रतिमा नेहमी आभासी व आकाराने लहान असेल, तर ते एखाद्या बहिर्गोल आरशाद्वारे बनलेली असते.
(c) जर प्रतिमा नेहमी वस्तूच्या आकाराइतकीच असेल तर तो आरसा सपाट असतो.
(d) ज्या प्रतिमांना पडद्यावर घेता येते, त्यांना वास्तव प्रतिमा असे म्हणतात.
(e) अंतर्गोल भिंगाद्वारे बनवलेली प्रतिमा पडद्यावर घेता येत नाही.
2. खालील विधाने सत्य आहेत की असत्य ओळखून लिहा.
(a) आम्ही बहिर्गोल आरशाद्वारे वर्धित व सुलट प्रतिमा मिळवू शकतो.
उत्तर – असत्य
(b) अंतर्गोल भिंग नेहमी आभासी प्रतिमा बनविते.
उत्तर – सत्य
(c) अंतर्गोल आरशाद्वारे आम्ही वास्तव, अवर्धित व उलट प्रतिमा मिळवू शकतो.
उत्तर – सत्य
(d) वास्तव प्रतिमांना पडद्यावर घेऊ शकत नाही.
उत्तर – असत्य
(e) अंतर्गोल आरसा नेहमी वास्तव प्रतिमा बनवितो.
उत्तर – असत्य
4. सपाट आरशाद्वारे बनणाऱ्या प्रतिमांचे गुणधर्म लिहा.
उत्तर –
1. सपाट आरशाद्वारे बनणारी प्रतिमा आभासी असते.
2. प्रतिमा सुलट आणि वस्तूच्या आकाराएवढीच असते.
3. वस्तू आरशासमोर जितक्या अंतरावर असते, प्रतिमा तितक्याच अंतरावर तयार होते.
4. प्रतिमा उलटसुलट (डावीकडील उजवीकडे आणि उजवीकडील डावीकडे) असते.
5. इंग्लिश किंवा तुम्हाला ज्ञात असलेली इतर भाषा व त्या भाषेच्या वर्णमालेतील त्या अक्षरांना शोधून काढा की ज्यांची सपाट आरशामधील प्रतिमा हुबेहुब त्या अक्षरासारखीच आहे. तुमच्या परिणामांचे निष्कर्ष काढा.
उत्तर – इंग्रजी किंवा इतर भाषेतील अक्षरे ज्यांची सपाट आरशामधील प्रतिमा हुबेहुब तशीच दिसते:
अशी काही अक्षरे उदाहरणार्थ A, H, I, M, O, T, U, V, W, X, Y आहेत.
निष्कर्ष -: सपाट आरशामध्ये सममिती अक्ष उभे असल्यास त्या अक्षरांची प्रतिमा हुबेहुब दिसते.
6. आभासी प्रतिमा म्हणजे काय ? एखादी अशी परिस्थिती सांगा, जेथे आभासी प्रतिमा तयार होते?
उत्तर – ज्या प्रतिमा पडद्यावर घेता येत नाहीत, त्यांना आभासी प्रतिमा असे म्हणतात.
उदाहरण: सपाट आरशात दिसणारे आपले प्रतिबिंब.
7. अंतर्गोल व बहिर्गोल आरशाचे प्रत्येकी एक-एक उपयोग लिहा.
उत्तर – अंतर्गोल आरसा तोंडातील दात तपासण्यासाठी डॉक्टर अंतर्गोल आरशाचा वापर करतात.
बहिर्गोल आरसा : वाहनांना त्यांच्या मागील दृश्य दिसण्यासाठी बहिर्गोल आरसा वापरतात.
1. अंतर्गोल आरसा: तोंडातील भाग मोठा दिसण्यासाठी,दात तपासण्यासाठी डॉक्टर वापरतात.
2. बहिर्गोल आरसा: वाहनांच्या मागील दृश्यासाठी बहिर्गोल आरशाचा वापर होतो.
8. बहिर्गोल भिंग व अंतर्गोल भिंगातील दोन फरक लिहा.
बहिर्गोल भिंग | अंतर्गोल भिंग |
1. किनाऱ्यापेक्षा मध्यभागी जाड असते. | 1. किनाऱ्यापेक्षा मध्यभागी पातळ असते. |
2. किरणांना आभिसारित करते, म्हणून याला अभिसारी भिंग म्हणतात. | 2. किरणांना अपसारित करते, म्हणून याला अपसारी भिंग म्हणतात. |
3. आभासी, सुलट व वर्धित प्रतिमा तयार करते. | 3. आभासी, सुलट व लहान प्रतिमा तयार करते. |
9. कोणत्या प्रकारचा आरसा वास्तव प्रतिमा बनवू शकतो ?
उत्तर – अंतर्गोल आरसा वास्तव प्रतिमा बनवू शकतो.
10. कोणत्या प्रकारचे भिंग नेहमी आभासी प्रतिमा बनविते ?
उत्तर – अंतर्गोल भिंग नेहमी आभासी प्रतिमा बनविते.
प्रश्न संख्या 11 ते 13 मध्ये बरोबर पर्यायी उत्तर निवडा.
11. वस्तूपेक्षा मोठ्या आकाराची आभासी प्रतिमा याने बनविली जाऊ शकते.
(a) अंतर्गोल भिंग
(b) बहिर्गोल आरसे
(c) अंतर्गोल आरसे
(d) सपाट आरसे
उत्तर – (c) अंतर्गोल आरसे
12. डेविड आपले प्रतिबिंब सपाट आरशामध्ये पाहत आहे. आरसा व त्याच्या प्रतिबिंबातील अंतर 4m आहे. जर तो आरशाकडे 1 m जातो तर तेव्हा डेव्हिड व त्याच्या प्रतिबिंबातील अंतर
(a) 3 m
(b) 5 m
(c) 6 m
(d) 8 m
उत्तर – (c) 6 m
13. एका कारचा पार्श्वदर्शी आरसा हा सपाट आरसा आहे. चालक आपली कार 2 m/s वेगाने मागे घेत पार्श्वदर्शी आरशामध्ये आपल्या कारच्या मागे थांबलेल्या (पार्क केलेल्या) एका ट्रकची प्रतिमा पाहतो. चालकाला ट्रकची प्रतिमा कोणत्या वेगाने आपल्याकडे येत असलेले प्रतित होते, ते आहे –
(a) 1 m/s
(b) 2 m/s
(c) 4 m/s
(d) 8 m/s
उत्तर – (c) 4 m/s