घटक – 17
मानव
आणि समाज
रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
1.मानव हा समाजशील प्राणी आहे.
2.औपचारिक शिक्षण शाळेत देतात
3.समाजशास्त्राचे जनक ऑगस्ट काम्त.
4.मानवाला सुसंस्कृत होण्यासाठी भाषेची गरज आहे.
5.मानव प्राणी भाषेतून आपल्या भावना व्यक्त करतो.
II. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
6. मानव हा समाजशील प्राणी कसा आहे?
उत्तर – मानव आणि समाजाचे नाते विलक्षण आहे समाजाशिवाय मानव नाही आणि मानव शिवाय समाज नाही मानव हा समाजशील प्राणी असल्यामुळे त्याचे नातेसंबंधांचे जाळे आहे असे म्हटले जाते.
7.सामाजिकीकरण म्हणजे काय?
उत्तर – समाज संस्कृती वर्तन भाषा यांचा अभ्यास म्हणजे सामाजिकीकरण होय.
8.मिदनापूर येथे सापडलेल्या कमलाचे वर्णन करा.
उत्तर – 1920 साली मिदनापूर येथे नऊ वर्षे प्राण्यांच्या सहवासात कमला सापडली.ती प्राण्यांप्रमाणे चालत होती आणि कच्चे मांस खात होती.नंतर मानवाच्या सहवासात राहिल्यावर ती इतर मुलांप्रमाणे चालू बोलू लागली.पण तिला आपल्या अस्तित्वाचे भान नव्हते.यावरून हे सिद्ध होते की,मानवी समाजात राहणारी व्यक्ती पशु समान असते.
9.आरंभीच्या समाज शास्त्रज्ञांची नावे लिहा आरंभीचे समाजशास्त्रज्ञ
उत्तर – ऑगस्ट काम्त
हार्बर्ट स्पेन्सर
कार्ल मार्क्स
एमिल हेग
III. तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
10.मानवी समाज आणि भाषा यातील संबंधित चर्चा करा.
उत्तर – भाषा -: आपण बोलताना आई-वडील,भाऊ-बहीण,काका-काकी असे शब्द वापरतो.भाऊ-बहीण अशा शब्दांनी नात्यांची
ओळख होते.भाषेमुळे ठराविक नाती आणि भावना कळतात.
समाज –: भाषा मानवी समाजाचे एक प्रभावी साधन आहे. भाषेशिवाय जग ही कल्पना केवळ अशक्य
आहे.पुस्तके, शाळा, प्रसारमाध्यमे किंवा संस्कृती सारेच
अशक्य! मानवी समाज हा प्राण्यांप्रमाणेच असला असता.समाजशास्त्रामध्ये समाज या घटकाचा अभ्यास करताना भाषेला महत्त्वपूर्ण स्थान आहे.
11. मानवी समाज आणि प्राणी यातील फरक सांगा.
मानवी | प्राणी |
मानवाला विचार करण्याची क्षमता आहे. | प्राणी विचार करत नाहीत. |
मानवाला अस्तित्व आहे. | प्राण्याला अस्तित्व नाही. |
मानवाला भावना असते. | प्राण्याला भावना नसतात. |
12. समाजशात्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो.
समाजशात्रामध्ये समाज,भाषा,शिक्षण,आहार,कुटुंब, सुरक्षितता,समवयस्क गट,ज्ञान,खेळ इत्यादींचा अभ्यास केला जातो.
2.भारतवर्ष
⚜️13. राज्यशास्त्राचा अर्थ व महत्व
1.साधने